Maharashtra Breaking News Live Updates : मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी पार पडणार- सूत्र

Maharashtra Election Results News Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....

प्रज्वल ढगे Last Updated: 29 Nov 2024 04:07 PM
Bhiwandi News भिवंडी मनपा मुख्यालयासमोर वाहनांचा विळखा, वाहतूक पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

भिवंडी महापालिका मुख्यालयासमोर अवैध पार्किंग केल्याने मनपा मुख्यालयाला चारचाकी वाहनांचा विळखा बसला होता. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने माध्यमांनी या अवैध पार्किंगची दखल घेतल्यानंतर खडबडून जागे झालेल्या वाहतूक पोलिसांनी मनपा मुख्यालयासमोर अवैध पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी ऑनलाईन दंड आकारले आहेत. वाहतूक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे मनपा मुख्यालयासमोर वाहने पार्क करणाऱ्या चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. 

मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी पार पडणार- सूत्र

मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी पार पडणार


दिल्लीच्या आझाद मैदानात पार पडणार शपथविधी सोहळा


सूत्रांची माहिती

Mahayuti Government Oath: महायुती सरकारचा शपथविधी कधी आणि कुठे?

महायुतीच्या शपथविधीसाठी प्रशासनाकडून चाचपणी. देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांकडून घेतला मुंबईतील मैदानांचा आढावा. २ डिसेंबरला शपथविधी झाला तर सोहळा शिवाजी पार्कवर होणार. मात्र, विलंब झाल्यास आझाद मैदान, महालक्ष्मी रेसकोर्स किंवा एमएमआरडीए मैदानाचाही प्रशासनाकडून विचार


 


 


 

Shivshahi Bus Accident : शिवशाही बस उलटल्याने भीषण अपघात, 15 प्रवासी जखमी 

गोंदिया : जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ एसटी महामंडळाची शिवशाही बस उलटली घटना घडली आहे. अपघातात 15 ते 20 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. 

Jal Jeevan Mission : जल जीवन मिशनच्या कामात हलगर्जीपणा, ग्रामस्थांनी दिला कॉन्ट्रॅक्टरला चोप

रायगड : मागील दोन ते तीन वर्षांपासून सुरू असलेली जलजीवन मिशन योजनेची कामे अद्यापही रायगड जिल्ह्यात पूर्ण झालेली नाहीत. आज अलिबाग तालुक्यातील ताड वागळे ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या ग्रामस्थांनी येथील योजना अपूर्ण राहिल्यामुळे चक्क कॉन्ट्रॅक्टरलाच बेदम चोप दिलाय. काम का पूर्ण झाले नाही? असा जाब विचारताच या अधिकाऱ्याने उडवाउडवीची उत्तर दिल्यामुळे येथील नागरिकांनी या अधिकाऱ्याला चांगलाच चोप दिलाय.

Jal Jeevan Mission : जल जीवन मिशनच्या कामात हलगर्जीपणा, ग्रामस्थांनी दिला कॉन्ट्रॅक्टरला चोप

रायगड : मागील दोन ते तीन वर्षांपासून सुरू असलेली जलजीवन मिशन योजनेची कामे अद्यापही रायगड जिल्ह्यात पूर्ण झालेली नाहीत. आज अलिबाग तालुक्यातील ताड वागळे ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या ग्रामस्थांनी येथील योजना अपूर्ण राहिल्यामुळे चक्क कॉन्ट्रॅक्टरलाच बेदम चोप दिलाय. काम का पूर्ण झाले नाही? असा जाब विचारताच या अधिकाऱ्याने उडवाउडवीची उत्तर दिल्यामुळे येथील नागरिकांनी या अधिकाऱ्याला चांगलाच चोप दिलाय.

Udgir Leopard News : उदगीर शहरात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

उदगीर : शहरात पहाटेच्या वेळी उदगीर शहरातील पारकटी नगर परिसरात बिबट्या फिरत असल्याचा आढळून आला आहे. एका घरावरून उडी मारत बिबट्या बाळू बागबंदे यांच्या घरात घुसला. झाडलोट करण्यासाठी त्या घरातील महिला बाहेर आली होती त्यावेळी त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला. यावेळी महिला आपला जीव मुठीत धरून एका भिंतीच्या कडेला थांबली. त्यावेळी तिच्या बाजूने बिबट्या निघून गेला. उदगीर शहरात बिबट्या आढळून आल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्या घरात आलेला हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 

नालासोपारा येथील राखीव भूखंडावरील 41 इमारतींवर तोडक कारवाईचा बडगा

वसई विरार महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या नालासोपारा येथील राखीव भूखंडावर उभारण्यात आलेल्या 41 इमारतींवर तोडक कारवाईचा बडगा महानगरपालिकेकडून सुरू असून काल येथील सात इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. तर आजही तीन इमारतीमधील 18 कुटुंबांना बाहेर काढण्यात आला असून या भागाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. कालपासून ज्या कुटुंबांना बाहेर काढण्यात आलंय ते कुटुंब अजूनही उघड्यावर असून आम्हाला सरकारने न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे 

Waqf Board : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी जाहीर, अल्पसंख्यांक विभागाचा निर्णय 

वक्फ बोर्डाला पायाभूत सुविधांसाठी तसंच बळकटीकरणासाठी 10 कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुकांपुर्वी राज्य सरकारने हा निर्णय घेतला होता. काल 28 नोव्हेंबर रोजी याबाबत जीआर काढण्यात आला आहे. राज्य सरकारने राज्य वक्फ बोर्डाला वेगवेगळ्या पायाभूत सुविधांसाठी 10 कोटी रुपये निधी जाहीर केला आहे. अल्पसंख्यांक विभागाने याबाबतचा शासन निर्णय (GR) जारी केला आहे. शासन निर्णयामध्ये दिलेल्या माहितीनुसार, 2024-25 वर्षात अर्थसंकल्पीय अंदाज आणि पुरवणी मागणीद्वारे एकूण 20 कोटी एवढी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामधून 2 कोटी अनुदान वक्फ बोर्डाला वितरित करण्यात आले आहे. तर आता 10 कोटी रुपये अदा करण्यात येणार आहेत. 

shrivardhan Fire : श्रीवर्धनमधील मच्छी मार्केटला भीषण आग, लाखोंचे नुकसान

श्रीवर्धन : येथील कोळीवाड्यात मध्यरात्री तीनच्या सुमारास एक भीषण आग लागली. या आगीत स्थानिक मच्छीमार अधिक अतीक वसगरे यांच्या ऑफिसच मोठे नुकसान झाले आहे. वसगरे त्यांच्या श्रीवर्धन कोळीवाड्यात असणाऱ्या ऑफिसमध्ये ही आग स्पार्क झाल्याने ही लागली, या आगीमध्ये संपूर्ण वसगरे यांचं ऑफिस जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्री लागलेल्या या आगीवर स्थानिकांसह अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आग आटोक्यात आणण्यात उशीर झाल्याने आजूबाजूला असणाऱ्या 2 फायबर बोट आणि 200 मच्छीने भरलेले टँक सुध्दा जळून खाक झालेत. लागलेल्या आगीत वसगरे कुटुंबाचे 7 लाखांचे नुकसान झाले आहे.

Dhule News : धुळ्यात केवळ 35 टक्के रब्बी हंगामाची पेरणी

धुळे : जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी साधारण 90 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. मात्र त्यापैकी यंदा 31 हजार हेक्टर क्षेत्रावरच रब्बीची पेरणी झाली. त्याची टक्केवारी केवळ पस्तीस टक्के इतकीच आहे. दुष्काळी तालुका अशी नोंद असलेल्या शिंदखेडा तालुक्यात मात्र सर्वाधिक म्हणजे 46 टक्के रब्बीची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात यंदा पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी गव्हाच्या पिकाला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले असून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव द्यावा तसेच एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्यांचे चांगले दिवस येतील असे म्हणत असले तरी आमचे मात्र चांगले दिवस आलेले नाहीत. शेतीला कडाक्याच्या थंडीत रात्रीच्या वेळी पाणी द्यावे लागते तसेच केवळ आठ तास वीज पुरवठा केला जातो, तो 12 तास केला पाहिजे. राज्यात आलेल्या महायुतीच्या सरकारने देखील शेतकऱ्यांच्या कडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

Mumbai Ahmedabad Highway : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर वाडा खडकोना ते मेंढवन खिंडीपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. जवळपास चार ते पाच किलोमीटरच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे. ही वाहतूक कोंडी होत असतानाच मुंबईकडून गुजरातच्या दिशेने जाणारी वाहने विरुद्ध दिशेच्या लेनवरून जात असल्याने गुजरात मुंबई वाहिनीवर देखील वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी कोणतीही यंत्रणा किंवा वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल नाहीत. 

Mharashtra Politics : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात लाडक्या आमदार बहिणींची संख्या वाढणार

भाजपकडून यंदा विधानसभेवर 14 महिला आमदार निवडून आल्या आहेत


राष्ट्रवादीच्या 4 तर शिवसेनेकडून 2 आमदार विधानसभेवर


त्यातील 4 महिला आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता


मागच्या 2 टर्म पेक्षा अधिक काळ भाजपचा गड राखून ठेवलेल्या महिला आमदारांची मंत्री मंडळात वर्णी लागणार


मंत्रीपद देण्याच्या अनुषंगाने महिला आमदारांचे प्रोफाइल दिल्लीत मागविले असल्याची माहिती

Nandurbar : सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये शेतकरी आणि कृषी विभागाचा अनोखा प्रयोग

नंदुरबार : जिल्ह्यातील सातपुड्याचा डोंगर रांगांमध्ये अनेक नदी नाल्यांचा उगम आहे. या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने नदी, नाले मार्च एप्रिल महिन्यापर्यंत प्रवाहित राहतील, असा अंदाज स्थानिक व्यक्त करतात. त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याने त्याचा उपयोग होत नाही. या बाबी लक्षात घेत कृषी विभाग आणि शेतकऱ्यांनी एकत्र अनोखी मोहीम हाती घेतली असून गावात खाली सिमेंटच्या गोण्या आणि इतर साहित्य एकत्र करत त्यातून वनराई बंधाऱ्यांची निर्मिती सुरू केली आहे. याची सुरुवात तळोदा तालुक्यातील रावला पाणी येथून झाले असून संपूर्ण सातपुडा परिसरात वनराई बंधाराच्या माध्यमातून शासनाचा कुठलाही निधी खर्च न करता मोठ्या प्रमाणात पाणी अडवून त्याचा सिंचनासाठी उपयोग करण्यात येणार आहे. पाणी अडवून ते जिरवले जात असल्याने भूगर्भातील पाणी पातळी वाढली आहे तर काही ठिकाणी वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून आढळण्यात आलेल्या पाण्यातून रब्बी हंगामासाठी सिंचन केले जाणार आहे. त्यामुळे कृषी विभाग आणि शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या या प्रयोगाची जिल्हाभरात सध्या चर्चा सुरू आहे.

Maharashtra politics : आपला नेता पालकमंत्री व्हावा, कार्यकर्त्यांचं देवाला साकडं

धाराशिव : राज्यात मुख्यमंत्रीपदाचा पेच सुरू असताना जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असणार याची काळजी महायुतीतील कार्यकर्त्यांना लागली आहे. आपलाच नेता जिल्ह्याचा पालकमंत्री असावा यासाठी कार्यकर्ते देवाला साकड घालत आहेत. धाराशिव जिल्ह्यात महायुतीचे दोन आमदार निवडून आले. परंडा विधानसभा मतदारसंघातून मंत्री तानाजी सावंत दुसऱ्यांदा आमदार झाले. तर तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे राणाजगजीतसिंह पाटील दुसऱ्यांदा आमदार झाले. राणा पाटील हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आपल्या नेत्याला मंत्रिपद मिळेल ही आशा आहे. तर तानाजी सावंत यांनी मंत्रिपद भूषवले असल्याने पुन्हा त्यांना मंत्रिपद मिळेल हे त्यांच्या समर्थकांचे मत आहे. आपल्या नेत्याला मंत्रिपद मिळावे आणि जिल्ह्याचा पालकमंत्री आपला नेता असावा, यासाठी दोघांच्या समर्थकांनी देवाला साकडे घातले आहे. शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या समर्थकांनी तुळजापुरात आई तुळजाभवानीची आरती करत सावंतांच्या पालकमंत्रिपदासाठी साकडं घातलं. तर राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मूळ गावी त्यांच्या समर्थकांनी संत गोरोबाकाका यांच्या मंदिरात जात अभिषेक केला. कार्यकर्त्यांनी देवाचा धावा सुरू केलाय. मात्र कोणाची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आणि कुणाच्या वाट्याला पालकमंत्री पद येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Maharashtra Weather : राज्यातील अनेक भागात हुडहुडी, किमान तापमानात घट 

राज्यातील अनेक भागात हुडहुडी, किमान तापमानात घट 


मुंबई, पुण्यातही थंडीने जोर पकडला 


मुंबईत यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद, याआधी काही दिवसांपूर्वीच तापमान 16.8 अंशावर घसरलं होतं 


मुंबईत आज 16.5 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद 


पुण्यातही तापमान 9.5 अंश सेल्सिअस इतकं निचांकी नोंदवल्या गेलंय 


महाबळेश्वरपेक्षाही अहमदनगर थंड, किमान पारा घसरला 


अहमदनगरमध्ये पारा घसरला, तापमान 8.3 अंश सेल्सिअसवर 


जेऊरमध्ये किमान तापमान 6 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरलं


संभाजीनगर आणि नाशिकमध्ये 10.6 अंश सेल्सिअस तर महाबळेश्वरमध्ये किमान तापमान 10.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे 


समुद्र किनाऱ्यांजवळील शहरांमध्ये देखील तापमान घटले, रत्नागिरीत तापमान 17.3 अंशांवर 


मालेगाव 12.6, उदगीर 11.2, सांगली 12.7, कुलाबा 21.4, माथेरान 14 अंश सेल्सिअस, नांदेड 11.3, कोल्हापूर 15, सोलापूर 12.8 


बारामती 9.5, परभणी 10, हवेली 8.4

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदी देवेंद्र फडणवीसच विराजमान होणार; सूत्रांची माहिती

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदी देवेंद्र फडणवीसच विराजमान होणार, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. 

Nitin Desai : ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितिन देसाई यांचा एन. डी. स्टुडिओ सरकारच्या ताब्यात 

कर्जत - अखेर ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितिन देसाई यांचा एन डी स्टुडिओ सरकारच्या ताब्यात 


अलिबाग - जानेवारी ते आतापर्यंत समुद्रात अवैध डिझेल तस्करी करणाऱ्या व्यवसायिकांकडून रायगड पोलिसांकडून 8 हजार 250 लिटर जप्त... अंदाजे किंमत 6 लाख 87 हजार आहे.


रायगड - रायगड मधील आंबा पिकांवर होणार ड्रोन द्वारे फवारणी.. अलिबाग मधील आर सी एफ कंपनीकडून आदिवासी महिलांना मिळणार फवारणी ड्रोन 


मुरूड - मासेमारी करताना जेलिफिश जाळ्यात येत असल्यानं मुरूड मधील अनेक मच्छिमार संकटात...दोन दिवसांपासून मासळी मिळतं नसल्याने संकटात.

Accident News : कंटेनरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार जागीच ठार

नागपूर - हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गवरील किन्ही जवादे फाट्याजवळ दुचाकी व कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. देविदास लक्ष्मण उरकुडे, आणि देविदास केशव मडावी अशी मृतांची नावे आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील वडकीपासून पाच किलोमिटर अंतरावरील किन्ही जवादे फाट्याजवळ एकेरी वाहतुकीमुळे या दोन निष्पाप लोकांचा बळी गेला. कंटेनर एचपी गॅसचे कंटेनर नागपूरकडून हैद्राबादकडे जात होते. यातच दुचाकी पाढरकंवडाकडून वडकीकडे येत होते. दरम्यान, या दोन्ही वाहनांची किन्ही जवादे फाट्याजवळ समोरासमोर धडक बसून अपघात झाला. सहा महिन्यांत एकरी वाहतुकीमुळे 12 हून अधिक अपघात झाले आहेत.

Parbhani Weather : परभणीचे तापमान 8 अंशावर, यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद

परभणी शहरासह जिल्हाभरात मागच्या 2 दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून आज यंदाच्या मौसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झालीय. आज जिल्ह्याचे तापमान हे  8 अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले आहे. वाढेलल्या थंडीमुळे नागरिक उबदार कपड्यांचा वापर करताना दिसत आहेत. शिवाय शहरासह ग्रामीण भागात शेकोट्या पेटायलाही सुरुवात झालीय. विशेष म्हणजे ही थंडी हरभरा, गहू पिकांसाठी फायदेशीर आहे.

पुण्यातील किमान तापमान 8 अंशावर, पुणेकर थंडीने गारठले, श्वसनविकराचा धोका वाढला 

पुणे टिकर 


पुण्यातील किमान तापमान ८ अंशावर, पुणेकर थंडीने गारठले, श्वसन विकराचा धोका वाढला 



 पुणे पालिकेचे 200 कोटी रुपये बँकेत ठेवण्यासाठी स्थायी समिती समोर प्रस्ताव 


पुण्यातील टेकड्या सुरक्षित होणार; टेकड्यांवर सीसीटीव्ही, लाईट्स, पॅनिक बटण बसवल जाणार 


ब्लॅकमेलिंग करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल; ४ लाख दे नाहीतर बलात्काराचा गुन्हा दाखल करते म्हणत केलं ब्लॅकमेलिंग


पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयात राज्यातील पहिले बालस्नेही कक्ष

Chhatrapati Sambhajinagar : युवा क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

संभाजीनगर शहरातील प्रसिद्ध युवा क्रिकेटपटू इम्रान सिकंदर पटेलचा क्रिकेट खेळतानाच मृत्यू झाला. सामना खेळत असताना इम्रानने सहाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चौकार मारला, त्यानंतर त्याला अचानक छातीत दुखू लागले. त्यानंतर पाचच मिनिटांत त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले ,मात्र डॉक्टरांनी त्याला घोषित केले. 

शिंदे उपमुख्यमंत्री पद घेणार की नाही यावर अजून प्रश्नचिन्ह 

शिंदे उप मुख्यमंत्री पद घेणार की नाही यावर अजून प्रश्नचिन्ह 


मुंबईत येऊन घेणार निर्णय, 


मंत्री पदाच्या वाटाघाटीत योग्य मंत्री पद मिळण्याची आशा, 


उप मुख्यमंत्री पदाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित

शिंदे, फडणवीस आणि पवार यांच्यात मुंबईत होणार बैठक 

ब्रेक 


दिल्लीतील मीटिंग झाल्यानंतर उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक 


शिंदे, फडणवीस आणि पवार यांच्यात मुंबईत होणार बैठक 


बैठकीची वेळ आणि ठिकाण अजून निश्चित नाही 


अमित शहा यांनी दिलेल्या सूचना आणि घेतलेले निर्णय चर्चिले जाणार, त्यानंतर सत्ता स्थापन केली जाणार

विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती द्या, मुंबई महानगर पालिकेकडून सरकारला प्रस्ताव

मुंबई महानगर पालिकेकडून विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती व्हावी असा प्रस्ताव सरकार ला पाठविण्यात आला आहे


स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीचे  स्टेटस पालिकेला मिळाव म्हणून मुंबई महानगर पालिकेने प्रस्ताव राज्य सरकार कडे दिला आहे


मुंबईत महापालिकेला ५० हजार झोपड्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी देण्यात आली आहे

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर (Vidhan Sabha Election 2024 Result) नव्या सरकारच्या स्थापनेला वेग आला आहे. महायुतीचे घटकपक्ष मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवण्यासाठी चर्चा करत आहेत. त्यासाठी भाजपासह शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते आतापर्यंत अनेकवेळा दिल्लीत जाऊन आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जवळजवळ निश्चित झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र एकनाथ शिंदे यांचे जोपर्यंत समाधान होत नाही, तोपर्यंत त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आज राज्याच्या राजकीय पटलावर नेमकं काय घडणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज्यात मुंबई, पणे, नाशिक या प्रमुख शहरांसह इतरही भागात थंडी वाढू लागली आहे. या घटनांचे तसेच राज्यातील इतरही घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर ...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.