Maharashtra Breaking News Live Updates: महायुती सरकारच्या शपथविधीचा घोळ कायम, मुंबईत घडामोडींना वेग, एकनाथ शिंदेच्या भूमिकेकडे लक्ष
Maharashtra Election Results News Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
आज दुपारी 3 वाजता दर्यापूर अकोला मार्गावर लासुर फाट्याजवळ दोन चारचाकी वाहनात जोरदार धडक झाली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. एका वाहनात चार जण होते तर दुसऱ्या वाहनात दोन जण प्रवास करत होते. जखमींना अकोला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे निरीक्षक उद्या रात्रीपर्यंत मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 4 डिसेंबर रोजी सकाळी भाजपच्या विधीमंडळ गटनेते पदाची बैठक पार पडणार असल्याचेही समजते.
उद्या मारकडवाडी येथे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या तयारीत असलेल्या प्रमुख 20 पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण बनण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासनाच्या दबावानंतर ग्रामस्थ काय भूमिका घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर नेत्यांची लगबग सुरु असल्याचे दिसून येत आहे. मंत्रीपदासंदर्भात चर्चेत असणारी नावं सागर बंगल्यावर दाखल होत असल्याने घडामोडींना वेग आला आहे. माधुरी मिसाळ, चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर, गिरीश महाजन यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
गेल्या दोन दिवसात दहा ते बारा श्वान विष प्रयोगामुळे मृत्युमुखी पडल्याची घटना. या प्रकारणी अद्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल. प्राणी मित्रांकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी करण्याची मागणी. गेल्या काही दिवसात नागरिकांना श्वान चावण्याचे प्रमाण वाढल्याने हा विष प्रयोग होत असल्याची चर्चा. या घटनेचा प्राणी मित्रांकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे
गोसीखुर्द धरणाच्या नहराच्या अंडरग्राउंड पाईपलाईनचं काम सुरू असून येथील विद्युत जनित्राचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना लाखनी तालुक्यातील पालांदूर पोलीस स्टेशन हद्दीतील ढीवरखेडा शेतशिवारात रविवारी सायंकाळी घडली. अनिकेत उर्फ अमर शेंडे (28) रा. खुनारी असं मृतक कामगाराचं नाव आहे. अंडरग्राउंड पाईपलाईन जोडणीचं काम करणाऱ्या अहमदाबाद येथील एलसीसी प्रोजेक्ट कंपनी प्रशासनानं कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कुठलीही उपाययोजना केली नसल्याचं यावेळी स्पष्ट झाल्यानं पालांदूर पोलिसात कंपनी व्यवस्थापकासह चौघांविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर धाराशिव येथील मामा-भाच्याची जोडी विधानसभेत पोहोचली आहे. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आमदार झाले आहेत. तर त्यांचे भाचे अभिजित पाटील माढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. कैलास पाटील दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. तर अभिजीत पाटील पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले आहेत. धाराशिव जिल्ह्यातही साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांचा संपर्क आहे. त्यामुळेच निकालानंतर मामा भाच्याच्या विजयाचे काम दमदार - मामा भाच्चे आमदार असे बॅनर धाराशिव आणि तुळजापूर शहरात पाहायला मिळत आहेत.
पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी 1 डिसेंबर पासून शासकीय कार्यालये मध्ये हेल्मेट सक्ती केली खरी परंतु शासकीय कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला हरताळ फासलाय. बारामतीतील प्रशासकीय भावना बाहेर कर्मचारी आत मध्ये जाताना फक्त एका व्यक्तीने हेल्मेट परिधान केलं होतं. भूमी अभिलेख, तहसीलदार कार्यालय, प्रांत कार्यालय, जल संपदा, कृषी, दुय्यम निबंधक कार्यालय या प्राशकीय भवनात आहेत. त्यामुळे खरंच जिल्हाधिकाऱ्यांचा या निर्णय कर्मचाऱ्यांनी किती गांभीर्याने घेतलाय, याबाबत साशंकता आहे.
आज सकाळपासून मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी नेत्यांची लॉबिंग सुरू. देवगिरी निवासस्थानी हसन मुश्रीफ, प्रकाश सोळंके यांनी अजित पवारांची भेट घेतली. दुसरीकडे दत्तामामा भरणे यांना मंत्रिपद मिळाव यासाठी लोहार समाजाच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली. लोहार समाजाच्यावतीने देवगिरी निवासस्थानी अजित पवारांना पत्र देऊन कार्यकर्त्यांची विनंती
भारतातील पहिली खोल समुद्रातील मासेमारी स्पर्धा (डीप सी बोट फिशिंग) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनाऱ्यासमोर खोल समुद्रात पार पडली. “कोकण एक्स्ट्रीम एंजलर्स” च्या मार्फत खोल समुद्रात रॉड फिशिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली. देशभरातून 12 संघांनी म्हणजे 59 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. यात राज्यासह गोवा, कर्नाटक, केरळ, गुजरात येथील स्पर्धक सहभागी झाले होते. यावेळी स्पर्धकांनी विविध प्रकारचे मासे खोल समुद्रात रॉड फिशिंगच्या माध्यमातून पकडले.
मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील लिंक रोड वरून बीएमडब्ल्यू कार चालवणाऱ्या चालकाला अचानक फिट आल्याने कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने दुचाकीसह दोन रिक्षांना जोरदार धडक दिली. या घटनेत तीन जण जखमी झाले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास डी एन नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एसिक नगर बस स्टॉपवर घडली. घटनेची माहिती मिळताच डी एन नगर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना आणि फिट आलेल्या बीएमडब्ल्यू कार चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
नाशिक जिल्ह्यामध्ये यंदा थंडीची तीव्रता अधिक असल्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत द्राक्षच्या हंगाम सुरू होतो तो मात्र उशिराने होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.ऑक्टोबर- नोव्हेंबर मध्ये अधिक प्रमाणात द्राक्षांची मूळ छाटणी सुरू होते. मात्र, ऐन छाटणीच्या काळात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे हाताशी आलेले उत्पादन खराब झाले आहे. डाऊनी रोगामुळे द्राक्षवर पांढरी बुरशी येते तर करपा रोगात द्राक्षवर घडकुज होत असते यंदा उशिराने झालेली छाटणी आणि फळ फुगवणीच्या काळात वाढलेली थंडी त्यामुळं 50 टक्के द्राक्ष उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक द्राक्ष उत्पादन हे एकट्या नाशिक जिल्ह्यात होत असते. नाशिकमध्ये वाढलेल्या थंडीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आता अडचणीत सापडला आहे.
शेतात घेण्यात येणाऱ्या पिकांची सातबारावर नोंद घेता यावी, यासाठी शासनाच्या वतीनं ई - पीक नोंदणी प्रक्रिया सुरू केलेली आहे. मात्र, ई - पिक नोंदणीच्या ॲपमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची नोंदणी त्या ॲपवर झालेली नाही. परिणामी, सातबारावरही शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाचा नोंद झाली नाही. सध्या धान विक्रीचा हंगाम सुरू झालेला असून शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांसमोर ई - पीक नोंदणीच्या तांत्रिक अडचणीचा खोडा निर्माण झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्री केल्यास बोनस आणि कर्ज माफिसारख्या सवलतींचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो. मात्र, ई - पिक ॲप मध्ये तांत्रिक दोष असल्याचं समोर आल्यानं अनेक शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
महिन्याच्या पहिल्याच सोमवारी बाजारात घसरण. सेन्सेक्स 482अंकांनी घसरला तर निफ्टी देखील 121 अंकांनी खाली. जागतिक बाजारातील संथ सुरुवातीचे भारतीय भांडवली बाजारावर परिणाम
Sindhudurg: ‘फेंगल’ चक्रीवादळाचा कोकणातही परिणाम जाणवत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार दक्षिण कोकणात 3 ते 6 डिसेंबर दरम्यान पाऊस पाडण्याची शक्यता आहे.
सध्या ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे हवामानात बदल होऊन दमट हवामान झालं आहे. तर दोन दिवसापूर्वी तापामनात कमालीची घट झाली होती. मात्र आता तापमानात वाढ होत असल्याने तळकोकणातून थंडी गायब झाली आहे.
ऐन हिवाळ्यात तापमानात वाढ होऊन दमट वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे कोकणासह गोव्यात देखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पावसाचा अंदाज असल्याने आंबा, काजू उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.
Buldhana: केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची रात्री धाड गावाला भेट.
गेल्या २४ तासात कुठलाही अनुचित घटना नाही.
धाड येथील परिस्थिती नियंत्रणात , जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात.
Palghar: पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ .
शाळेय विद्यार्थ्यांना शासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहारात बुरशी आणि जिवंत अळ्या .
पालघर जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या 2 लाख 75,191 मुलांच्या जीवाशी खेळ .
आनंद लक्ष्मण चांदावर विद्यालय खानिवली आणि चिंचणी जिल्हा परिषद शाळा नंबर तीन येथे आलेल्या पोषण आहारात बुरशी आणि जिवंत अळ्या आढळून आल्याने खळबळ .
जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना पोषण आहार पुरवण्याच्या ठेका में. इंडो अलाइड प्रोटीन फुड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे .
पोषण आहार निकृष्ट दर्जाचा येत असल्याच्या या आधीच शाळांच्या तक्रारी मात्र प्रशासनाच दुर्लक्ष .
BJP: भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक केव्हा होईल यासंदर्भात अजूनही संभ्रम...
अद्याप पर्यंत आमदारांना बैठक केव्हा होईल याबद्दल कुठलाही निरोप नाही...
शपथविधी 5 डिसेंबरला होईल, हे निश्चित झाल्यानंतर विधिमंडळ पक्षाची बैठक 2 डिसेंबर किंवा तीन डिसेंबरला होईल अशी शक्यता होती...
मात्र अद्याप पर्यंत आमदारांना त्या संदर्भातले निरोप नसल्याने बरेचसे आमदार त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात आहेत...
त्यामुळे विधिमंडळ पक्षाची बैठक उद्या दुपारनंतरच होण्याची शक्यता आहे...
Politics: कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले दिल्लीत ठाण मांडून…
विधानसभा निकालाचा आढावा व पक्षा अंतर्गत वाढत चाललेले कुरघोडीचे राजकरण याची माहिती पक्षश्रेठीना देण्यासाठी नाना पटोले दिल्लीत…
पक्षांतर्गत विरोधकांच्या प्रदेशअध्यक्ष हटाव मोहिमेला नाना पटोले यांच्याकडून काउंटर सुरू…
पक्षश्रेठींच्या भेटी घेऊन नाना पटोले मांडत आहे आपली बाजू..:
Mumbai Crime: मित्रांसोबतच्या संवादाचे चित्रीकरण कुटुंबीयांना दाखवण्याची धमकी देऊन 14 वर्षांच्या मुलीवर वारंवार अत्याचार
अत्याचार करणार्या ५६ वर्षांच्या आरोपीला अंधेरी येथील डी. एन. नगर पोलिसांनी केली अटक
आरोपीला मदत करणाऱ्या त्याच्या साथीदारालाही डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकारणी पोक्सो कायद्याअंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीला आरोपीने एका मुलासोबत मैत्री करण्यास भाग पाडले.
त्यानंतर त्याच्यासोबत बोलतानाचे चित्रीकरण मोबाइलवर केले. ते चित्रीकरण पीडित मुलीला दाखवून६ तिच्या पालकांना याबाबत सांगण्याची धमकी दिली.
त्यामुळे पीडित मुलगी घाबरली. याप्रकरणी पीडित मुलीने तक्रार केल्यानंतर आरोपीला अटक केली आहे.
Central Railway: मध्य रेल्वे कडून महापरिनिर्वाण दिनानिमित्त 8 दिवस प्लेटफॉर्म तिकीट विक्री बंद
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काही निवडक रेल्वे स्थानकावर प्लेटफॉर्म तिकीट विक्री बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे ने घेतला आहे
आज पासून ९ डिसेंबर पर्यंत ही विक्री बंद असणारं आहे
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी मुंबईत येतात या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे
यात प्रामुख्याने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि कल्याण या स्थानकांचा समावेश आहे
भुसावळ, नागपूर, पुणे, आणि सोलापूर या ही स्थानकांचा समावेश आहे
Praniti Shinde: निवडणुका जिंकल्यानंतर चेहऱ्यावर आनंद असतो, पण महाराष्ट्र जिंकल्यानंतर देखील मोदींच्या चेहऱ्यावर आनंद नाही
EVM मॅन्यूपुलेट करून निवडणुका जिंकल्याने भाजपच्या कोणत्याच नेत्याच्या चेहऱ्यावर आनंद नाही
सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदेचे वक्तव्य, विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर झालेल्या चिंतन बैठकीत प्रणिती शिंदेचे वक्तव्य
ही लोकशाही पद्धतीने झालेली निवडणूक नव्हती तर काही गोष्टीत भाजपने क्षडयंत्र केल्याचा ही प्रणिती शिंदेचा दावा
पार्श्वभूमी
मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव कायम असलं तरी महायुती सरकारच्या शपथविधीचा घोळ अद्यापही कायमच आहे, महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर नव्या सरकारच्या स्थापनेला चांगलाच वेग आला आहे. सध्या एकनाथ शिंदेच्या भूमिकेकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलंय. राज्यात आज नेमक्या काय घडामोडी घडणार? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, तर दुसरीकडे राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना हुडहुडी भरली आहे. गाव-खेड्यात शेकोट्या पेटत आहेत. आगामी काळात तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सर्वच घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -