Dussehra 2021 Melava Live :महराष्ट्रात जर लोकशाहीचा खून, तर यूपीत लोकशाहीचा मळा फुलला आहे का? : मुख्यमंत्री
Shivsena Dasara Melawa 2021 : आजच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एबीपी माझा वेबटीम Last Updated: 15 Oct 2021 07:16 PM
पार्श्वभूमी
मुंबई : दरवर्षी शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा यंदा कोरोना काळात बंद हॅालमध्ये कमी लोकांच्या उपस्थित होणार आहे. पण, तरीही शिवसैनिकांमध्ये तोच जोश पाहायला मिळतोय. यंदाच्या मेळाव्यात ठाकरेंची तोफ कुणाकुणावर डागणार?...More
मुंबई : दरवर्षी शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा यंदा कोरोना काळात बंद हॅालमध्ये कमी लोकांच्या उपस्थित होणार आहे. पण, तरीही शिवसैनिकांमध्ये तोच जोश पाहायला मिळतोय. यंदाच्या मेळाव्यात ठाकरेंची तोफ कुणाकुणावर डागणार? ठाकरेंच्या तावडीत कोण सापडणार? सैनिकांना मेळाव्यात नवीन उर्जा मिळाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दसरा मेळावा शिवसैनिकांसांठी एक उर्जेचा स्रोतच जणू. बाळासाहेब ठाकरेंपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत दसरा मेळाव्याल्या शिवसैनिक हजारोंच्या संख्येनं गर्दी करतात आणि एक नविन उर्जा घेऊन पक्षाच्या कामाला सुरुवात करतात. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला एक वेगळीच परंपरा आहे. गेली अनेक वर्ष शिवाजी पार्कच्या मैदानात ठाकरेंची तोफ धडधडायची. पण यंदा हा सोहळा षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येने भाषण देणाऱ्या ठाकरेंना यंदा मोजक्याच लोकांसमोर भाषण करावं लागणार आहे. पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहचण्यासाठी ॲानलाईनची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या मेळाव्याला शिवसेनेचे नेते, मंत्री, आमदार विभागप्रमुख, महापौर आणि महापालिकेतले महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत सैनिकांसाठी हा मेळावा अत्यंत महत्वाचा आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्यानं उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर राज्यातले आणि केंद्रातले भाजपचे नेते असतील असं म्हटलं जातंय. तसेच यातील सर्वात महत्वाचा मुद्दा असणार आहे, तो म्हणजे केंद्रीय यंत्रणा. गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय यंत्रणा राज्यातल्या विविध नेत्यावर कारवाई सुरु आहे. ईडी, सीबीआय आणि आता एनसीबीच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं आहे. अशातच शिवसेना महाविकास आघाडीसोबत जरी असली तरी सावरकरांना भारतरत्न देण्याची त्यांची आजही आग्रही मागणी राहिली आहे. त्यामुळे शिवसेनेचं सावरकर प्रेम अजुनही कमी झालेलं नाही. त्यामुळं नव्यानं सावरकरामुळे सुरु झालेल्या वादावर उद्धव ठाकरे खरपूस समाचार घेतील.लखीमपूर प्रकरणात केंद्र सरकारचा चिडीचूपपणा, महाराष्ट्र बंद शेतकरीविरोधी धोरणं यावर उद्धव ठाकरे आवर्जुन बोलणार राज्यातल्या शेतकरी धोरणं जाहीर करतील. कोरोना काळात मुंबई महाराष्ट्र वगळता ॲाक्सिजन आणि लसीवरून जे राजकारण रंगलं त्यावरून उद्धव ठाकरे जाहिरपणे बऱ्याचवेळा बोलले, पण आगामी निवडणुकांच्या पाश्वर्भूमिवर राज्यात काय काय केलं? हे सांगायला ठाकरे विसरणार नाहीत. तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त सदस्यांची नावं भगतसिंग कोश्यारी मंजूर करत नाहीत. तसेच विविध धोरणात राज्यपाल आणि सरकारमध्ये एकमत नसतानाचे बरेच किस्से आहेत. त्यामुळे ठाकरे राज्यपालांचाही समाचार घ्यायला विसरणार नाहीत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबईत लष्कराचं संग्रहालय उभं करणार - उद्धव ठाकरे
महाराष्ट्राला बदनाम करण्याचा विकृतपणा, मुंबईत लष्कराचं संग्रहालय उभं करणार, चीनमधून बाहेर पडणाऱ्या कंपन्या महाराष्ट्रात आणायचा प्रयत्न, सीमेवरील वातावरणाप्रमाणे संग्रहालयात वातावरण उभं करणार - उद्धव ठाकरे