Maharashtra Corona Cases : राज्यात आज 9,361 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 9,101 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,19,457 इतकी झाली आहे. आज 190 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यत सध्या 1,32,241 अॅक्टिव्ह केसेस आहेत. राज्यात काल 8,912 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर 10,373 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता.


सरसकट अनलॉकमुळे नंबर वाढत असल्याचं दिसून येत आहे. काल नवी मुंबईत शून्य होते नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर आज 178 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. काल ठाणे शहरात 61, कल्याण डोंबिवलीत 36, पालघरमध्ये 94 रुग्णांची नोंद झाली होती तर आज ठाणे शहरात 129, कल्याण डोंबिवलीत 113, पालघरमध्ये 353 रुग्णांची नोंद झाली आहे. 


राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.76 टक्के एवढे झाले आहे. राज्यात 190 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.97 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,95,14,858 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,72,781 (15.12 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 7,96,297 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,683 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत गेल्या 24 तासात 696 कोरोनाबाधितांची नोंद


मुंबईत गेल्या 24 तासात 733 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासात 19  मृत्यूंची नोंद मुंबईत झाली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 650 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आजवर 6,88,990 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईचा ओव्हरऑल रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर गेला आहे. सध्या मुंबईत 14,809 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 726 दिवसांवर गेला आहे. मुंबईत आजपर्यंत कोरोनामुळं 15,298 लोकांचा जीव गेला आहे. 


पुणे शहरात आज नव्याने 211 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


पुणे शहरात आज नव्याने 211 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 75 हजार 588 इतकी झाली आहे. शहरातील 302 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 64 हजार 505 झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात 5 हजार 724 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 26 लाख 10 हजार 412 इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 2 हजार 559 रुग्णांपैकी 387 रुग्ण गंभीर तर 585 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 8 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 524 इतकी झाली आहे.


नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी एकही मृत्यू नाही 
नागपुरकरांसाठी सलग तिसऱ्या दिवशी मोठा दिलासा मिळाला आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी एकही मृत्यू नागपुरात झालेला नाही. आज नागपुर जिल्ह्यात 39 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यातील  नागपूर शहरात 26 तर नागपूर ग्रामीणमध्ये 13 रुग्णांची नोंद झाली आहे.  आज जिल्ह्यात 134 जण कोरोना मुक्त झाले आहेत.  आज अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण 907 इतके आहेत. तब्बल 4 महिन्यानंतर अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या हजारच्या खाली गेली आहे. विशेष म्हणजे एप्रिलच्या अखेरीस दुसरी लाट उच्चांकावर असताना नागपूर जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 80 हजारांवर गेली होती.