Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

नामदेव जगताप Last Updated: 30 Jan 2025 02:44 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर... मग युती कधी? उद्धव ठाकरेंसमोर मिलिंद नार्वेकरांची गुगली, मी सुद्धा या सुवर्णक्षणाची वाट पाहतोय, चंद्रकांत पाटील यांचा सिक्सरभाजपचे...More

Nashik Crime : देशी बनावटीचे पिस्टल अन् जिवंत काडतुसे बाळगणाऱ्याला बेड्या; नाशिक पोलिसांची कारवाई

नाशिक : शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनने मोठी कारवाई केली आहे. विनापरवाना देशी बनावटीचे दोन पिस्टल आणि आठ जिवंत काडतूस बाळगणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित आरोपी उपकरण चौधरी हा उत्तर प्रदेशातील आहे. त्याच्या ताब्यातून एक चारचाकी देखील हस्तगत केली असून एकूण तीन लाख आठ हजार रुपयांचा मध्यमाल ताब्यात घेतला आहे. अवैध शस्त्र बाळगणाऱ्या या इसमाविरोधात नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.