Maharashtra Breaking News Live Updates : माझ्याच पक्षातील नेत्यांनी माझ्याशी गद्दारी केली, संजय गायकवाड यांच्या गौप्यस्पोटाने शिवसेनेत खळबळ
Maharashtra Election Results News Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
मनसेचे अविनाश जाधव यांनी दिला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा
ठाणे पालघर निकालानंतर भूमिका
माझ्याच पक्षातील नेत्यांनी माझ्याशी गद्दारी केली.
आ. संजय गायकवाड यांच्या गौप्यस्पोटाने शिवसेनेत खळबळ.
निवडणूक आयोग झोपा काढत आहे का..?
आ. संजय गायकवाड यांची निवडणूक आयोगावर टीका.
शिवसेना नेते आमदार अनिल परब, मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, बाळा नांदगावकर आणि बाळा नर यांच्यासह 48 शिवसैनिकांची सबळ पुराव्यांअभावी कोर्टाकडून निर्दोष सुटका
साल 2005 मध्ये शिवसेना सोडून बाहेर पडलेल्या नारायण राणे यांची सामनासमोरील सभा उधळल्याचं प्रकरण
घटना घडून 19 वर्षे उलटल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयानं हा निकाल देत या शिवसैनिकांना मोठा दिलासा दिलाय
साल 2005 मध्ये शिवसेना सोडून बाहेर पडलेल्या नारायण राणे यांनी प्रभादेवीच्या नागू सयाजी वाडीत सभा आयोजित केली होती
शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या कार्यालयासमोरच ही सभा घेण्यात आली होती
त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून सभा उधळल्याचा आरोप पोलिसांनी केला होता
याप्रकरणी शिवसैनिकांविरुद्ध दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता
डॉक्टरांची टीम पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तपासणी करण्यास दाखल..
काल मुख्यमंत्री यांना तपासल्यानंतर त्याची तब्येत आता काही प्रमाणत ठीक आहे. त्यामुळे ते आज मुंबईला रवाना होणार आहेत..
भिवंडी शहरातील पोगाव परिसरात असलेल्या झोपडी मध्ये पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली या आगीमुळे झोपडीत ठेवण्यात असलेल्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने भीषण अशी आग लागली या आगीमुळे शेजारी असलेल्या एका दुचाकीला देखील आग लागली आणि या आगीत दुचाकी जळून खाक झाली आहे. सुदैवाने या झोपडीत कोणी राहत नसल्याने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही मात्र भिवंडी अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल होत या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवला आहे.
महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन नागपूरला १६ ते २१ डिसेंबर दरम्यान पार पडणार
प्रश्न उत्तरांचा कालावधी नसल्यानं पहिले अधिवेशन कमी दिवसांचे असणार
पहिल्याच अधिवेशनामध्ये विरोधीपक्ष नेता नसणार
या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींच्या वाढीव रकमेवर निर्णयाची शक्यता
विश्वसनीय सूत्रांची माहिती
बंगालच्या उपसागरातून आलेले फेंजाल नावाचे चक्रीवादळ दक्षिण भारताच्या किनारपट्टीवर धडकल्याने अवघ्या देशातील हवामानावर त्याचा परिणाम दिसणार आहे.
बाष्पयुक्त वार्यांमुळे राज्यात आगामी तीन दिवस म्हणजे ३ डिसेंबरपर्यंत दाट धुके वाढून पारा ३ ते ५ अंशांनी खाली येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे
चक्रीवादळामुळे ४ डिसेंबरपासून थंडीचा कडाका कमी होईल तसेच पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
तर मागील काही दिवसांपासून मुंबईपरिसरात कडाक्याची थंडी वाढल्याचे जाणवत होते.
युगेंद्र पवारांनी मत पडताळणीसाठी अर्ज केलेला आहे. अजित पवार यांच्या विरोधात बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार हे उमेदवार होते. त्यांचा पराभव झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी मत पडताळणीसाठी अर्ज केलेला आहे.
नाशिककरांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. सीबीएस ते म्हाडा वसाहत दरम्यान सिटीलिंक बस सेवा सुरू करण्याचा निर्णय सिटी लिंक प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठी दिलासा मिळणार आहे.
पार्श्वभूमी
मुंबई : सध्या राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागातील सजवळपास सर्वच जिल्ह्यांना हुडहुडी भरली आहे. गाव-खेड्यात शेकोट्या पेटत आहेत. आगामी काळात तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे राज्यात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर नव्या सरकारच्या स्थापनेला चांगलाच वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जवळपास निश्चित झाले आहे. त्यांची फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. असे असताना राज्यात आज नेमक्या काय घडामोडी घडणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले. या सर्वच घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -