मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. राज्यात आज  3, 391 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 841  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 28 हजार 561  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.09 टक्के आहे. 


राज्यात आज 80 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12, 699 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  राज्यात सध्या 47 हजार 919 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,68,74,491 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,18,502 (11.46 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,83,445 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,812  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
मुंबईत गेल्या 24 तासात 485 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


 मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. कोरोनाची ही वाढलेली आकडेवारी चिंतेचा विषय बनत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 485 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 432 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,14,424 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मागील 24 तासात मुंबईत एकूण 41 हजार 024 नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली  मुंबईत गेल्या 24 तासात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4739 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1276 दिवसांवर गेला आहे. सील केलेल्या इमारतींची संख्या देखील वाढली आहे. मुंबईतील सध्या 42 इमारती सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत अॅक्टिव्ह कंटेनमेंट झोन शुन्य आहेत.


गेल्या 24 तासात देशात 35 हजार रुग्णांची भर


देशातील कोरोनाची रुग्णसंख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशातील रुग्णसंख्येत 35 हजार 662 इतकी भर पडली आहे आणि 281 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 33 हजार 798 जण कोरोनामुक्त झाले आहेत. काल वाढलेल्या नव्या रुग्णसंख्येपैकी एकट्या केरळमध्ये 23 हजार 260 नवीन रुग्ण सापडले आहेत. केरळमध्ये काल 131 जणांचा मृत्यू झाला आहे.  शुक्रवारी देशात एकाच दिवशी कोरोना लसीचे 2.5 कोटीहून अधिक डोस देण्यात आले. देशात जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरु असून आतापर्यंत चार वेळा एकाच दिवशी एक कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.