Maharashtra Breaking Updates: धाराशिवमधील शक्तीपीठ महामार्गाची मोजणी प्रक्रिया थांबवली, शेतकरी आंदोलनाचा धसका
Maharashtra Breaking Updates: राज्यभरात विविध भागात पाऊस कोसळतो आहे. तसेच पंढरपुर वारीचा उत्साह देखील शिगेला पोहचला आहे. राज्यातील या घडामोडींसह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, पाहा एका क्लिकवर...
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking Updates: राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. हिंदीसक्तीवरून मनसे आक्रमक झाल्यामुळे दादा भुसे भेट घेणार आहेत. त्यामुळे राज ठाकरेंना समजावण्यात भुसेंना यश...More
राष्ट्रवादीचे नेते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर
शरद पवार यांनी घेतलं कसबा बावडा परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं दर्शन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर पुष्पहार अर्पण करून शरद पवारांनी केलं अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दोन्ही हातात शस्त्र असणारा कोल्हापुरातील एकमेव पुतळा
पुतळ्याच्या वैशिष्ट्यांसह पुतळा निर्मितीची ऐकली शरद पवारांनी माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून गोष्ट
शरद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना केलं अभिवादन
वाशिम
रात्री पासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील एरंडा गावाला चारही बाजूंनी पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणाऱ्या अडाण नदीला आलेल्या भीषण पुरामुळे गावाच्या पूर्व बाजूस मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्याचबरोबर उत्तरेकडील पूर्ववाहिनी लेंडी नाल्यालाही पूर आल्याने गावाच्या दुसऱ्या बाजूनेही पाणी घुसले आहे. यामुळे संपूर्ण गाव जलमय झाले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
पुराच्या पाण्याने गावाचा तालुक्याशी व जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. गावात वीजपुरवठाही खंडित झाल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचं चित्र आहे
वसई : वसई पूर्वेकडील फादरवाडी परिसरातील एका भंगार गोदामाला आज दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. विद्याविकासनी शाळेच्या पाठीमागे असलेल्या या गोदामात इलेक्ट्रिक वस्तू, जुन्या फ्रीज, एसी आणि अन्य भंगार साहित्य साठवले होते. ही आग आज दुपारी सुमारे 2.45 वाजण्याच्या सुमारास लागली. आग इतकी भयानक होती की परिसरात धुराचे लोट पसरले आणि कल्लोळ माजला. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार तेथे शेडच्या वेल्डींगचं काम चालू असताना आग लागली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगीची माहिती मिळताच वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. गोदाम पूर्णपणे आगीच्या भक्षस्थानी गेले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात मालाचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. आग लागलेल्या ठिकाणी नागरिकांची गर्दी झाल्याने पोलिसांनी परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे. आग नेमकी कशामुळे लागली? याबाबत अग्निशमन आणि पोलिस विभागाकडून तपास सुरू आहे.
धाराशिवमधील शक्तीपीठ महामार्गाची मोजणी प्रक्रिया थांबवली, शेतकरी आंदोलनाचा धसका
राजू शेट्टी यांच्या बैठकीत धाराशिव प्रशासनाचा निर्णय
शेतकऱ्यांच्या विरोधापुढे सरकार अखेर झुकले
शेतकऱ्यांचा विरोध झुगारून प्रशासनाकडून करण्यात येत होती मोजणी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात केली प्रशासनासोबत चर्चा
शक्तीपीठ महामार्गाच्या चर्चेला जिल्हाधिकारी गैरहजर, राजू शेट्टी व्यक्त केली नाराजी
पुणे : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारीमधील शाहीस्नान सोहळा आज नीरा नदीमध्ये पार पडलाय. पुरंदर तालुक्यातील नीरा नदीच्या काठावर आज हा सोहळा दुपारच्या विसाव्यासाठी थांबला होता. विश्रांतीनंतर हा सोहळा दुपारी 2 वाजता निरा स्नानासाठी मार्गस्थ झाला. माऊलींच्या पादुका रथातून बाहेर काढून नीरा नदीवरील दत्त घाटावर आणण्यात आल्या. यानंतर माऊली माऊली असा एकच जयघोष सुरू झाला. मंगलमय वातावरणात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान घालण्यात आले. यानंतर माऊलींना तुळशीहार अर्पण करण्यात आला. यानंतर हा सोहळा हैबतबाबांचे जन्मस्थळ असलेला सातारा जिल्ह्याकडे मार्गस्थ झाला. संत ज्ञानेश्वर माऊलींचा आजचा सोहळा हा लोणंदमध्ये मुक्कामी असणार आहे.
दादा भुसे बाईट
शालेय शिक्षणामध्ये तीस-या भारतीय भाषेच्या समावेशाबाबत राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली
माझ्याबरोबर विभागातील अधिकारीही होते...
तिस-या भाषेचा समावेश आवश्यक का आहे हे आम्ही राज ठाकरेंसमोर ठेवले
त्यांना आमची भूमीका मान्य नाही असं दिसतं आहे
आजची चर्चा झाली ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहेचवणार
राज ठाकरेंच्या सूचना-
हिंदीसंदर्भात नकारात्मक भूमीका राज ठाकरेंची आहे
कला; क्रीडा विषयांचा अभ्यासक्रमातील गुणांकनासाठी समावेश असावा अशी सूतना राज ठाकरेंनी केलीय
बैठकीत कोणताही तोडगा नाही
Anchor - सुनील तटकरे यांच्या बाळहट्टपणामुळेच रायगडचा पालकमंत्री पद थांबलेला असून जनतेच्या मनातील फक्त भरत गोगावलेच पालकमंत्री आहेत असा दावा शिवसेनेचे शिंदे गटाचे रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी केलाय. विधान परिषदेचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी जनतेच्या मनातील आदिती तटकरे याच पालकमंत्री आहेत असे विधान केले होते.त्यानंतर आता शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी यावर प्रत्युत्तर देत सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राजकीय मतभेदांमुळे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद थांबलेल आहे या आदिती तटकरे यांच्या विधानाला देखील घोसाळकर यांनी प्रत्युत्तर देत हे केवळ सुनील तटकरे यांच्या बालहट्टपणामुळेच रायगडचा पालकमंत्री रखडले असं विधान केलं आहे. जिल्ह्याला पालकमंत्री पद नसल्यामुळे जिल्हा नियोजनाचा समितीचा आराखडा देखील रखडल्याची खदखद त्यांनी व्यक्त केलं आहे. शिवाय रायगड मधील महायुतीच्या 7 आमदार पैकी 6 आमदारांचा पाठिंबा हा मंत्री भरत गोगावले यांच्या बाजूने आहे अस असताना लोकांच्या मनातील असलेल्या गोगावले यांना पालकमंत्री करावे अस वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केलं आहे.
कोल्हापूर
समरजितसिंह घाटगे
मंत्री हसन मुश्रीफ यांना उच्च न्यायालयाचा कोणताही दिलासा नाही
उच्च न्यायालयाने कागल न्यायालयातच केस चालवण्याच्या सूचना दिल्या आहेत
समरजित घाटगे यांचा दावा
मी एक वेळ राजकारणात मागे पुढे होईन, मात्र लीगल फॅक्ट्स कधीही चुकणार नाही
संताजी घोरपडे संदर्भातील मनी लॉन्ड्रींची केसच चुकीची आहे
ती केस रद्द करा म्हणून हसनमुश्रीफ यांनी न्यायालयात धाव घेतली होती
मात्र त्यावेळी देखील कोर्टाने त्यांना कोणताही दिलासा दिलेला नाही
आज ही कोणताही दिलासा मुश्रीफ यांना मिळालेला नाही
कागल न्यायालयात ही केस सुरूच राहणार आहे
बीडच्या केज मधील कृषी कार्यालयामध्ये शुकशुकाट...साडेअकरा नंतरही एकच कर्मचारी उपस्थित
कार्यालयात कर्मचारी नसतील तर शेतकऱ्यांची कामे होणार कशी? तरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांचा सवाल
बीडच्या केज येथील तालुका कृषी कार्यालयात साडेअकरा वाजेपर्यंत केवळ एकच कर्मचारी उपस्थित होता. शेकापचे भाई मोहन गुंड यांनी या ठिकाणी भेट दिली असा हा प्रकार समोर आलाय. या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जवळपास 25 कर्मचारी अधिकारी कार्यरत आहेत.
परंतु या ठिकाणी एकच कर्मचारी उपस्थित असल्याने कार्यालयात शुकशुकाट होता. याबरोबरच या ठिकाणी जे काही शेतकरी आपल्या कामानिमित्त आले होते त्यांना देखील या अधिकारी कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा करण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. अशा पद्धतीने कारभार चालत असेल तर शेतकऱ्यांची कामे कशी होणार? असा सवाल आता गुंड यांनी उपस्थित केलाय.
: बीडच्या श्रीक्षेत्र नारायण गडाच्या उत्तराधिकारी वरून नवा वाद समोर आलाय.. नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी त्यांचे भाचे संभाजी महाराज यांना उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. मात्र पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी याला विरोध दर्शवत उत्तराधिकारी म्हणून संभाजी महाराज मान्य नाहीत असा सूर बैठकीतून घेतला. कालच श्रीक्षेत्र नारायण गडाच्या दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. याच्या एक दिवस आधीच नारायण गडावर ग्रामस्थांनी बैठक घेत उत्तराधिकारी नेमण्याला विरोध केला. या बैठकीला मात्र महंतांनी गैरहजेरी लावली.. आता नातेवाईकाचे नाव उत्तराधिकारी म्हणून जाहीर केल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत याला विरोध केला. त्यामुळे आता या वादामुळे नारायण गड चर्चेत आलाय.
साऊंड बाईट: बैठकीतील ग्रामस्थ
वाशिम : जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने जिल्ह्यात अनेक भागात दाणादाण उडवल्याचे चित्र आहे. संभाजीनगर ते नागपूर या जुन्या महामार्गावर असलेल्या पुलावर आणि रस्त्यावर पूर आल्याने संभाजीनगर-नागपूर महामार्गावर पाणी साचले आहे. यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. विशेषतः पिंपरी सरहद्द परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
लातूर : आर्वी भागात एका महिलेला अंगावर गाडी घालत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दोन महिलांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला आणि यामध्ये एका महिलेला अंगावर गाडी घालत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान या प्रकरणी लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाच्या निमंत्रणाला काँग्रेसकडून प्रत्युत्तर
आम्हाला महाराष्ट्रातील मतदार यादी डिजिटल स्वरुपात द्या
तसेच महाराष्ट्र आणि हरियाणा दोन्ही राज्यातील मतदानाचे व्हिडिओ फुटेज देण्यात यावे
काँग्रेसकडून डिजिटल स्वरूपात मतदार यादी आणि मतदानाच्या दिवशीच्या व्हिडिओ फुटेजची मागणी
पुढील एका आठवड्याच्या आत आम्ही मागितलेल्या गोष्टी देण्यात याव्यात
तर आम्ही निवडणूक आयोगाला भेटायला तयार, असे काँग्रेसने म्हटले आहे.
पिंपरी चिंचवड : शहरातील चऱ्होली येथील चोवीसावाडी परिसरात असलेल्या एका विहिरीत एका 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. तिने आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीचे वैष्णवी संतोष इंगवले असं नाव आहे. प्राथमिक दृष्ट्या या तरुणीने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तविला आहे. वैष्णवी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी दिघी पोलिसांत 25 जून रोजी दिली होती. मात्र, ज्या ठिकाणाहून ती बेपत्ता झाली त्या ठिकाणी काही अंतरावर असलेल्या विहिरीजवळ तिची ओढणी आढळून आली. यावर पोलिसांनी अग्निशमन दलाला बोलावून 45 फूट खोल विहिरीमध्ये अंडर वॉटर कॅमेरा सोडून शोध घेण्यास सुरुवात केली. काही वेळातच या कॅमेऱ्यात वैष्णवीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर हा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास दिघी पोलीस करत आहेत.
धाराशिवमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध
शेतकरी नेते राजू शेट्टी आज वानेवाडी येथे शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची भेट घेणार
सलग दोन दिवस वानेवाडी येथील शेतकऱ्यांनी भूसंपादनाला आलेल्या अधिकाऱ्यांना हुसकावून लावले
शेतकरी आणि पोलिसांचे झटापटही पाहायला मिळाली
कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही शेतकऱ्यांची भूमिका,
राजू शेट्टी शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून काय भूमिका घेणार याकडे लक्ष
बुलढाणा : यंदा चांगला पाऊस पडू दे...! शेतकऱ्यांना सोयाबीन व कापसाला चांगला भाव मिळू दे...! व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंबंधी सरकारला सुबुद्धी दे...! असं देवाला साकडं घालत रविकांत तुपकर यांनी त्यांच्या शेतात सपत्नीक पेरणी केली आहे. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाची रिपरीप सुरू आहे आणि त्यामुळे अनेक शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त आहेत अशातच रविकांत तुपकर यांनीही बुलढाणाजवळ असलेल्या त्यांच्या शेतात सपत्नीक पेरणी केली.
शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यावर कर्ज वाढणार; वित्त विभागाचा अभिप्राय
वित्त मंत्री अजित पवार यांच्या विभागाने शक्तीपीठ प्रकल्पासाठी २०,७८७ कोटी रुपयांच राज्याच उच्च आर्थिक दायित्व असल्याचा अभिप्राय
अर्थसंकल्पीय अंदाजानुसार, मार्च २०२६ पर्यंत राज्य सरकारवर ९.३२ लाख कोटी रुपयांचे कर्जाच ओझ येणार असल्याचा अभिप्राय
काय म्हटल आहे वित्त विभागाने?
प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने वाढवलेल्या २०,७८७ कोटी रुपयांच्या कर्ज हमीमुळे "राज्यावर आर्थिक भार पडेल आणि बजेटबाहेरील कर्जाचा राज्याच्या कर्ज घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होईल", अस मंगळवारी अर्थ विभागाने सादर केलेल्या नोटमध्ये म्हटल आहे
देशातील सर्वात मोठ्या रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एकासाठी भूसंपादनासाठी मंत्रिमंडळ मंजुरीपूर्वी. प्रकल्पासाठी जास्त दराने कर्ज घेण्याबाबत प्रश्न उपस्थित करत, या नोटमध्ये राज्याच्या आर्थिक स्थितीकडेही लक्ष वेधण्यात आले आहे
मेगा प्रकल्पांसाठी राज्य सरकारच्या (बीओटी) धोरणाचा पुनर्विचार करण्याचा आणि उपलब्ध आर्थिक संसाधनांचा योग्य वापर करून प्रकल्पांना प्राधान्य देण्याचा सल्ला देण्यात आला आहे
मुंबई : आज (२६ जून) दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी या मॉन्सूनमधील सर्वात उंच भरती होणार आहे. यावेळी समुद्रातील लाटांची उंची तब्बल ४.७५ मीटर इतकी असेल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना समुद्रकिनारी जाणे किंवा समुद्रात उतरणे टाळण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खबरदारी बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भरतीच्या काळात किनाऱ्यालगतच्या परिसरात पाणी भरू शकते. त्यामुळे स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मुंबईकरांनी अनावश्यक धाडस टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
धुळे तालुक्यातील देवभाने येथे मुंबई आग्रा महामार्गावर बर्निंग बसचा थरार.
इंदोरच्या दिशेने जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स भर रस्त्यात अचानक घेतला पेट.
सुरुवातीला टायर पेटल्याचे लक्षात आल्यानंतर चालकाच्या प्रसंगावधानामुळे ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवाशांचा वाचला जीव
अग्निशमन विभागाच्या जवानांतर्फे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला.
मंत्री हसन मुश्रीफ यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
संताजी घोरपडे कारखाना शेअर्स प्रकरणात गुन्हा दाखल रद्द करण्याची याचिका उच्च न्यायालयाने काढली निकाली
कागल कनिष्ठ न्यायालयात पोलिसांनी सी समरी रिपोर्ट सादर केल्याने न्यायालयाने याचिका काढली निकाली
संताजी घोरपडे कारखान्यात शेअर्स देण्याचं आमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा मंत्री मुश्रीफ यांच्यावर होता आरोप
शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी ईडीने मंत्री मुश्रीफ यांच्यावर केला होता गुन्हा दाखल
ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द व्हावा यासाठी मुश्रीफ यांनी घेतली होती उच्च न्यायालयात धाव
बोरिवली देवीपाडा मेट्रो स्टेशन खाली बसमध्ये लागलेली आगीचा धूर मेट्रोमध्ये शिरलाच्या धक्कादायक घटना
मेट्रोमध्ये धूर असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल,
दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी एका खाजगी बस मध्ये देवीपाडा मेट्रो स्टेशन खाली मोठी आग लागली होती
आगीत मोठ्या प्रमाणात धूर निघाला होता,
धूर संपूर्ण देवीपाडा मेट्रो स्टेशन परिसरात शिरला होता
त्यासोबत तिथून जाणारी मेट्रोमध्ये देखील मोठ्या प्रमाणात धूर गेला होता
एका प्रवाशांनी मेट्रोचा आतून धूर शिरलाचा व्हिडिओ बनवला होता, व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे..
जायकवाडी धरणात येणारी पाण्याची आवक सुरूच
जायकवाडी धरणात 16 हजार 248 क्युसेकने पाण्याची आवक सुरू
जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 38.15 टक्क्यांवर
नाशिक,अहिल्यानगर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने गोदावरीला आला पूर
राज्याच्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 13 मे रोजी जाहीर झाला.. निकाल जाहीर होऊन जवळपास आता दीड महिना होत आलाय... मात्र अजूनही दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा अकरावी मध्ये प्रवेश झालेला नाही... विद्यार्थी अजूनही पहिल्या गुणवत्ता यादीच्या प्रतीक्षेत आहेत. आज अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार होती... या पहिला गुणवत्ता यादीची सर्व विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे.
बीड जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या पावसामुळे जून महिन्यातसुद्धा चांगला पाऊस होईल, अशी शक्यता होती. मात्र काल पर्यंत केवळ ५५ मिमी पाऊस झालाय. यामुळे जिल्ह्यावर चिंतेचे ढंग घोंगावत आहेत.
बीड जिल्ह्यात ३ लाख ८९ हेक्टरवर पेरणी झाली असून, त्याची टक्केवारी ४८.१४ एवढी आहे. अद्याप ४ लाख १९ हजार हेक्टरवर पेरा बाकी आहे. पुढील काळात चांगला पाऊस झाला नाही. तर उर्वरित पेरण्या रखडतील. तसेच पाऊस नसल्याने आतापर्यंत झालेल्या पेरणीवरसुद्धा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सध्या तरी बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहे.
नागपुरात उघड्या नालीच्या चेंबरमध्ये पडून दीड वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे... भांडेबरी परिसरातील हनुमान नगर मध्ये ही दुर्दैवी घटना 24 जून रुची घडली होती.. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू झाला आहे..
- भांडेवाडी परिसरातील हनुमाननगर भागात एका नळीच्या उघड्या चेंबरमध्ये पडल्याने 18 महिन्याचा चिमुकलीचा मृत्यू झाला...
- देवांशी श्याम साहू असं मुलीचं नाव आहे.
- देवांशी खेळत असताना नालीचा चेंबर उघडा होता.. त्यात ती पडली आणि बेशुद्ध पडली.. घरच्यांनी तिला बाहेर काढत रुग्णालयात नेलं...
- उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला आहे..
- साहू कुटुंब त्या ठिकाणी बांधकाम सुरू असल्याने घराच्या कामासाठी कामगार म्हणून राहत होते..
धाराशिव शहरातील पार्वती हॉस्पिटलच्या तोडफोडीचे सीसीटीव्ही समोर, टोळक्याकडून दगडफेक, लोखंडी खुर्च्यांनी गाडी फोडली
हॉस्पिटलमध्ये घुसत तोडफोड करत गोंधळ
रुग्णाला उपचार नाकारल्याने नातेवाईकांनी तोडफोड केल्याची माहिती
तोडफोड प्रकरणी आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल, अद्याप कोणालाही अटक नाही
तोडफोड करणाऱ्या आरोपींवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू , त्यांनाही मारहाण झाल्याचा आरोप , पोलिसांची माहिती
हॉस्पीटलवरील हल्ल्याचा पहिल्या दिवशी शहरात १३२ डॉक्टरांकडून ओपीडी बंद ठेवत निषेध
मुंबई, ठाण्यासह कोकण, पुणे, संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडय़ात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. मागील दोन दिवसांपासून किनारपट्टी भागात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागांत पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हजेरी लागणार असल्याचे भाकीत करीत हवामान खात्याने वेगवेगळे अलर्ट जारी केले आहेत. सध्या कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्या पावसाचा पुढील पाच दिवसांत जोर वाढणार आहे. हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्र व मराठवाडय़ातील काही जिह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, जळगाव, धुळे, नंदुरबार. संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट दिला आहे.
बीडच्या जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यासह एका वरिष्ठ सहायकाला, 80 हजाराची लाच घेताना एसीबीने रंगेहात अटक केली आहे.मुकुंद आंधळे असं या लाचखोर अधिकाऱ्यांच नाव असून ते जिल्हा परिषदेत पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाच्या बिलाच्या नोट शीटवर सही करण्यासाठी, बिल वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी ३५ हजार रुपये आणि जुन्या कामाचे ५० हजार रुपये अशी ८५ हजार रुपयांची लाच मागितली होती. या पूर्वी देखील जिल्हा परिषदेत कर्मचारी लाच घेतल्या प्रकरणी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. आता पुन्हा एका बड्या अधिकाऱ्यावर लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईने जिल्ह्यातील लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
वाशिम- वाशिम जिल्ह्यात गेल्या 13 तासांपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाची संततधार सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात गेल्या 15 दिवसा पासून दडी मारून बसलेल्या पावसाने काल संध्याकाळ पासून जोरदारपणे आगमन केले असून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस बरसत असल्याने पेरणी केलेल्या पिकांना जीवनदान मिळालंय त्या शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसीमधील एका फार्मा कंपनीतील भंगाराचे कंत्राट घेतलेला मुख्य आरोपी बबन खान याला त्याच्या दोन मुलांसह वाहनचालक आणि इतर एक आरोपी अशा पाच आरोपींना अटक केली. कंपनीतून मेडिकल वेस्ट पावडर खानच्या गोदामात येत होती. तेथून खान परराज्यातील ड्रग्ज तस्करांकडे पुरवठा करत - होता असे तपासात समोर आलाय तशी माहिती तपास अधिकारी यांनी कोर्टात दिली. या कारवाईमुळे पुन्हा एकदा ड्रग्जचे मुंबई, गुजरात कनेक्शन समोर आले आहे. न्यायालयाने मुख्य आरोपी बबन खान नजीर खान , त्याची दोन मुले कलीम खान बबन खान , सलीम खान बबन खान , वाहनचालक शफीफुल रहेमान तफज्जूल हुसेन आणि राज रामतिरथ अजुरे या पाच आरोपींना २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली २५ जून रोजी नवी दिल्लीमध्ये साऊथ ब्लॉक येथे प्रगती (PRAGATI) ची 48 वी बैठक पार पडली. प्रगती हे केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांना अखंडपणे एकत्र आणून, सक्रिय प्रशासन आणि वेळेवर अंमलबजावणीला चालना देण्यासाठीचे, आयसीटी-सक्षम, मल्टी-मोडल व्यासपीठ आहे.
या बैठकीत पंतप्रधानांनी खाण, रेल्वे आणि जलसंपदा क्षेत्रातील काही महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेतला. आर्थिक विकास आणि लोककल्याणासाठी महत्वाच्या असलेल्या या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला, ज्यात कालमर्यादा, आंतर-संस्था समन्वय आणि समस्यांचे निराकरण यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. प्रकल्प अंमलबजावणीतील विलंबामुळे आर्थिक खर्च वाढतो आणि नागरिकांना आवश्यक सेवा आणि पायाभूत सुविधा वेळेवर उपलब्ध होत नाहीत, अशी दुहेरी किंमत चुकवावी लागते, यावर पंतप्रधानांनी भर दिला.
अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर...आज प्रवेशाची यादी जाहीर होणार का याची उत्सुकता...
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनलचा २१ पैकी तब्बल २० जागांवर विजय...मावळते अध्यक्ष भाजपच्या चंद्रकांत तावरेंना केवळ एक जागा...शरद पवारांच्या पॅनलचा सुफडासाफ...
महाराष्ट्र सरकारच्या जाहिरातीत अशोकस्तंभाऐवजी सेंगोल...आणीबाणीविरोधातल्या राजभवनातील कार्यक्रमातही सेंगोलचा वापर...संविधानविरोधी कृती असल्याचा विरोधकांचा आरोप...
हिंदीसक्तीवरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची एकवाक्यता नाही, पहिलीपासून हिंदी शिकवण्यावर मुख्यमंत्री ठाम, तर चौथीपर्यंत हिंदी शिकवण्याला अजित पवारांचा विरोध
शिक्षणमंत्री दादा भुसे आज घेणार राज ठाकरेंची भेट, हिंदीसक्तीवरून मनसे आक्रमक झाल्यामुळे भेट, राज ठाकरेंना समजावण्यात भुसेंना यश येणार का याची उत्सुकता
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking Updates: धाराशिवमधील शक्तीपीठ महामार्गाची मोजणी प्रक्रिया थांबवली, शेतकरी आंदोलनाचा धसका