मुंबई : राज्यात आज 1258 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1942 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 


सहा कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू (Maharashtra Corona Death) 


राज्यात  सहा कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,44, 923 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.06 टक्के इतकं झालं आहे. 


राज्यात एकूण 9197 सक्रिय रुग्ण (Maharashtra Corona Active Cases) 


राज्यात एकूण 9197 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये  मुंबईत सर्वाधिक म्हणजे 3414  इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 2228  सक्रिय रुग्ण आहेत.


देशात 6168 नवे कोरोनाबाधित (Coronavirus Cases Today)


बुधवारच्या तुलनेत गुरुवारी दिवसभरात नोंद झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24  तासांत म्हणजेच गुरुवारी दिवसभरात 6 हजार 168 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत रुग्णसंख्या 1 हजार 778 रुग्ण घटले आहेत. बुधवारी दिवसभरात कोरोनाच्या 7 हजार 946 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे देशात उत्साहाचं वातावरण असताना कोरोनाबाधितांच्या संख्येत झालेली घट ही दिलासादायक बाब आहे. देशात गेल्या 24 तासांत 9 हजार 685 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत. देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त आहे. देशातील उपचाराधीन असलेल्या कोरोना रुग्णांची संख्याही घटली आहे. सध्या देशात 59 हजार 210 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 5 लाख 27 हजार 932 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.