Maharashtra Corona Cases : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत असलेला दिसून येत आहे. आज 9,844 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर 9,371 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल 10,066 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली होती तर 11,032 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. सरकारी आकडेवारीनुसार राज्यात आज रोजी एकूण 1,21,767 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.


आता राज्यभरात बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,62,661 इतकी झाली आहे. आज 197 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 2 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.93 टक्के एवढे झाले आहे.  आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,03,60,931 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60,07,431 (14.88 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,32,453 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,166 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


Maharashtra Corona : घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका, धोका पत्करु नका, मुख्यमंत्री ठाकरेंच्या सूचना

पुणे शहरात आज नव्याने 333 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
पुणे शहरात आज नव्याने 333 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 76 हजार 826 इतकी झाली आहे. शहरातील 187 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 65 हजार 756 झाली आहे.  पुणे शहरात आज एकाच दिवसात 5 हजार 696 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 26 लाख 34 हजार 795 इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 2 हजार 516 रुग्णांपैकी 323 रुग्ण गंभीर तर 461 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 5 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 554 इतकी झाली आहे.


घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका, धोका पत्करु नका- मुख्यमंत्री 
दुसरी लाट अजून गेलेली नाही आणि त्यातून सावरून आपल्याला तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे, डेल्टा प्लेस या उत्परिवर्तित विषाणूचा देखील धोका आहे हे सगळे लक्षात ठेवून संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पुढील काळात किती जास्तीचे ऑक्सिजन व आयसीयू बेड्स लागतील तसेच फिल्ड रुग्णालयासारख्या किती सुविधा उभाराव्या लागतील याविषयी आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.  मुख्यमंत्री म्हणाले की, दुसऱ्या लाटेचे शेपूट अजून बाकी आहे. आपण पूर्णपणे त्यातून बाहेर आलेलो नाही. जिल्ह्यांसाठी विविध निर्बंधांच्या पातळ्या ( लेव्हल्स) ठरविल्या असल्या तरी स्थानिक प्रशासनाने  प्रत्यक्ष परिस्थिती पाहून आणि कुठलाही धोका न पत्करता निर्बंधांबाबत निर्णय घ्यायचा आहे. लेव्हल्सचा आधार घेऊन नागरिक मुक्तपणे आरोग्याचे नियम न पाळता सर्व व्यवहार करणार असतील आणि गर्दी करणार असतील तर संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढून परिस्थिती बिघडू शकते. यादृष्टीने आपल्या शहर अथवा जिल्ह्यातील संसर्गाचा नीट अभ्यास करा आणि घाईघाईने व्यवहार खुले करू नका असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की , विशेषतः: दुसऱ्या लाटेत आपण ऑक्सिजनच्या कमतरतेचा अनुभव घेतला आहे. आणि म्हणूनच सर्व जिल्ह्यांनी ऑक्सिजनचा पुरेसा साठा आत्तापासून करून ठेवा. दुर्गम आणि ग्रामीण भागात औषधी व इतर आवश्यक वैद्यकीय सामुग्री उपलब्ध राहील हे पहा. आपल्याला बऱ्याच ठिकाणी फाईल्स रुग्णालयांसारख्या सुविधा उभारता येतील त्यासाठी इमारती व जागांचे नियोजन करून ठेवा.