Maharashtra Politcal Updates: महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) प्रचंड उलथापालथ सुरू आहे. राज्यातील जनतेनं गेल्या दोन वर्षांत नव भूतो न भविष्यती राजकारणातील अनेक मोठ्या घडामोडींचा अनुभव घेतला आहे. अशातच आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप घडणार असल्याचा दावा शिंदे गटातील एका खासदारानं केला आहे. त्यामुळे राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ माजली आहे. आधी शिवसेना (शिंदे गट) (Shiv Sena Shinde Group), नंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) (NCP Ajit Pawar Group) आणि आता महाराष्ट्र काँग्रेसमधील मोठा गट महायुतीत सहभागी होण्याच्या तयारीत असल्याचा दावा बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केला आहे.
बुलढाणा जिल्ह्याचे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी एक दावा केला आहे. खासदार प्रतापराव जाधव यांच्या दाव्यानुसार, विरोधी पक्ष नेत्याची निवड करताना काँग्रेसमधील बड्या नेत्यांना डावलल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचा मोठा गट अस्वस्थ आहे. हा गट लवकरच एक मोठा निर्णय घेणार असून महायुतीमध्ये काँग्रेसचे अनेक नेते सहभागी होणार आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय भूकंपाची मालिका संपली नसून आणखी एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यताही यावेळी बोलताना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी वर्तवली आहे.
वडेट्टीवारांना विरोधी पक्षनेते पद दिल्यामुळे काँग्रेसमधील वरिष्ठ नेते अस्वस्थ : खासदार प्रतापराव जाधव
बुलढाण्यातील शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव म्हणाले की, "काँग्रेसमध्येही एक मोठा गट तयार झाला आहे. विरोधी पक्ष नेत्याची निवड करताना पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांना डावलून वडेट्टीवार यांच्यासारख्या ज्युनिअर नेत्याला विरोधी पक्ष नेते पद दिल्यामुळे काँग्रेसमधील सर्व वरिष्ठ नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यांची नावं घेण्याची गरज नाही, त्यांच्याबाबत तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तसेच, योग्य आणि मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ही सर्व मंडळी आहेत."
"जसं शिवसेनेचा एक मोठा गट महायुतीमध्ये सामील झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचाही मोठा गट महायुतीमध्ये सहभागील झाला. आता काँग्रेसचाही मोठा गट महायुतीत सहभागी होण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेसचे अनेक नेते आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. काँग्रेसचे नेते, आमदार, खासदार... खासदार तर त्यांच्या नाहीयेत, पण आमदार महायुतीमध्ये नक्की सहभागी होतील. आता नेमका आकडा मला माहिती नाही. पण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार आहे.", असा दावा शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :