- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Breaking News Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्वाचे अपडेट्स, पाहा क्लिकवर...
Maharashtra Breaking News Updates: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News Updates: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या कथित हलगर्जीपणाबाबतचा सरकारी अहवाल आज येण्याची शक्यता आहे. आजही रूग्णालयाबाहेर काही संघटनांच्या आंदोलनाची शक्यता आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात असणार...More
दहिसरमधील झेप्टो कंपनीवर मनसेची धडक.
मनसेचा आरोप झेप्टोच्या गोदामात उंदीर सापडले.
झेप्टो गोडाऊनची वाईट अवस्था पाहून मनसे कार्यकर्ता आक्रमक झाली.
मनसे कार्यकर्त्यांनी झेप्टोच्या गोदामाला कुलूप लावले
मनसे कार्यकर्त्यांनी शौचालयाचा दरवाजा तोडला आणि घाण दाखवले
दहिसर पोलिसांनी झेप्टोच्या गोदामात पोहोचून मनसे कार्यकर्त्यांना पोलिस ठाण्यात आणले.
राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी राहुल पांडे यांची नियुक्ती
- तर विभागीय माहिती आयुक्तपदी गजानन निमदेव, रवींद्र ठाकरे आणि प्रकाश इंदलकर यांची नियुक्ती
- राज्याचे राज्यपाल सिपी राधाकृष्णन यांनी जारी केली अधिसूचना
- राहुल पांडे आणि गजानन निमदेव हे नागपुरातील ज्येष्ठ पत्रकार
- राहुल पांडे यापूर्वी नागपूर विभागीय माहिती आयुक्त राहिले आहेत
- तर रवींद्र ठाकरे हे माजी आयएएस अधिकारी आहेत
- प्रकाश इंदलकर हे माजी प्रशासकीय अधिकारी आहेत
- पुढील 3 वर्षांसाठी मुख्य आणि माहिती आयुक्तांचा कार्यकाळ असणार आहे
चंद्रशेखर बावनकुळे,महसूलमंत्री -
On अवकाळी नुकसान -
- आज विदर्भ, अमरावती विभागाचे जे नुकसान झाले त्या नुकसानीचा बैठक आणि पंचनामा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, एकही शेतकरी सुटू नये अशा सूचना दिल्या आहेत
- सर्वेक्षण सुरू झाला आहे, महाराष्ट्रात एकाही शेतकऱ्याचा सर्वेक्षण सुटणार नाही याची काळजी घेत आहे
- ज्यांचं नुकसान झाला आहे त्याची नियमाप्रमाणे नुकसान भरपाई देऊ
On कोकाटे -
- कुठल्याही मंत्री महोदयांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये, कोकाटे काय बोलले याबद्दल मला माहिती नाही
- पण शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे आहे, मोबदला देण्यासाठी सरकारची जबाबदारी आहे, कोकाटे काहीही बोलले असतील तर शेतकऱ्यांची आम्ही सरकारतर्फे क्षमा मागू
- आमचा सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे आणि पंचनामे करून नुकसान भरपाई देऊ
- आजच्या बैठक -
शेतकऱ्यांसाठी जे डिमांड पाठवावे लागते सरकारला ते डिमांड आम्ही पाठवतो, मध्यवर्ती कारागृह बाहेर नेण्यासाठी बैठक घेतोय, प्रधानमंत्री आवास योजना अशा विविध बैठका आहेत
On संजय राउत -
- आम्हाला उबाठाच्या लोकांना विचारण्याची गरज नाही, आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे, एनडीए स्पष्ट बहुमतात आहे, आम्हाला उबाठा कडे जाण्याची गरज नाही
- अनेक नेते ठाकरे सेना सोडत आहेत, वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाला विरोध करणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेशी बेइमानी करणे आहे
- जी मते उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत घेतली त्याच्याशी बेमानी केली आहे, मुंबईमधील मतं मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतलेलं पाऊल आहे
On पुणे हॉस्पिटल -
- वडेट्टीवार यांनी जे आरोप केले ते बालिशपणाचे आहेत, त्यांनी जबाबदारीपणे बोलला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे,
- मुख्यमंत्री यावर बोलले आहात, मी पुण्यात होतो कारवाई झाले पाहिजे, भाजपच्या महिला मोर्चा ने आंदोलन केलं, पुण्यातल्या घटनेची चौकशी होणार,जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची सरकारची भूमिका आहे
- आम्ही कडक कारवाई करू आणि यानंतर कुठलाही हॉस्पिटल राज्यात असे काम करणार नाही याची काळजी आम्ही घेऊ
- भविष्यात असं कुठल्याही हॉस्पिटल ने केला तर त्याचा परवाना रद्द केला पाहिजे, जे कायदे आहेत त्या कायद्याच्या सर्व कारवाया करू, लोकांच्या जीवाशी हॉस्पिटल ने खेळू नये
On भाजप अध्यक्ष -
- उद्या आमचा स्थापना दिवस आहे, उद्या 2 वाजता दहा ते बारा लक्ष कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री संबोधित करतील
- पुढच्या आठवड्यात मंडळाच्या अध्यक्ष निवडी होतील, मोठा पक्ष आहे, एक कोटी ५१ लाख प्राथमिक सदस्य असलेला पक्ष झालेला आहे
- मोठा पक्ष आहे त्यामुळे थोडा वेळ लागतो आहे पण लवकरच प्रक्रिया पूर्ण होतील
On उदय सामंत- राज ठाकरे भेट -
- मी देखील राज ठाकरे साहेबांच्या भेटीला जाणार आहे, उदय सामंत गेले त्यात नवं काय, मैत्रीपूर्ण वातावरणात राज ठाकरे यांना उदय सामंत गेले
On नागपूर रामनवमी शोभायात्रा -
- उद्याच्या शोभायात्रेसाठी आम्ही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे, जर कोणी गैर कारभार केला तर आम्ही सोडणार नाही, आम्ही सजग आहोत
- सोशल मीडियावर जे मागच्या घटनेत व्हिडिओ तयार करून मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाच्या माध्यमातून घटना घडविण्यात साठी कारणीभूत आहेत
- सोशल मीडियावर आमचे ट्रेकिंग सुरू आहे आणि नागपूरला सुरक्षित ठेवणे जबादारी आहे
On वक्फ जमीन -
- केंद्राने कायदा पास केला,राष्ट्रपती जेव्हा सही करतील तेव्हा आमच्याकडे येईल, कायदा झालेला आहे, कायद्यानुसार आम्ही काम पुढे नेऊ, आज कायदा आमच्याकडे आला नाही, मग बोर्डाच्या नव्या कायद्यानुसार आम्ही कार्य करू
- नाशिकमध्ये अखिल भारतीय संत समितीची कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न
- नाशिक शहरातील साधुसंत बैठकीला उपस्थित
- बैठकीत साधू महंतानी अनेक मांडले ठराव
- गो हत्या बंदी कायदा लागू करण्यात यावा ,
-
धर्मशास्त्रावर बोलणाऱ्यांवर बंदी आणण्यात यावी ,राज ठाकरे, जितेंद्र अवघड यांच्यासारखे बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर बंदी घालण्यात यावी
- कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू संतांची राहण्याची व्यवस्था सुरक्षा शाही स्नानामृत स्नान राजमार्ग याचे नियोजन करण्यात यावे
-- कुंभमेळा प्रधिकरणामध्ये साधूं संतांचा समावेश करण्यात यावा
करुणा मुंडे यांनी कोर्टात सादर केलेली सर्व कागदपत्रे खोटी असल्याचा धनंजय मुंडे यांच्या वकिलांचा दावा.
धनंजय मुंडे यांच्या वकील सायली सावंत यांचा मोठा आरोप .
वसियतनामा, स्वीकृतिपत्रात धनंजय मुंडे यांच्या वेगवेगळ्या सह्या आहेत. काही ठिकाणी अंगठा लावला आहे .
करुणा मुंडे यांनी पासपोर्ट बनावट कागदपत्रांच्या आधारावर बनवला आहे.
धनंजय मुंडे यांचे रेशनकार्ड इंदोरमध्ये कसे काय असू शकते असे अनेक प्रश्न सायली सावंत यांनी कोर्टात उपस्थित केले आहेत ..
- नांदेड
- काल नांदेडच्या आलेगाव शिवारात विहिरीत पडून सात महिला मजुरांचा मृत्यू.
- नांदेड काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी वसमत तालुक्यातील गुंज येथे येऊन पीडित कुटुंबियांचे केले सांत्वन.
- पीडित कुटुंबियांनी रवींद्र चव्हाण यांना सांगितला घटनाक्रम.
- व्यथा मांडतांना नातेवाईकाच्या डोळ्यातील अश्रुवानावर.
- गुंज वस्तीवर सुविधा देण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू
- खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिला नातेवाईकाला धीर.
- नांदेड
- काल नांदेडच्या आलेगाव शिवारात विहिरीत पडून सात महिला मजुरांचा मृत्यू.
- नांदेड काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी वसमत तालुक्यातील गुंज येथे येऊन पीडित कुटुंबियांचे केले सांत्वन.
- पीडित कुटुंबियांनी रवींद्र चव्हाण यांना सांगितला घटनाक्रम.
- व्यथा मांडतांना नातेवाईकाच्या डोळ्यातील अश्रुवानावर.
- गुंज वस्तीवर सुविधा देण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू
- खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिला नातेवाईकाला धीर.
- अवैध खासगी सावकारांवर नाशिक पोलिस आणि सहकार विभागाची छापेमारी
- अवैध सावकारांविरोधात पोलिसांकडे तक्रारी वाढल्याने पोलिसांकडून कारवाई ला सुरवात
- पैसे वसुलीसाठी अवैध सावकारांकडून कर्जदारांना धमकावणे, महिलांसोबत गैरवर्तन, जिवे मारण्याची धमकी देण्याच्या पोलिसांकडे तक्रारी
- तक्रारींनंतर शहरातील वेगवेगळ्या भागातील अवैध सावकारांवर कारवाई
- अवैध सावकारांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी सुरू
V/O - डोक्यावर आग ओळखणारा सूर्य आणि पाय भाजत लांबच लांब दर्शन रांगेतून आणि तहानलेल्या घशाने विठ्ठलापर्यंत पोहोचाव्या लागणाऱ्या भाविकांना आता एबीपी च्या दणक्यानंतर देवाचे दर्शन सुखकर बनले आहे. एबीपी ने भाविकांच्या यातना दाखवल्यानंतर मंदिर प्रशासनाने तातडीने दर्शन रांगेत पायाखाली मॅट टाकण्यास सुरुवात केली असून भर उन्हात तहानलेल्या भाविकांना पिण्यासाठी थंडगार पाण्याची सोयही करण्यात आली आहे. सध्या चैत्री यात्रेचे वेध लागले असताना हजारोंच्या संख्येने भाविक विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला येत आहेत. विठुरायाच्या दर्शनाची रांग चंद्रभागेच्या तीरावरील सारडा भवन च्या पुढे विप्र मंदिरापर्यंत पोचली आहे . मात्र आता एबीपी माझा मुळे या हजारो भाविकांना विठुरायाचे सुखकर दर्शन मिळू लागले असून दर्शन रांगेत पायाखाली मॅट टाकण्यात आले आहेत. ज्यामुळे तासंतास भरून दर्शन रांगेत उभारणाऱ्या भाविकांचे पाय आता भाजत नसून ठीक ठिकाणी दर्शन रांगेत थंड पिण्याच्या पाण्याची सोय देखील मंदिर प्रशासनाने केली आहे. या ठिकाणी भाविकांना पाणी देण्यासाठी स्वयंसेवक नेमले असून आता भर उन्हातही पाय न भासता आणि तहानलेला न राहता भाविक सुखकर दर्शनासाठी जाऊ शकत आहे
रामनवमीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा तगडा बंदोबस पाहायला मिळत आहे. दोन वर्षांपूर्वी रामनवमीच्या पूर्वसंध्येला शहरातील किराडपुरा परिसरातील राम मंदिर परिसरात दंगल घडली होती. ही बाब लक्षात घेता पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. यासाठी शहरातील मंदिर परिसरात विशेष बंदोबस्त असणार आहे, एसआरपीएफ, दंगा काबू पथक, यासह ड्रोनने नजर ठेवली जाणार आहे.
सहायक पोलीस आयुक्त 6
पोलिस निरीक्षक 29
पीएसआय, एपीआय 85
पोलीस कर्मचारी 1196
व्हिडीओग्राफर 14
ड्रोन 5
एसआरपीएक 3
दंगा काबू पथक 2
होमगार्ड 496
मिरवणूक मार्गावर असलेल्या मस्जिद परिसरात बंदोबस्त
साध्य कपड्यात पोलीस बंदोबस्त
सायबर पोलिसांची सायबर पेट्रोलिंग
अग्निशामक आणि रुग्णवाहिकाची व्यवस्था
मंदिर परिसरात ड्रोनने निगराणी
नियंत्रण कक्षात राखीव पोलीस बंदोबस्त
बीट मार्शल 25 दुचाकीवरूनकरणार पेट्रोलिंग
अति महत्वाच्या 38 ठिकाणी फिक्स पॉइंट
अति संवेदीशील गलोगल्लीत गस्त
सोलापूर मोठी बातमी :
सोलापुरात 2 शाळकरी मुलींचा मृत्यू तर एकीची प्रकृती गंभीर
दूषित पाण्यामुळे मुलींचा मृत्यू झाल्याचा नातेवाईक आणि स्थानिकांचा आरोप
मोदी परिसरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील धक्कादायक घटना
घटनास्थळी भाजपा आमदार देवेंद्र कोठे तसेच महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिली भेट
आमदार देवेन्द्र कोठे आणि अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या समोर स्थानिकांनी व्यक्त केला संताप
मागील अनेक दिवसांपासून बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा स्थानिकांचा आरोप
त्याचबरोबर भाजपा आमदार देवेंद्र कुठे यांच्याकडूनही दूषित पाणी पुरवठा होत असल्याची पुष्ठि
दोन मुलींच्या मृत्यूमुळे सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
भाग्यश्री म्हेत्रे (16), जिया महादेव म्हेत्रे (16) असे मृत मुलींची नावे आहेत
तर जयश्री महादेच म्हेत्रे (18) हिची परिस्थिती गंभीर आहे
या परिसरातील नागरिकांचे म्हणणे काय आहे जणून घेतलंय आफताब शेख यांनी
चौपाल :- स्थानिक नागरील आणि मृत मुलीचे नातेवाईक
दरम्यान या भागात भेट दिल्यानंतर भाजप आमदार देवेंद्र कोठे आणि अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी काय माहिती दिलीय पाहुयात
बाईट : देवेंद्र कोठे ( भाजप आमदार)
बाईट : रवी पवार ( अतिरिक्त आयुक्त, सोलापूर मनपा)
राम नवमी निमित्त मुंबईत राहणार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
राम नवमी मुंबईतील स्थानिक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकार्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
मागच्या वर्षी राम नवमी निमित्त काही भागांमध्ये तणावाचे वातावरण होते, त्यापाश्वभूमिवर खबरदारी घेण्याच्या सूचना
ज्या भागात तणावाचे वातावरण होते, किंवा मुंबईतील संवेदनशील भागात पोलिसांकडून अधिकचा राहणार बंदोबस्त
या भागात पोलिस ड्रोनच्या मदतीनेही लक्ष ठेवणार
राम नवमी निमित्त अनेक शोभ यात्रा निघतात, यातील काही शोभयात्रा या त्या संवेदनशील भागातून जातात
तणाव कमी करण्याच्या उद्देशाने या शोभयात्रांचे मार्गही बदलण्याबाबत पोलिस विचार करत आहेत
काही ठिकाणी मुस्लिम समाजाच्या मस्जिदसमोरून या शोभयात्रा निघतात त्या ठिकाणी पोलिसांचा वाढीव पोलिस बंदोबस्त राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
रोहित पवार यांची कृषि मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका
कोकाटे साहेब, कर्जमाफीचा पैसा बँकांना जमा होतो शेतकऱ्यांना मिळत नाही हे कदाचित आपल्याला ज्ञात नसावे. कर्जमाफीचा पैसा साखरपुडा, लग्नकार्यात खर्च करणे हे कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटण्याएवढे सोपे नाही. मुळात सदनिका प्रकरणात बुडाखाली अंधार असताना शेतकऱ्यांना ब्रम्हज्ञान देण्याची गरजंच नाही.
रोज कोट बदलणाऱ्या कृषिमंत्र्यांना शेतकऱ्याचा फाटलेला सदरा दिसत नसला तरी आपल्या वादग्रस्त संवेदनांचं प्रदर्शन करून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यापेक्षा अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना काय मदत देता येईल यावर लक्ष केंद्रित केलं तर अधिक बरं होईल.
राजकीयदृष्ट्या थोडक्यात वाचला आहात त्यामुळे जरा जपून....
Nashik: देशभरामध्ये रॅंगिंगच्या घटना दिवसेंदिवस वाटत असून नाशिकचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ देखील देशांमध्ये तिसरे ठरले आहे.ही आकडेवारी समोर येताच आरोग्य विद्यापीठ प्रशासन देखिल खडबडून जागं झालं असून या अहवालाबाबत विद्यापिठाने एक स्पष्टीकरण देखिल दिलय. 90 टक्के तक्रारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वसतीगृहाशी संबंधित आहेत. विशेष म्हणजे रॅगिंग मुळे एकाचाही मृत्यू न झाल्याचं विद्यापीठाचं म्हणणं असून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नीत 652 महाविद्यालयातुन प्राप्त तक्रारींचे प्रमाण हे 4 टक्क्यांपेक्षा कमी असल्याचेही त्यांनी स्पष्ट करत या प्रकारांवर घालण्यासाठी विद्यापीठ सर्व खबरदारी घेत असल्याचं विद्यापीठाचे उप कुलगुरुंनी म्हंटलय.
Beed : भाजपाचे आमदार सुरेश धस यांचा रांगडा अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. बीडच्या आष्टी येथे दादेगावात श्रीराम यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. याच यात्रेमध्ये सुरेश धसांनी उपस्थिती लावली. यादरम्यान उपस्थित भाविकांच्या आग्रहाखातर धस यांनी ढोल वाजवून मनमुराद आनंद लुटला आहे. सुरेश धसांचा हा रांगडा अंदाज चांगलाच चर्चिला जात असून हा व्हिडिओ सोशल माध्यमावर चांगलाच वायरल झाला आहे.
शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर
- 16 एप्रिल ला होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या अनुषंगाने पूर्व तयारी संदर्भात संजय राऊत घेणारा आढावा
- 16 एप्रिलला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एकदिवसीय शिबिर होणार
- याच अनुषंगाने राऊत स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत घेणार बैठक
- आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा नाशिक मध्ये होणार आहे एक दिवसीय शिबिर
Yavatmal: शासन प्रशासनाकडून जिल्ह्यात वाळू घाटाचे लिलाव झाले नसल्याने जिल्ह्यातील वाळू घाटावर वाळू तस्करांनी अक्षरशा धुमाकूळ घातला असून अवैध वाळू तस्करीचे व्हिडिओ समाज माध्यमावर वायरल होत आहे. यवतमाळच्या वनी तालुक्यातील कळमना, पाटाळा यासह इतरही घाटावर वाळू माफियांनी बस्थान मांडल्या असून महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन मात्र डोळे झाक करत आहे. दररोज 100 पेक्षा अधिक ट्रकची वाळूची तस्करी होत आहे. त्यामुळे शासन प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे तहसील प्रशासनाकडून अवैध उपसा होणाऱ्या वाळू घाटावर छापे टाकण्याकरीत पथके सुद्धा आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अवैध रेती घाटावर तात्काळ कारवाई करावी असे निर्देश दिले होते मात्र त्यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे.
Beed : बीड दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा शिक्षक आंदोलकांनी अडवण्याचा प्रयत्न केला होता. पवार यांनी भेट न दिल्यामुळे या शिक्षकांनी थेट रस्त्यावर ठिय्या मांडला. या प्रकरणात आता आंदोलनकर्त्या १६ शिक्षकांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
श्रीधर घोळवे, नदीम शेख, परमेश्वर आंधळे, अंगद फुटाणे, पोपट मोरे, विठ्ठल कोरडे, सुधाकर वाळके, सुधाकर काळे, कृष्णा टोणे, रवींद्र घुले, श्रीराम गिते, बाळासाहेब मुंडे, बाळासाहेब तांबडे, दिलीप वायबसे, अनुराधा जगताप आणि बालिका वेडे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.
कॉमेडियन कुणाल कामरा आज पोलिसांसमोर हजर राहण्याच आहे समन्स
खार पोलिसांनी कुणाल कामराला आतापर्यंत पाठवली आहेत तीन समन्स
तिसऱ्या समन्स मध्ये 5 एप्रिलला खार पोलिसांसमोर हजर राहण्याच्या सूचना
आज तरी कुणाल कामरा पोलिसांसमोर हजर राहतो का याकडे लक्ष
आजच्या समन्सला कुणाल कामरा हजर न राहिल्यास पोलीस कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कारवाई करणार
सात तारखेपर्यंत कुणाल कामराला अटकेपासून आहे संरक्षण
मुंबईतील विहीर आणि बोअर मालकांना मुंबई महापालिकेकडून नोटीस देण्यास सुरुवात
विहीर आणि बोअर मालकांनी एनओसी मिळवावी अन्यथा वॉटर टँकर साठीचा पाणीपुरवठा बंद करण्याच्या नोटीस मधून सूचना
मुंबई महापालिकेच्या या कारवाईमुळे वॉटर टँकर मालकांसमोर मुंबईत पाणी टंचाई असताना आणि मोठ्या प्रमाणावर विकासाची काम सुरू असताना पाणीपुरवठा कसा करायचा? मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा प्रश्न
आज दुपारी मुंबई वॉटर टँकर असोसिएशन या सगळ्या संबंधी बैठक घेऊन निर्णय घेणार
मुंबईतील काही बोअर आणि विहीर मालक यांच्याकडे एनओसी नसल्याचे आढळून आला आहे...
शिवाय या विहिरींमधून डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत असल्याचे सुद्धा मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितला आहे आणि त्यामुळेच या विहिरी बंद कराव्यात अशा सूचना दिल्या आहेत
मुंबई महापालिकेच्या अशा नव्या नियमावलींमुळे वॉटर टँकर मालक अडचणीत आले आहेत
मुंबईत पाणीटंचाई असताना आणि मोठ्या प्रमाणावर विकास कामांसाठी पाणी लागत असताना अशाप्रकारे मुंबई महापालिका नवीन नियमावली करून अडचण निर्माण करत असेल तर मुंबई वॉटर टँकर असोसिएशन याचा विरोध करत याचा टँकरने पाणीपुरवठा करण्यावर परिणाम होणार असल्याचे सांगितले आहे
भाजपने सदस्य नोंदणीत रचला नवा इतिहास
महाराष्ट्रात दीड कोटी सदस्य नोंदणी करणारा भाजप पहिला पक्ष
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नवा रेकॉर्ड
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साधणार सर्व कार्यकर्त्यांसोबत संवाद
६ एप्रिलला भाजप स्थापना दिनी करणार मुख्यमंत्री मार्गदर्शन
ऑनलाईन कार्यकर्ता संमेलनाद्वारे मुख्यमंत्री करणार मार्गदर्शन
दीनानाथ रूग्णालय प्रकरणानंतर धर्मादाय आयुक्तांची कठोर पावलं, ((राज्यातील रूग्णालयांना नियम, अटी पाळण्याच्या सूचना, ))आरक्षित खाटा निर्धन, दुर्बल घटकांतील रूग्णांना उपलब्ध करून द्या, धर्मादाय रूग्णालयातील नियम कठोर करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आदेश,
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचे फिंगरप्रिंट घरात सापडले
मुंबई पोलिसांचा सुनावणीदरम्यान कोर्टात दावा
आरोपी शरीफुल इस्लामला जामीन देण्यास पोलिसांचा विरोध
आरोपी बांगलादेशात पळून जाण्याची शक्यता, पोलिसांचा दावा
शरीफुलच्या डाव्या हाताचे ठसे सैफच्या घरात सापडल्याचा कोर्टात दावा
आरोपीचा सीडीआर, टॉवर लोकेशनही पोलिसांच्या हाती
हल्ल्याच्या घटनेआधी परिसरात आरोपी फिरतानाचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात
आरोपीकडील शस्त्र, सैफच्या पाठीतून काढलेला धातूचा तुकडा यांची पडताळणी
महाराष्ट्र जीएसटी विभागाची विक्रमी कर वसुली, यावर्षी सव्वादोन कोटींहून अधिक महसूल संकलित, संपूर्ण राज्याच्या कर महसुलातील ६० टक्क्यांहून जास्त वसुली
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking News Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्वाचे अपडेट्स, पाहा क्लिकवर...