Maharashtra Cabinet: गुजरातमध्ये अवघ्या रात्रीमध्ये मुख्यमंत्री सोडून संपूर्ण मंत्रिमंडळ बदलण्यात आल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक वर्ष पूर्तीच्या निमित्ताने काही बदल होणार का? याची चर्चा रंगली होती. मात्र, राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनंतर महायुतीमधील मंत्र्यांच्या कामाचं ऑडिट केलं जाणार आहे. मात्र, गुजरातप्रमाणे तूर्त कोणत्याही स्वरूपात मंत्री मंडळामध्ये बदल केला जाणार नसल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
तूर्तास कोणताही बदल होणार नाही
गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील मंत्री सुद्धा वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडले आहेत. अनेक मंत्र्यांकून अत्यंत धार्मिक तेढ निर्माण करावी वक्तव्य केली जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर काही मंत्र्यांना दिला जाणार का? अशी सुद्धा चर्चा रंगली होती. गुजरातमध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर याची चर्चा महाराष्ट्रामध्ये सुद्धा होऊ लागली होती. मात्र, आता बदल होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
मतदारयाद्यांच्या आरोपांवरून भाजप प्रत्युत्तर देणार
दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून मतदारयाद्यांचा मुद्दा कळीचा करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांनी फास आवळला आहे. या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीला भाजपने सुद्धा प्रतिउत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला कसा फायदा झाला याचा पुरावा भाजप पुराव्यासकट बाहेर काढणार आहे.
गुजरात सरकारमध्ये सर्जिकल स्ट्राईक
दुसरीकडे, गुजरातमध्ये, भाजपने अवघ्या तीन वर्षांत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता जवळजवळ संपूर्ण सरकार बदलले आहे. गुरुवारी, 16 मंत्र्यांनी राजीनामा दिला आणि शुक्रवारी 26 मंत्र्यांनी शपथ घेतली. मंत्रिमंडळात 19 नवीन चेहरे आहेत, तर मागील मंत्रिमंडळातील फक्त सहा मंत्र्यांनी त्यांचे पद कायम ठेवले आहे. आठ ओबीसी, तीन एससी, चार एसटी आणि तीन महिला आहेत. मुख्यमंत्र्यांसह आठ मंत्र्यांवर कोणतेही आरोप किंवा कायदेशीर खटले नव्हते.
उल्लेखनीय म्हणजे, काढून टाकलेल्या मंत्र्यांवर कोणतेही आरोप किंवा कायदेशीर खटले नव्हते. असे असूनही, 2027 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून या मोठ्या सरकारी फेरबदलाकडे पाहिले जात आहे. मुख्यमंत्री पटेल यांनी गुरुवारी संध्याकाळी मंत्र्यांना खातेवाटप केले. उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांना गृहखात्यात पुन्हा सोपवण्यात आले आहे. कनुभाई देसाई यांना अर्थखात्या देण्यात आल्या आहेत आणि क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा जडेजा यांना शिक्षणखात्या देण्यात आल्या आहेत.
भूपेंद्र यांचे हे तिसरे मंत्रिमंडळ
भूपेंद्र सप्टेंबर 2021 मध्ये पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले. त्यानंतर विजय रुपाणी यांना अचानक काढून टाकण्यात आले आणि त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले. विधानसभा निवडणुकीनंतर 12 डिसेंबर 2022 रोजी ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आणि 16 आमदार मंत्री झाले. आता नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाले.
इतर महत्वाच्या बातम्या