Maharashtra Budget Session 2023 : मंत्रिपदासाठी पुढे पुढे करता, पण कामकाजाच्या वेळी अनुपस्थित का राहता? असा सवाल करत भाजप (BJP) आमदार कालिदास कोळंबकर (Mal Kalidas Kolambkar) यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. विधानसभेत सात मंत्री उपस्थित नसल्यामुळे विशेष बैठकीचे कामकाज उद्यावर ढकलण्याची वेळ आली आहे. सभागृहात आमदारांकडून मंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. सभागृहात केवळ एकाच लक्षवेधीला उत्तर देण्यासाठी एकच मंत्री उपस्थित होते. इतर लक्षवेधीसाठी मंत्री अनुपस्थित असल्यामुळं तालिकाध्यक्ष संजय शिरसाट यांनीही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. 


सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाचा तिसऱ्या आठवड्यातील आज तिसरा दिवस आहे. आजच्या दिवशी मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विधानसभेत सात मंत्री उपस्थित नाहीत. सभागृहात उपस्थित सदस्यांची जी भावना आहे तीच नाराजीची भावना आपली देखील असल्याचे मत तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं. मी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कळवल्याचे शिरसाट म्हणाले. संबंधित विभागाचे मंत्री सभागृहात नसल्याने आजच्या सभागृहाचं कामकाज थांबवावं लागलं. यावर काल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) संतप्त होऊन बोलले होते. नंतर संबंधित मंत्र्यांना योग्य ती ताकीद दिली जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं होतं. मात्र दुसऱ्या दिवशीही तीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. 


हे मंत्री कशासाठी झालेत? रोहित पवारांचा सवाल 


आम्ही काल रात्री एक वाजेपर्यंत अधिवेशनात थांबलो होतो. लक्षवेधी आज लवकर असल्याने आम्ही लवकर अधिवेशनात आलो. मात्र, उत्तर देणारे मंत्री महोदय अधिवेशनात आलेले नाहीत. हे मंत्री अधिवेशनाला गांभीर्याने घेत नाहीत. नेमकं हे मंत्री कशासाठी झालेत हा प्रश्न उपस्थित होत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार म्हणाले. विधानसभेत सात मंत्री उपस्थित नसल्यामुळे विशेष बैठकीचे कामकाज उद्यावर ढकलण्याची वेळ आली आहे. सभागृहात आमदारांकडून मंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. तसेच भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी तर सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. मंत्रिपदासाठी पुढे पुढा जाता आणि सभागृहात कामाकाजाच्या वेळी अनुपस्थित राहता असा टोला मंत्र्यांना लगावला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Mesma Act Bill: संप सुरु असतानाच 'मेस्मा कायदा' चर्चेविनाच विधानसभेत बहुमताने मंजूर, संपकऱ्यांना विना वॉरंट अटक करण्याची तरतूद