मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1632 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 744  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 32  हजार 138  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.46 टक्के आहे. 
 
राज्यात आज 40 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 6955  अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (15), नंदूरबार (0),  धुळे (4), जालना (50), लातूर(61),  परभणी (27), हिंगोली (24), नांदेड (16),  अकोला (22), अमरावती (12),  वाशिम (04), अकोला (23), बुलढाणा (14), नागपूर (72), यवतमाळ (06),  वर्धा (5), भंडारा (2), गोंदिया (3),  चंद्रपूर (57) गडचिरोली (7 ) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.


राज्यात सध्या 24 हजार 138 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,98, 958व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 998  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 16, 26, 299 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


24 तासांत देशात 15,786 नवे रुग्ण


कोरोना महामारीचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्याचं दिसत आहे. मागील 24 तासांत नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 15 हजार 786 नवी कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 231 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  देशातील एकूण कोरोना रुग्णांच्या मृताची संख्या 4 लाख 53 हजार 42 झाली आहे. गुरुवारी देशात 100 कोटी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाराचा आकडा पार केला.  देशातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्यामध्येही मोठी घट झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या एक लाख 75 हजार 745 उपचाराधीन रुग्ण आहेत. मागील 24 तासांत 18 हजार 641 जणांनी कोरोनावर मात केली. देशात आतापर्यंत तीन कोटी 35 लाख 14 हजार 449 लोकांनी कोरोनावर मात केली. देशात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या तीन कोटी 41 लाख 43 हजार 236 इतकी झाली आहे.