Maharashtra Corona Cases : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत असलेला दिसून येत आहे. मात्र कालच्या तुलनेत आज कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. आज 10,066 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर 11,032 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर काल 8 हजार 470 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती आणि 9 हजार 046 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
आता राज्यभरात बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,53,290 इतकी झाली आहे. आज 163 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 1.99 टक्के एवढा आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.93 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 163 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.99 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,01,28,355 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,97,587 (14.95 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,92,108 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,223 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 1,21,859 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 863 रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 863 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 711 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर मुंबईत आज 23 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत आतापर्यंत 6,91,128 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 95 टक्के आहे. सध्या मुंबईत 14,577 सक्रीय रुग्ण आहेत. रुग्ण दुप्पटीचा दर 728 दिवसांवर गेला आहे.
पुणे शहरात आज नव्याने 283 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
पुणे शहरात आज नव्याने 283 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 76 हजार 493 इतकी झाली आहे.शहरातील 255 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 65 हजार 569 झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात 5 हजार 437 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 26 लाख 29 हजार 99 इतकी झाली आहे.पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 2 हजार 375 रुग्णांपैकी 331 रुग्ण गंभीर तर 464 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.