बीड : महाराष्ट्र बाल हक्क आयोगाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील मुलांना विहिरीत पोहल्यामुळे नग्न करुन मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ राहुल गांधींनी ट्विटरवर पोस्ट केला होता.


जामनेर तालुक्यातील वाकडी येथे विहिरीत पोहायला गेलेल्या मुलांना नग्न करून त्यांना मारहाण केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. या घटनेसंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओही अपलोड केला. या व्हिडीओतून अल्पवयीन मुलांची ओळख उघड झाल्यामुळे राहुल गांधींना नोटीस बजावण्यात आली.

या घटनेसंबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन चार आरोपींना अटकही करण्यात आली आहे. त्या आरोपींवर "पॉक्सो" अंतर्गत अॅट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या संदर्भात राहुल गांधी यांनी ट्वीट करून पीडित मुलांचा व्हिडिओ अपलोड करुन बाल हक्क कायद्यानुसार उल्लंघन झालं असल्याची तक्रार बाल हक्क आयोगाकडे करण्यात आली.

''बाल न्याय अधिनियम कायद्यातील "कलम 74" नुसार कुठल्याही पीडित बालकाचा फोटो, व्हिडिओ किंवा त्याचे नाव जाहीर करण्याची तरतूद आहे, जेणेकरुन त्यांची ओळख पटणार नाही. राहुल गांधी यांनी पीडित मुलांचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल केल्याने या कायद्याचा भंग झाला आहे. "बाल लैंगिक प्रतिबंधक कायदा" (पॉक्सो) नुसार या आरोपींवर गुन्हा दाखल केलेला असतानाही या कायद्यातील "कलम 23" अन्वये अशा प्रकारचा कुठलाही व्हिडिओ अथवा फोटो प्रसारित करणे गुन्हा मानन्यात येतो,'' असं सांगण्यात आलं आहे.

संबंधित बातमी :

विहिरीत पोहल्याने जळगावात तिघा मुलांना नग्न करुन मारहाण