मुंबई : राज्यात आज 4, 456 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 430 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 77 हजार 230 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 03 टक्के आहे.
राज्यात आज 183 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. तब्बल 40 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 51 हजार 078 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 091 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (51), नंदूरबार (2), धुळे (23), जालना (17), परभणी (44), हिंगोली (59), नांदेड (26), अमरावती (97), अकोला (22), वाशिम (3), बुलढाणा (48), यवतमाळ (12), नागपूर (76), वर्धा (6), भंडारा (6), गोंदिया (2), गडचिरोली (31) या 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
मालेगाव, धुळे, जालना, हिंगोली, नांदेड, वाशिम, या पाच जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 41,54,890 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,69,332 (11.95 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,901,427 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,071 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 329 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 329 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 416 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,22,950 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात चार रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3187 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1479 दिवसांवर गेला आहे.
पाच दिवसांनी 40 हजारांहून कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद, 65 टक्के रुग्ण फक्त केरळात
मंगळवारी आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 30,941 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 350 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांत 36,275 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सलग पाच दिवस 40 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात येत होती. अशातच आज मात्र दैनंदिन रुग्णवाढीत काही प्रमाणात दिलासा मिळाला असून आज 40 हजारांहून कमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी 46164, गुरुवारी 44658, शुक्रवारी 46759, शनिवारी 45083 आणि सोमवारी 42909 दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती.