मुंबई : राज्यात आता कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येताना दिसत आहे. राज्यात आज 3,286 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 933 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 57 हजार 012 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.23 टक्के आहे. राज्यात आज 51 कोरोना बाधितांचे मृत्यू झाले असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.
मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढतेय
मुंबईत 24 तासात 446 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 24 तासात बरे झालेले रुग्ण 430 आहेत. शहरात आतापर्यंत 716941 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर 97% आहे. सध्या शहरात एकूण सक्रिय रुग्ण 4809 इतर आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर 1187 दिवसांवर गेला आहे. कोविड वाढीचा दर (17 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर) 0.06% इतका आहे.
पुणे कोरोना अपडेट
पुणे महापालिका हद्दीत आज दिवसभरात 171 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर शहरातील विविध रुग्णालयातून 105 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आज 8 हजार 32 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. दरम्यान दिवसभरात 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या शहरात 1637 कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाखांवर
भारतात कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या जवळपास तीन लाखांवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 31,382 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 318 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. तसेच 24 तासांत 32,542 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
गेल्या आठ दिवसातील कोरोना रुग्णांची आकडेवारी
16 सप्टेंबर : 34,403 रुग्ण
17 सप्टेंबर : 35,662 रुग्ण
18 सप्टेंबर : 30,773 रुग्ण
19 सप्टेंबर : 30,256 रुग्ण
20 सप्टेंबर : 26,115 रुग्ण
21 सप्टेंबर : 26,964 रुग्ण
22 सप्टेंबर : 31,923 रुग्ण
23 सप्टेंबर : 31,382 रुग्ण