Agriculture News : एकीकडे पाऊस व गारपिटीने राज्यातील शेतकरी (Farmes) हैराण आहे. गारपिट व पावसाने आपला हरभरा खराब होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांना तो हरभरा खरेदी केंद्रांवरती विकायचा आहे. मात्र राज्यात नाफेडद्वारे (Nafed) चालवण्यात येणारी बहुतांश हरभरा खरेदी केंद्रे अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. नाफेडकडे हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यासाठीचे बरेच प्रस्ताव प्रलंबित आहेत. राज्य सरकारने नाफेडला सांगून सदर प्रलंबित प्रस्ताव तातडीने मार्गी लावून शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केली आहे.


दरम्यान यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, बीड जिल्ह्यात केवळ 5 हरभरा खरेदी केंद्रे सुरू केले आहेत. गारपिट व पावसाने आपला हरभरा खराब होऊ नये, म्हणून हरभरा खरेदी केंद्रांवरती विकण्यासाठी शेतकरी धरपड करत आहेत. परंतु नाफेडद्वारे चालवण्यात येणारी बहुतांश हरभरा खरेदी केंद्रे अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे नाफेडशी चर्चा करून हरभरा खरेदी केंद्र सुरू करायली हवीत. तसेच नाफेड कडील प्रलंबित प्रस्ताव तातडीने मान्य करायला लावण्याची भूमिका सरकारने घ्यावी, अशी आग्रही मागणी धनंजय मुंडे यांनी केली. 


फडणवीस यांचे उत्तर...


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी धनंजय मुंडे यांच्या मागणीची दखल घेऊन नाफेडने हरभरा खरेदी केंद्रांना मान्यता दिली आहे. काही हरभरा खरेदी केंद्रांनी मागील वर्षी खरेदीत अनियमितता केल्यामुळे नाफेड कडून प्रस्ताव तपासून घेतले जात आहेत. तरीही शेतकऱ्यांची अडचण होऊ नये म्हणून खरेदी केंद्रांचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ निकाली काढले जावेत, अशा सूचना नाफेडला करण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलताना दिली.


शेतकरी हतबल...


आधी अतिवृष्टी आणि आता अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात आहे. अशात रब्बीचे पिके काढून विकण्यासाठी बळीराजाची धरपड सुरु आहे. त्यातच सोंगणी केलेला हरभरा होईल तेवढ्या लवकर विकण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहे. अशात आपला हरभरा नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्रावर विकला जावा असे शेतकऱ्यांना वाटत आहे. परंतु राज्यात अनेक ठिकाणी अजूनही हरभरा खरेदी केंद्र सुरु झालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या : 


Nashik Abdul Sattar : संप संपला! कृषिमंत्र्यांसह अधिकारी बांधावर; नाशिकमध्ये पंचनाम्यांना सुरुवात