नागपूर :  दोन हजारच्या (2000 RS NOTES) नोटबंदीच्या निर्णयानंतर नक्षलवाद्यांजवळ असलेल्या दोन हजारच्या नोटा बदली करण्यासाठी  नक्षलवाद्यांची धडपड सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर त्यांच्या हालचाली वाढल्या असून रांजणगाव येथे दोन नक्षल समर्थकांना नोटा बदलीला जात असतांना अटक करण्यात आल्याचे महाराष्ट्र नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख संदीप पाटील यांनी सांगितले. नोटबंदीनंतर नक्षल स्थानिक व्यापारी, व्यावसायिक व तेंदूपत्ता कंत्रादार यांच्यावर दबाव आणून नोटा बदली करण्याची शक्यता आहे.


गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याला अलर्ट


माओवादी चळवळ चालवताना माओवाद्यांना मोठ्या प्रमाणात पैशाची गरज असते. माओवाद्यांकडे हे पैसे एक तर खंडणीच्या माध्यमातून  येतात किंवा त्यांच्या समर्थकांनी पाठवलेला असतो. जंगलात हा पैसा हाताळताना माओवादी दोन हजारच्या नोटेला अधिक प्राधान्य देत होते. कारण एक तर दोन हजारच्या नोटा जंगलात हाताळताना सोपे जायचे किंवा जमिनीखाली लपून ठेवताना त्या नोटांचा आकार लहान असायचा. महत्वाचे म्हणजे शस्त्र किंवा उपकरणे खरेदीसाठी पैसा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवताना दोन हजारच्या नोटा माओवाद्यांसाठी सर्वोत्तम चलन होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजारांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता माओवाद्यांची कोंडी झाली आहे.


गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याला अलर्ट


नोटबंदीच्या निर्णयानंतर माओवादी दोन हजारच्या नोटांची बदली करण्यासाठी धडपड करतांना दिसत आहे. रांजणगाव येथे दोन नक्षल समर्थकांना सहा लाखाच्या किमतीच्या नोटांची बदली करतांना अटक करण्यात आली. त्या तपासात माओवादी दोन हजाराच्या नोट बदलीसाठी कंत्राटदार व व्यापाऱ्यांवर दबाव टाकत आहे. धक्कादाय बाब म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील तोडगट्टा येथून  छत्तीसगडच्या शिलगर येथील नक्षल समर्थक आंदोलनाला पैसे पाठवत असल्याचे पुढे आले. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याला अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं पोलिसांची या सर्वांवर बारीक पाळत असल्याचं महाराष्ट्र नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख संदीप पाटील यांनी सांगितलं आहे.


30 सप्टेंबरपर्यंत जमा करता येणार नोटा


दोन हजाराची नोट चलनातून परत घेण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जाहीर केला आहे. चलनातील या दोन हजार रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत सर्व सामान्य नागरिकांना कुठल्याही बँकेत जमा करण्याची मुभा देण्यात आली आहे. भारतातल्या सर्व बँकांमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत जेवढ्याही दोन हजाराच्या नोटा जमा होतील त्या सर्व 2000 च्या नोटा आरबीआयकडे परत पाठवल्या जाणार आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Chhattisgarh Naxal Arrest: छत्तीसगढमध्ये नोटा बदलण्यासाठी आलेल्या दोन नक्षल्यांना अटक, बीजापूर पोलिसांची कारवाई