Maharashtra Budget Session 2023 : राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा तिसरा आठवडा आजपासून सुरु होत आहे. गेल्या आठवड्यात अर्थसंकल्प मांडल्यानंतर आजपासून त्यावर चर्चा सुरू होणार आहे. अर्थसंकल्पाशिवाय संजय राऊत यांच्यावरील हक्कभंग प्रकरण, शेतकरी मदत, कांद्याला हमीभाव, यासह अनेक प्रकरणावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्याला सत्ताधाऱ्यांकडूनही प्रत्युत्तर मिळेल. त्यामुळे अधिवेशनाचा तिसरा आठवडा वादळी ठरण्याची शक्यता आहे.  


आधीच कांद्याला भाव नाही, त्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा केली. पण अद्याप शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर पंचनामे करण्यासाठी अधिकारी पोहचले नाहीत. त्यातच आता पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. हा मुद्दा विरोधक सभागृहात उचलून धरण्याची शक्यता आहे. आज यावरुन सभागृहात विरोधक आक्रमक होतील, सरकारकडूनही याबाबत प्रत्युत्तर देण्यात येईल. त्यामुळे अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याचा पहिला दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे.


खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर सभागृहात हक्कभंगाची कारवाई कऱण्यात येणार आहे. त्यासाठी समितीची नेमणूक कऱण्यात आली आहे. संजय राऊत यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. याप्रकरणावर या आठवड्यात सभागृहात गोंधळ होण्याची शक्यता आहे.  सत्ताधारी संजय राऊतांच्या प्रकरणावरुन विरोधकांना गप्प करण्याचा प्रयत्न करतील. त्याशिवाय हसन मुश्रीफ यांना ईडीने चौकशीसाठी बोलवलं आहे, त्यावरुन विरोधक सभागृहात गोंधळ घालू शकतात... त्याशिवाय कांद्याला अनुदान द्यावे, यासाठी विरोधक आक्रमक होतील. तर अर्थसंकल्पाबाबत सत्ताधारी आपलं म्हणणं मांडण्याची शक्यता आहे. 


कोणत्या मुद्द्यावर सभागृह तापणार ?


गेल्या आठवड्यात अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यावर चर्चा सुरू होणार आहे. यावेळी विरोधक आक्रमक होतील.
आज विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे.
अवकळी पावसाने शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालय. त्यांना मदत करावी,
कांद्याला प्रत्येक क्विंटल पाचशे रुपयांचे अनुदान द्यावा अशी मागणी विरोधी पक्षाने केली. 
संजय राऊत हक्कभंग प्रकरणावर सभागृहात गोंधळ होण्याची शक्यता आहे. 
हसन मुश्रीफ यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यावरुनही सभागृहात गोंधळ होण्याची शक्यता आहे.


आणखी वाचा :


धक्कादायक वास्तव! कृषीमंत्री सत्तारांच्या जिल्ह्यात आठवड्याभरात सहा अन् मतदारसंघात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या