मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. राज्यात आज  66 हजार 191 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 61 हजार 450 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 35 लाख 30 हजार 60 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत.  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.19 टक्के  झाले आहे. राज्यात एकूण 6 लाख 98 हजार 354 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.


राज्यात आज एकूण 832 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.51 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 64 हजार 760 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या 832 मृत्यूंपैकी 360 मृत्यू मागील 48 तासातील आहेत. तर 244 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 228 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत. 


मुंबई गेल्या 24 तासात 5542 कोरोना बाधित रुग्णांची नोंद 


मुंबईत गेल्या 24 तासात 5542 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8478 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 5 लाक 37 हजार 711 वर पोहोचली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर 86 टक्के आहे. सध्या 75 हजार 740 एकूण सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुप्पटीचा दर 58 दिवस आहे.


राज्यात तिसऱ्या टप्प्यातही मोफत लस मिळणार?


 राज्यातील जनतेचं मोफत लसीकरण होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. राज्यातील जनतेचं मोफत लसीकरण करण्यास सरकार सकारात्मक असल्याचं मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.  मागील मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील नागरिकांना मोफत लस दिली पाहिजे यावर चर्चा झाली होती. चांगली आणि स्वस्त 15 कोटी लसी विकत घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार सकारात्मक आहेत. यासाठी ग्लोबल टेंडर काढून 15 कोटी लस विकत घेणार आणि मोफत लसीकरण राज्य सरकार करणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.