CM Uddhav - PM Modi Meeting LIVE : मुख्यमंत्री आणि पंतप्रधान भेटीची टाईमलाईन
CM Uddhav - PM Modi Meeting LIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. मराठा आरक्षण प्रश्नी ही भेट आहे. या दौऱ्याविषयीचे सर्व अपडेट्स....
पालघर जिल्ह्यात 9 ते 12 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला, जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन कडून प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांना सूचना देऊन दवंडी पिटवून नागरिकांना सतर्क राहण्यासाठी माहिती देण्यासाठी केल्या सूचना, तालुका स्तरावरून अंमलबजावणी सुरू
एका महिलेने आपल्या पतीविरोधात तक्रार केल्यानंतर आपल्यला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची महिलेच्या पतीची पोलिसांविरोधात तक्रार, सांगली जिल्ह्यातील खानापूर पोलीस ठाण्यातील प्रकार, खानापूर तालुक्यातील करंजे मधील एका महिलेने पती विरोधात तोंडी तक्रार दिली, या तक्रारी नंतर खानापूर पोलीस ठाण्यात पती पोपट नारायण माने यास रात्री उशिरा चौकीत नेऊन बेदम मारहाण केल्याची माने याची तक्रार
एका महिलेने आपल्या पतीविरोधात तक्रार केल्यानंतर आपल्यला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची महिलेच्या पतीची पोलिसांविरोधात तक्रार, सांगली जिल्ह्यातील खानापूर पोलीस ठाण्यातील प्रकार, खानापूर तालुक्यातील करंजे मधील एका महिलेने पती विरोधात तोंडी तक्रार दिली, या तक्रारी नंतर खानापूर पोलीस ठाण्यात पती पोपट नारायण माने यास रात्री उशिरा चौकीत नेऊन बेदम मारहाण केल्याची माने याची तक्रार
अमरावती जिल्ह्यात आज दिवसभरात 201 कोरोना रुग्ण आढळले, आज 5 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, जिल्ह्यात एकूण रूग्णांची संख्या पोहचली 94 हजार 490 वर
भंडारा जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मोहाडी तालुक्यातील खमारी बुजरूक गावात मोठा दुर्घटना घडली असून वीज पडून तिघांचा मृत्यू झाला आहे, शेतावर काम करत असताना वीजेचा कडकडात व वादळी वाऱ्यासह पाऊस बरसल्याने गावाशेजारी असेलल्या झोपडीत वादळीवाऱ्या पासून बचाव करण्यासाठी गेले असताना अचानक वीज झोपडीवर पडल्याने अशोक उपराडे पुरुष (50), आशा दमाहे (40) व अनिता फत्तु सव्वालाखे (40) यांच्या जागीच मृत्यू झाला तर दोन व्यक्ती जखमी झाले आहेत.
अहमदनगर : जेष्ठ पत्रकार बाळ बोठे यांच्या विरोधात अखेर दोषारोपपत्र दाखल, यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार बोठेवर पुरवणी दोषारोप पत्र पारनेर न्यायालयात दाखल, साडेचारशे पानांचं दोषारोपपत्र दाखल
येत्या 4 दिवस कोकणातील ठाण्यासह चारही जिल्ह्यात हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या तौक्ते चक्रीवादळामूळे कल्याण डोंबिवलीत रस्त्यावर उभारण्यात आलेली 3 भलीमोठी होर्डींग कोसळून काही जण जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीच्या काळातही अशा दुर्घटना होऊ नये यासाठी धोकादायक असणारी सर्व होर्डिंग्ज त्वरित काढून टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. तसेच अतिवृष्टीच्या काळात धोकादायक इमारतीही तातडीने रिकाम्या करण्याचे निर्देश सर्व प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिले. तसेच रुग्णालयानी जनरेटर साठी अतिवृष्टीच्या काळात 3 दिवस पुरेल इतका डिझेलचा साठा करण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. तसेच गोविंदवाडीसारख्या अतिसखल भागात अतिवृष्टीच्या काळात पाणी शिरण्याआधीच तेथील तबेले रिकामे करून गुरांची बाहेरील बाजूस आणि रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत
मुख्यमंत्री आणि पंतप्रधान भेट - टाईमलाईन
सकाळी 07.20 वा मुख्यमंत्र्यांचा ताफा मातोश्रीवरुन विमानतळाकडे रवाना
सकाळी 07.45 वा - मुख्यमंत्र्यांच्या विमानाचं दिल्लीकडे उड्डाण
सकाळी 09.50 वा - दिल्ली विमानतळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचं आगमन
सकाळी 10.15 वा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह इतर मंत्र्यांचा ताफा विमानतळावरुन पंतप्रधान निवासस्थानाकडे रवाना
सकाळी 10.45 वा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह इतर मंत्र्यांचा ताफा पंतप्रधान निवासस्थानी दाखल
सकाळी 11.10 वा - पंतप्रधानांसोबत मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळाची बैठक सुरु
दुपारी 12.40 वा - पंतप्रधानांसोबत मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळाची बैठक संपली
दुपारी 12.45 वा - मुख्यमंत्र्यांचा ताफा पंतप्रधान निवासस्थानावरून महाराष्ट्र सदनाकडे रवाना
दुपारी 12.50 वा - मुख्यमंत्री महाराष्ट्र सदनात पोहोचले आणि तिथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं
दुपारी 01.00 वा - मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद
पंतप्रधानांसोबत व्यक्तिगत भेट झाली, सत्तेत एकत्र नसलो तरी याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. म्हणजेच मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत वैयक्तिक भेट झाली. असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
पंतप्रधानांसोबतच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना पंतप्रधानांसोबत आमची दीड तास चर्चा झाली. एसटी, एससी, ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यासाठी घटनेत दुरुस्ती करण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली आहे, असं अजित पवार म्हणाले. त्याचप्रमाणे 24 हजार 306 कोटींचा जीएसटी परतावा महाराष्ट्राला लवकरात लवकर देण्यात यावा, अशी मागणीही पंतप्रधानांकडे केल्याचं अजित पवार म्हणाले.
पंतप्रधान मोदी भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षणावर पंतप्रधान मोदींशी चर्चा केली, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच पदोन्नतीमधील आरक्षण, मेट्रो कारशेडसाठी जागेची उपलब्धता या विषयांवरही चर्चा केली अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याबाबत पंतप्रधानांशी चर्चा केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच पंतप्रधानांसोबतची बैठक अधिकृत बैठक होती; असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची बैठक संपली आहे. सुमारे दीड ते पावणे दोन तास ही बैठक सुरु होती. आता महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात गेल्या सव्वा तासांपासून चर्चा सुरु आहे. अशातच पंतप्रधान आणि मोदी यांच्या भेटीदरम्यानचा फोटो सध्या सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. हा फोटो मुख्यमंत्री कार्यालयानं ट्वीट केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिष्टमंडळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची बैठक सव्वा तासापासून सुरु आहे.
मराठा आरक्षण प्रश्नी शिष्टमंडळाच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून पंतप्रधान मोदी यांची वैयक्तिक भेट घेण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील सूत्रांनी ही माहिती दिली. दह मिनिटांची ही भेट असू शकते.
मुख्यमंत्र्यांसह शिष्टमंडळ दिल्ली विमानतळावरुन महाराष्ट्र सदनाकडे रवाना झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षणविषय उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचा शिष्टमंडळात समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरही उपस्थित आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस नेते अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित आहेत. थोड्याच वेळात पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात दिल्ली विमानतळावर दाखल होणार, मराठा आरक्षणाबाबत सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही वेळापूर्वी आपल्या 'मातोश्री' या निवासस्थानाहून मुंबई विमानतळासाठी रवाना, सकाळी 11 वाजता दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी विशेष विमानाने काही वेळातच दिल्लीसाठी रवाना होणार
पार्श्वभूमी
CM Uddhav - PM Modi Meeting LIVE : मराठा आरक्षणप्रश्नी (Maratha Reservation) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची (PM Modi) भेट घेणार आहे. मराठा आरक्षणाबरोबरच केंद्राकडे राज्याचे असलेली जीएसटीचे पैसे, तोक्ते चक्रीवादळात झालेले नुकसान आणि इतर मुद्दे या संदर्भात हे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. आज सकाळी ही भेट होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर असं शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला जाणार आहे.
मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी राज्यपालांच्या माध्यामतून पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना विनंती करत राज्यपालांना पत्र दिलं होते. तसेच भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होते.
असा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा!
- सकाळी 7 वाजता मुंबईहून विमानाने दिल्लीसाठी रवाना होणार
- सकाळी 9 वाजता दिल्ली विमानतळावर दाखल होणार
- सकाळी 9.45 वाजता महाराष्ट्र सदन इथे आगमन
- सकाळी 10.15 वाजता नवी दिल्लीतील लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधान निवासकडे रवाना
- सकाळी 10.30 वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी आगमन होणार
- सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदी यांच्यासोबत बैठक
- बैठकीनंतर सोयीनुसार मुंबईकडे विमानाने प्रयाण
संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून आंदोलनाची हाक
शिवराज्यभिषेकदिनी म्हणजेच 6 जून रोजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलनाची हाक दिली. येत्या 16 जून पासून राजर्षि शाहू महाराज यांच्या समाधीपासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात होणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या घोषणेनंतर पुढचे पाऊल म्हणजे महाविकासआघाडीने पुन्हा एकदा हा चेंडू केंद्राच्या कोर्टात टाकला आहे. एकीकडे भाजपकडून रणनिती आखली जाते तर दुसरीकडे महाविकास आघाडी भाजपच्या नेत्यांना भेटून आरक्षणाचा तिढा सोडवण्याची विनंती करणार आहे.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, "मी 2007 पासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्र पिंजून काढला. माझा लढा हा 70 टक्के गरीब मराठ्यांसाठी आहे. मराठा समाज हा सामाजिक मागास नाही, म्हणून आरक्षण देता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. त्याचं सर्वांनाच दु:ख झालं. आता कोण चुकले कोण बरोबर याच्यावरुन मागचे सरकार आणि आताचे सरकार यांच्यात वाद सुरु आहे. या वादाशी आम्हाला काही घेणं-देणं नाही, मराठा समाजाला आरक्षण कसं देणार ते सांगा?"
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -