Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live Updates: महाकुंभ मेळाव्यात संगम किनाऱ्यावर चेंगराचेंगरीची घटना घडली. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. यासह विविध बातम्यांचे अपडेट्स...

मुकेश चव्हाण Last Updated: 29 Jan 2025 01:01 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News Live Updates: प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्यात संगम किनाऱ्यावर चेंगराचेंगरीची घटना घडली. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. अमृतस्नानापूर्वी रात्री दीडच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. संगम...More

दुख:द बातमी! जेष्ठ गांधीवादी मा. म. गडकरी यांचे निधन

वर्धा: सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष आणि जेष्ठ गांधीवादी मा. म. गडकरी यांचे आज निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.  मा. म. गडकरी हे सण 2008 ते 2013 पर्यत सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहिले आहेत. ते बालपणापासून गांधी विचाराशी जुडून राहिले होते.  दरम्यान, आचार्य विनोबा भावे यांच्यासोबत देखील विविध चळवळीत त्यांनी काम केले होतं. सोबतच त्यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रचार प्रसार केला.  तसेच ते दारुबंदी चळवळीत ही सक्रिय राहिले आहेत. मा. म. गडकरी हे मूळचे वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील हिवरा या गावचे रहिवासी होते.  दरम्यान नागपूर येथील निवसस्थानी आज सकाळी साडेदहा वाजता त्यांचे दुख:द निधन झाले आहे. या बातमीने सर्वत्र शोककळा पसरली आहे.