Maharashtra Breaking Updates: हिंदी सक्तीविरोधात दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र मोर्चा निघणार
Maharashtra Breaking Updates: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?, अशी चर्चा सध्या महाराष्ट्रभर रंगली आहे. राज्यातील या घडामोडींसह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, पाहा एका क्लिकवर...
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking Updates: हिंदीसक्तीविरोधात ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत. मनसेचा 5 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा आहे. तर 7 तारखेला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मराठी समन्वय समितीचा एल्गार असणार आहे. कोणत्याही राजकीय...More
वाशीम : रिसोडच्या नेंतंसा गावातील गजानन बाजड शेतकऱ्यांचं दोन एकर हळद पिक वाहून गेलंय. तसंच दोन एकरात सोयाबीन पेरणीसाठी आणलेले बी-बियाणे गोठ्यात ठेवलेहोते. मात्र काल कमरे एवढं पाणी शेतात साचल्याने गोठ्यातील बी-बियाणे भिजले आहेत.
धुळे : विधानमंडळाची अंदाज समिती धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेली असताना धुळ्यातील शासकीय गुलमोहर विश्रामगृहात तब्बल एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोख रक्कम सापडली होती. याप्रकरणी धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस प्रशासनाने दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळे न्यायालयात धाव घेत अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याप्रकरणी तक्रार केली होती. न्यायाधीश चौगुले यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर याप्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे.
धुळे : शिंदखेडा येथील शिवाजी चौफुलीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने जोदेमारो आंदोलन करण्यात आले आहे. आमदार बबनराव लोणीकर यांनी जगाचा पोशिंदा शेतकरी व लाडक्या बहिणींविरोधात अपशब्द वापरल्याबद्दल जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी बबनराव लोणीकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच आमदार लोणीकर कुठेही दिसतील, त्यांना त्याच पद्धतीने उत्तर द्या, असेही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले.
वाशिम : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून प्रकल्पात गेल्या 24 तासात 25 टक्के पाणीसाठा झालाय. त्यामुळे वाशिमकरांना दिलासा मिळाला आहे.
शहापूर : शहरातील कुमार हाॅलजवळ उभ्या असलेल्या एका कारला रात्री अचानक आग लागली. ही आग विझवण्यासाठी जीवरक्षक टिमचे सदस्य व शहापूर नगरपंचायतीची अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होत आग विझवली. मात्र या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली आहे. काल संध्याकाळी ही कार चालकाने झाडाला धडक दिल्याने अपघात झाला होता. कारच्या चालकाने अपघात झाला म्हणून ही कार तेथेच सोडून निघून गेला होता. रात्री अचानक या कारने पेट घेतला व संपूर्ण कार जळून खाक झाली. पुढील तपास शहापूर पोलीस करत आहे.
भिवंडी : महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची शिवशाही बस नियंत्रण सुटल्याने ही वडपे भिवंडी रस्त्यावरील दुभाजकावर चढल्याची घटना घडली आहे. नाशिक येथील ठक्कर बाजार बसस्थानकातून संभाजीनगर ते बोरीवली जाणारी बस क्रमांक MH 06 BW 4392 निघाली होती. बसमध्ये एकूण 20 प्रवासी होते मात्र सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही.
बीड : नीट ची तयारी करणाऱ्या अल्पवयीन मुलीचा शिक्षकांकडूनच लैंगिक छळ झाल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून पालक आक्रमक झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ बीडमधील कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यात आले असून कोचिंग क्लासेस परिसरात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त वाढविण्यात आलाय. पोलिसांनी आरोपी शिक्षकांच्या अटकेसाठी विशेष पथक रवाना केले आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे या दोन शिक्षकांचे नाव असून विजय पवार याला राजकीय पाठबळ असल्याचा आरोप पालकांनी केलाय. तर आरोपी शिक्षक विजय पवार हा विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांचा कार्यकर्ता असून त्याचे अनेक फोटो सोशल माध्यमावर वायरल होत आहे.
अकोला : जिल्ह्यातील शेगाव अकोट मार्ग आज सकाळपासून वाहतूकीसाठी बंद करण्यात आलाय. बाळापूर तालुक्यातल्या लोहारा येथील मन नदीच्या पुलाला काल पाऊस आणि पुरामुळे मोठी भेग पडलीय. याशिवाय पुलाचा काही भाग खचलाय. त्यामूळे संभाव्य धोका टाळण्यासाठी हा मार्ग बंद करण्यात आलाय. सध्या या मार्गावरील वाहतूक इतर मार्गांनी वळविण्यात आलीये. दुपारनंतर या पुलाच्या डागडूजीला प्रारंभ होण्याची शक्यता आहेय.
महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदीसक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, अशी एक्स पोस्ट खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे हिंदीसक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचं निश्चित झालं आहे.
रायगड : रोहा तालुक्यातील मौजे नागोठणे येथील शहराला जोडणारा आंबा नदीवरील मोघलकालीन पूल अखेर बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलाय. पुल अरुंद व कमकुवत झाल्यामुळे अपघाताचा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सदर पुलावरील वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णतः बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. एबीपी माझाने दोन दिवसांपूर्वी पुलाचा तुटलेला कठड्याचा भाग आणि पुलाची कमकुवत झालेली परीस्थिती दाखविली होती. त्यानंतर आता हा पूल सर्व वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पुलावरून वाहतूक बंद करण्यात येणार असल्यामुळे नागरिकांसाठी पर्यायी मार्ग म्हणून वरवठणे–आंबेघर फाटा–रिलायन्स चौक–नागोठणे हा मार्ग वाहतुकीसाठी निश्चित करण्यात आला आहे.
भिवंडी-वाडा रस्त्याच्या दुरावस्थेच्या विरोधात श्रमजीवी संघटनेचे आंदोलन तब्बल 12 तास चालले. सकाळी 11 वाजता सुरू झालेले हे आंदोलन रात्री 11 नंतर संपवण्यात आले. आंदोलनाच्या नेतृत्वात दत्तात्रय कोलेकर, बाळाराम भाऊ, विजय जाधव, अशोक सापटे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. मुख्यमंत्री कार्यालय व बांधकाम मंत्र्यांनी याची गंभीर दखल घेत ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी व गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कृती आराखडा तयार करून उद्यापासून काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. भिवंडी-वाडा व चिंचोटी परिसरातील 11 ठिकाणी एकाच वेळी रास्ता रोको झाल्यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. मात्र मिळालेल्या आश्वासनानंतर हा आंदोलन संपवण्यात आला आहे
आज शिवसेनेचे मुखपृष्ठ सामनाच्या फ्रंट पेजवर राज ठाकरेंची फोटोसह बातमी
सामानाच्या पहिल्याच पानावर आज उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेच्या फोटोच्या बाजूला राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचा फोटो छापून "राज ठाकरे यांनी दादाचा भुसा केला" अशी बातमी सामनाने आज छापली आहे
सामनाच्या पहिल्याच पानावर ठाकरे बंधूंचा आजूबाजूला फोटो छापून हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र विरोधी आंदोलनाची बातमी.
हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र विरोधात उद्धव ठाकरेंच्या भूमिकेच्या अगदी बाजूला राज ठाकरेंची भूमिका सामनाने आज छापली आहे
काल विदर्भातील वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे या पावसाचा परिणाम विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरून वाहत असलेल्या पैनगंगा नदीवर पाहायला मिळतोय कालच्या पावसामुळे पैनगंगा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे नदी पात्रात दूर दूर पर्यंत फक्त पाणीच पाहायला मिळतंय नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतीला काहीसा फटका बसण्याची शक्यता आहे.
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने पालखेड धरण ८० टक्के भरले असून, धरणाच्या १४ गेट पैकी सात गेट एक फुटाने वर करून धरणामधून कादवा नदीपात्रात ५७५४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे..नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
दापोली:उधाणाच्या लाटांचा वेळास गावाला तडाखा...रस्त्याची झाली धूप. प्रचंड कचऱ्यामुळे वाहतुकीला अडथळा.
शेतीसाठी सरकार तंत्रज्ञान घेऊन येत आहे. त्यासाठी 500 कोटींची तरतूद करण्यात आली. ऊस उत्पादन वाढीसाठी याचा वापर केला जाणार आहे. मात्र शेतकरी नेते राजू शेट्टी ने तंत्रज्ञान सोयीच्या पद्धतीने वापरले जात असल्याचा आरोप करत पवार काका पुतण्यांवर निशाणा साधला आहे. साखर कारखान्यांकडून काटे मारले जातात, कमी रिकवरी दाखवून दर मारला जातो यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नियंत्रण आणणं शक्य आहे. मग त्यासाठी तंत्रज्ञान का वापरल जात नाही. सोयीच्या पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर का केला जातो याचे उत्तर पवार काका पुतणे आणि सरकारने द्याव अस राजू शेट्टी म्हणाले.
मराठी-हिंदी वादाचे राजकारण भाजप हाणून पाडणार
भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत रणनीती ठरली
मराठी-हिंदीवरून सुरू असलेल्या राजकारणाला आता मराठी अभिजात भाषेचा तडका
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच झाल्याचे भाजप लोकांपर्यत पोहोचवणार
दर्जा मिळाल्याने त्याचा मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कसा फायदा होणार हे जनतेत जाऊन सांगणार
काल वाशिम, अकोला जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला मोठा पूर आलेला आहे. हवामान खात्याने आज पुन्हा अकोला,वाशिम, बुलढाणा जिल्ह्याला येलो अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे प्रशासनाने बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी पुन्हा लांबणीवर...३० जून रोजी यादी जाहीर होणार असल्याची शिक्षण संचालनालयाची माहिती...१२ लाख ७१ हजार विद्यार्थी प्रतीक्षेत...
शक्तिपीठ महामार्गविरोधात एक जुलैला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन, काँग्रेसच्या सतेज पाटलांचा इशारा...धाराशिवमध्ये शेतकरी आंदोलनानंतर महामार्गाची मोजणी प्रक्रिया थांबवली...
हिंदी इतर कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही, गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान...हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं...
ठाकरे बंधूंचे दोन वेगवेगळे मोर्चे एकाच दिवशी काढण्यासाठी प्रयत्न...मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही हालचाली...मोर्चात ठाकरे बंधू एकत्र दिसणार का, याची उत्सुकता...
हिंदीसक्तीविरोधात ठाकरे बंधू मैदानात...मनसेचा ५ जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा...तर सात तारखेला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मराठी समन्वय समितीचा एल्गार...
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking Updates: हिंदी सक्तीविरोधात दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र मोर्चा निघणार