Maharashtra Breaking News Live Updates: विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात, 288 आमदारांचा शपथविधी, विधानसभा अध्यक्षांची निवड 9 डिसेंबरला

Maharashtra Election Results News 07 December 2024 Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....

ज्योती देवरे Last Updated: 07 Dec 2024 02:10 PM
Nandurbar: नंदुरबारमध्ये प्रकाशा पुलावर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर खराब झाल्याने ट्राफिक जाम

Nandurbar: नंदुरबारमध्ये प्रकाशा पुलावर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर खराब झाल्याने ट्राफिक जाम 


प्रकाशा पुलापासून दोन्ही साईडने सुमारे 5 किलोमीटर ट्राफिक जाम....


ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पुलाच्या मध्यभागी खराब झाल्याने वाहतूक कोंडी....


गेल्या 3 तासांपासून वाहतुकीची कोंडी, प्रवाशांना सहन करावा लागला मनस्ताप .....


प्रकाश पुलावर उसाचे ट्रॅक्टर अनेकदा होतात खराब त्यामुळे होते ट्रॅफिक जाम....


3 तासानंतर क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर काढण्यात सुरुवात....


वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्ष त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्येत दिवसेंदिवस वाढ..

मला वाटतं अजूनही आम्ही अधिकृतरित्या महाविकास आघाडीतून बाहेर पडलेलो नाहीत, ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी - रईस शेख

समाजवादी पार्टीचे रईस शेख आणि अबू आजमीचा उद्धव ठाकरेंना संकेत


शिवसेनाने (ठाकरे गट) आपली भूमिका स्पष्ट सांगावी.  


कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेत असतील तर आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडू.


अखिलेश यादव यांच्यासोबत बोलूनच अबू आजमीने प्रतिक्रिया दिली असावी.  

नंदुरबार येथील प्रकाशात ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पुलाच्या मध्यभागी खराब झाल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. 

प्रकाशा पुलावर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर खराब झाल्याने ट्राफिक जाम झाला आहे. 


पुलाच्या दोन्ही साईडने सुमारे 5 किलोमीटरचा हा ट्राफिक जाम आहे.  


गेल्या अनेक तासांपासून वाहतुक कोंडी असल्याने प्रवाशांना हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 


प्रकाश पुलावर उसाचे ट्रॅक्टर अनेकदा खराब होतात. 


3 तासानंतर क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर काढण्यात सुरुवात झाली आहे. 


वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्ष असल्याकारणाने कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. 

सांगली जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी, राजारामबापू साखर कारखान्याने 3275 रुपये दर जाहीर केलाय.

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव-सुरुल व कारंदवाडी युनिटकडून सन 2024 - 25 हंगामातील उसाचा पहिला हप्ता 3200 रुपये प्रतिटन देणार आहे. 


तर उर्वरित 75 रुपये दिवाळीस अदा करणार आहेत. एकूण अंदाजे 3275 रुपये जिल्ह्यातील उच्चांकी दर जाहीर करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी दिलीय. 


तसेच जत-तिप्पेहळ्ळी युनिटकडील ऊस दराचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.


यामुळे सांगली जिल्ह्यातील  ऊस दराची कोंडी या निमित्ताने फुटली आहे.

मधुकर पिचड यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी

- मधुकरराव पिचड यांचे पार्थिव त्यांच्या मुळ गावी राजुर येथे पोहचले.
- पिचड यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शन ठेवण्यात आले.
- अंत्यदर्शनासाठी नातेवाईक आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी.
- घरच्यांना अश्रू झाले अनावर.
- पत्नी मुलगा, मुली आणी नातवंडे यांना अश्रु अनावर.

Eknath Shinde: विधानपरिषदेचे महायुतीचे सभागृह नेता एकनाथ शिंदे होण्याची शक्यता

Eknath Shinde: विधानपरिषदेचे महायुतीचे सभागृह नेता एकनाथ शिंदे होण्याची शक्यता


हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेचे सभागृह नेता म्हणून एकनाथ शिंदे कामकाज पाहण्याची शक्यता 


सूत्रांची माहिती 


विधानसभेचे सध्या महायुतीचे सभागृह नेता देवेंद्र फडणवीस

नाशिकमध्ये भर चौकात हत्या, थरकाप उडविणारा व्हिडिओ समोर

- हत्येच्या घटनेचा थरकाप उडविणारा व्हिडिओ समोर
- नाशिकच्या संभाजी चौकात काल सायंकाळच्या सुमारास घडलेली घटना 
- नितीन शेट्टी या हॉटेल व्यवसायिकाची भर दिवसा निर्घृण हत्या

Pune Crime: पुण्यात पत्नी माहेरी गेल्याने जावयाकडून सासुरवाडीतील घराला आग, सासूने दिली फिर्याद

Pune Crime: पुण्यात पत्नी माहेरी गेल्याने जावयाकडून सासुरवाडीतील घराला आग


पत्नी माहेरी गेल्याच्या कारणावरून जावयाने चक्क सासुरवाडीतील घरालाच आग लावल्याचा धक्कादायक समोर आला आहे.


या घटनेत घरातील काही साहित्य जळाल्याने नुकसान झाले. 


ही घटना कोथरूडमधील सुतारदरा परिसरात गुरुवारी मध्यरात्री घडली.


या प्रकरणी सासूने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी जावई साहिल हनुमंत हाळंदे (वय २५, रा. भूगाव, ता. मुळशी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

Pune :पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे धरणे आंदोलन

Pune :पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे धरणे आंदोलन


बांगलादेशातील इस्कॉन या मानवतावादी, अध्यात्मिक संघटनेच्या सदस्यांविरोधात बांगलादेश सरकार अन्याय व अत्याचार करत असल्याच्या निषेधार्थ धरणे आंदोलन


बालगंधर्व चौक येथे शिवसेना उबाठा  शहराचे वतीने  धरणे आंदोलन 


बांगलादेश विरोधात घोषणाबाजी


मोदी सरकार केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी

Madhukar Pichad Death: काॅग्रेस नेते बाळासाहेब थोरात, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील पिचडांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार

Madhukar Pichad Death: काॅग्रेस नेते बाळासाहेब थोरात, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील पिचडांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत...
विखे पाटलांचा आज ऐवजी ऊद्या आमदारकीची शपथ घेण्यासाठी अर्ज...
पिचडांच्या अंत्यसंस्कारासाठी विखेंनी आमदारकीची शपथ पुढे ढकलली अशी माहिती

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिवेशनात अॅक्शन मोडवर, पहिल्याच दिवशी बोलावली महत्त्वाची बैठक

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिवेशनात अॅक्शन मोडवर


पहिल्याच दिवशी बोलावली महत्त्वाची बैठक


अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिवांची बैठक


राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी बैठक घेणार

Nashik - नाशिक शहरात सोनसाखळी चोंरांचा धुमाकूळ, महिलांमध्ये भीतीचे वातावरण, पोलिसांकडून जागोजागी नाकाबंदी

Nashik - नाशिक शहरात सोनसाखळी चोंरांचा धुमाकूळ


 शहराच्या अनेक भागात सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असल्यानं महिलांमध्ये भीतीचे वातावरण


सातत्याने घडणाऱ्या घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून जागोजागी नाका बंदी


मात्र पोलिसांची नाकाबंदी भेदून चोरट्याचे पोलिसांना आव्हान


सोनसाखळी चोरीच्या घटना सीसीटीव्हीत कैद

Nandurbar: नंदुरबार अक्कलकुवा आगाराची वडफळी गावाहून परतणारी बसचा भीषण अपघात, देवगुई घाटात बस पलटली 

Nandurbar: नंदुरबार अक्कलकुवा आगाराची वडफळी गावाहून परतणारी बसचा भीषण अपघात


देवगुई घाटात बस पलटली 


बस मध्ये तीन ते चार प्रवासी असल्याचे समजते 


सुदैवाने घटनेत कुठलीही जीवितहानी नाही


वडफळी मुक्कामी असणारी होती बस

Konkan: मार्गशीर्ष महिना सुरू झाल्यामुळे कोकणात मच्छीची दर पडले, मच्छीमार बांधवांनी मासे सुकवण्यावर दिला भर....

Konkan: मार्गशीर्ष महिना सुरू झाल्यामुळे कोकणात मच्छीची दर पडले,


मच्छीमार बांधवांनी मासे सुकवण्यावर दिला भर....


मार्गशीर्ष महिन्यात सर्वत्र उपवास सुरू झाल्यामुळे कोकणात मच्छीचे दर कमालीचे उत्तर असे पाहायला मिळत आहे


त्यामुळे मच्छीमार बांधवांनी या काळात मासे सुकवण्यावर भर दिल्याचे पाहायला मिळतय.


एक महिनाभर मच्छीला दर नसल्यामुळे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी मच्छीमार बांधव अशा पद्धतीचा वापर करून मोठ्या प्रमाणात मासे सुकवण्यावर भर देत असतो.


ओल्या मासळीप्रमाणे बाजारपेठेमध्ये सुक्या मासळीला देखील चांगली किंमत मिळत असल्यामुळे मच्छीमार बांधव सध्या सुक्या मासळीकडे वळला आहे.

Buldhana: उद्धव ठाकरे सेनेच्या मलकापुर तालुका प्रमुखाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी.

Buldhana: उद्धव ठाकरे सेनेच्या मलकापुर तालुका प्रमुखाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी.


धमकी देणारा मध्यप्रदेशातील पोलिस अधिकारी "एसीबीच्या " जाळ्यात.


मलकापूर तालुका उद्धव सेनेचे प्रमुख दीपक चांभारे पाटील यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या व 50000 रुपयांची  लाच मागणाऱ्या मध्यप्रदेशातील लालबाग पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकाऱ्याला इंदोर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. काल रात्री ही कारवाई करण्यात आली.

Mumbai: मुंबईच्या वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षाला पुन्हा धमकीचा मेसेज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट?

Mumbai: मुंबईच्या वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षाला पुन्हा धमकीचा मेसेज


मेसेजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचल्याचा मेसेज समोरील व्यक्तीने पाठवला आहे


इतक नाही तर बाॅम्बस्फोट घडवून ही हत्या केली जाणार असल्याचे मेसेजमध्ये म्हटले आहे


तसेच दोन व्यक्तींची नाव लिहून ती दोघं आयएसआय एजंट असल्याचेही म्हटले आहे


दरम्यान पोलिस मेसेज करणार्या त्या व्यक्ती शोध घेत आहेत. मात्र मानसिक तणावतून किंवा मद्पान करून हा धमकी वजा खोडसाळणे पाळवला असल्याचा पोलिसांना संशय आहे

Mumbai: मुंबईच्या वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षाला पुन्हा धमकीचा मेसेज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट?

Mumbai: मुंबईच्या वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षाला पुन्हा धमकीचा मेसेज


मेसेजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचल्याचा मेसेज समोरील व्यक्तीने पाठवला आहे


इतक नाही तर बाॅम्बस्फोट घडवून ही हत्या केली जाणार असल्याचे मेसेजमध्ये म्हटले आहे


तसेच दोन व्यक्तींची नाव लिहून ती दोघं आयएसआय एजंट असल्याचेही म्हटले आहे


दरम्यान पोलिस मेसेज करणार्या त्या व्यक्ती शोध घेत आहेत. मात्र मानसिक तणावतून किंवा मद्पान करून हा धमकी वजा खोडसाळणे पाळवला असल्याचा पोलिसांना संशय आहे

Gondia Rain: गोंदिया जिल्ह्यात सकाळपासून काही ठिकाणी अवकाळी पावसाची रिमझिम, भाजीपाला आणि तुर पिकांना होणार नुकसान

Gondia Rain: गोंदिया जिल्ह्यात सकाळपासून काही ठिकाणी अवकाळी पावसाची रिमझिम....


पावसामुळे धान पिकाबरोबर भाजीपाला आणि तुर पिकांना होणार नुकसान... 


गोंदिया जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसापासून ढगाळ वातावरण होते.


आज सकाळी पासून ढगाळ वातावरणामुळे गोंदिया जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.


या पावसामुळे जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचे धान पीक कापून ठेवलाय आणि हा कापलेला धान या पावसामुळे खराब होण्याची शक्यता आहे.


तसेच पावसामुळे भाजीपाला, तुळ पीक यांना सुद्धा नुकसान होण्याची संभावना या पावसामुळे व्यक्त करण्यात येत आहे...

Nagpur - नागपुरातील वाठोडा पोलीस स्टेशनच्या पीएसआयला धक्काबुक्की, मारहाण चा वेडिओ सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 

Nagpur - नागपुरातील वाठोडा पोलीस स्टेशनच्या पीएसआयला धक्काबुक्की, मारहाण चा वेडिओ सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 


- याप्रकरणी धक्काबुक्की करणाऱ्या आरोपीस अटक 


- बाबा बोकडे, वय 40 वर्षे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव 


- 30 वर्षीय अश्विन गेडाम हे गुरुवारी रात्री आपल्या मामाच्या घरून परत येत असताना दुचाकी घसरल्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल खड्ड्यात पडले 


- या अपघातात अश्विन गेडाम यांचा मृत्यू झाला 

Nashik: किरकोळ कारणावरून नाशिक शहरात तरुणाची निर्घृण हत्या...

Nashik: किरकोळ कारणावरून नाशिक शहरात तरुणाची निर्घृण हत्या...


Nashik: तरुणाच्या हत्येने पुन्हा एकदा नाशिक शहर हादरले आहे...


इडली डोसा विक्री करणाऱ्या गाडीला लाथ मारल्याच्या रागातून सहा जणांच्या टोळक्याने एका हॉटेल चालकावर धारदार शस्त्राने आणि डोक्यात दगड खाल्ल्यात प्राण घातक हल्ला करत त्याचा खून केलाय...


काल रात्री उशिरा नाशिकच्या सिटी सेंटर मॉल जवळ असलेल्या  क्रांतीनगर भागातील  संभाजी चौक परिसरात ही घटना घडलीये...  


खून झालेला तरुण आणि संशयित एकमेकांच्या ओळखीचे आणि घराच्या शेजारील राहणारे होते अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे...

Ajit Pawar: अजित पवारांना दिलासा; बेनामी संपत्ती कायद्याखाली टाच करण्यात आलेली मालमत्ता मुक्त करण्याचे प्राधिकरणाचे आदेश

Ajit Pawar: अजित पवारांना दिलासा; बेनामी संपत्ती कायद्याखाली टाच करण्यात आलेली मालमत्ता मुक्त करण्याचे प्राधिकरणाचे आदेश


आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता मुक्त करण्यात आली.


दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने दिला निर्णय.


पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी सबंधित जप्त मालमत्ताही कोर्टाने मोकळी केली.


स्पार्कलिंग सॉइल, गुरु कमोडिटी, फायर पॉवर अग्री फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनीशी सबंधित मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या.

Solapur: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेयकादेशीर कर्ज वाटप प्रकरणी मोठा दणका, वसुली करण्याचे आदेश 

Solapur: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेयकादेशीर कर्ज वाटप प्रकरणी मोठा दणका 


238 कोटींच्या बेयकादेशीर कर्ज वाटप प्रकरणात जबाबदार धरलेल्या तत्कालीन संचालक मंडळासह बँकेचे दोन अधिकारी, एका चार्टड अकाउंटटकडून वसुली करण्याचे आदेश 


तत्कालीन संचालक मंडळातील 35 जणांकडून  एकूण 238 कोटी 43 लाख 999 हजाराच्या बेकायदेशीर कर्जाची 12 टक्के व्याजासह वसुली करण्यासाठीचे आदेश 


विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी जाहीर केले आदेश 


या आदेशामुळे बँकेचे तत्कालीन संचालक मंडळाचे सदस्य दिलीप सोपल, विजयसिंह मोहिते पाटील, दीपक आबा साळुंखे, राजन पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, दिलीप माने, बबनदादा शिंदे, संजय शिंदे, रश्मी बागल यांच्यासह जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांना मोठा दणका 

Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan - विधानसभेचे कामकाज सुरू होणार, आज हंगामी अध्यक्षांकडून शपथ दिली जाणार

Maharashtra Adhiveshan - आज हंगामी अध्यक्षांकडून शपथ दिली जाणार आहे
- ⁠विधानपरिषदेचे कामकाज नसणार
- ⁠उद्या 12 वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्ष पदा साठी नामांकन करायचं असेल
- ⁠तिसऱ्या दिवशी राज्यपालांच अभिभाषण होणार
- ⁠आज सकाळी 11 वाजता विधानसभेचे कामकाज सुरू होणार असून आमदारांच्या शपथविधीला सुरुवात होईल. 
- ⁠आज दिवसभर आणि उद्या शपथविधी सुरू राहील. 
- ⁠सोमवारी राज्यपालांचे अभिभाषण आणि नव्या विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. 
- ⁠राज्यपालांच्या आदेशाने विधान परिषदेची बैठक सोमवारी ९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

Vasai : वसईच्या नायगावात कौटुंबिक जमिनीच्या वादावरून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना

Vasai : वसईच्या नायगावात कौटुंबिक जमिनीच्या वादावरून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना एका वायरल व्हिडीओ वरून समोर आली आहे.


 मंगळवारी दुपारी १२:३० च्या सुमारास ही घटना घडली असून, काका पुतण्यात दगड, आणि लाठीकाठ्यांनी ही हाणामारी झाली आहे.


याबाबत नायागावं पोलीस ठाण्यात कलम 115(2), 118(1), 352 असा एकाच कुटूंबातील चौघांवर गुन्हा नोद झाला असून, नायगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.


मात्र या वायरल झालेल्या व्हिडिओमुळे  कौटुंबिक भांडण एक चर्चेचा विषय ठरला आहे.

Madhukar Pichad Death: ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं पार्थिव मूळगावी रवाना

Madhukar Pichad Death: ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं काल निधन झालं असून त्यांचे पार्थिव आज नाशिक येथून अकोले येथील राजुर या मूळ गावी काही वेळात रवाना होईल...

Buldhana: बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवस ढगाळ वातावरणानंतर आज सकाळी दाट धुक्याची चादर

Buldhana: बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवस ढगाळ वातावरणानंतर आज सकाळी दाट धुक्याची चादर.


दाट धुक्यामुळे अनेक मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू.


राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ व १६१ वरील वाहतूक अनेक ठिकाणी थांबली.


धुक्यामुळे दृश्यमानता फक्त दहा मीटर.


धुक्यामुळे रब्बी पिकांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता.

पार्श्वभूमी

Maharashtra Election Results News 07 December 2024 Live Updates: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विराजमान झाले असून महायुतीचे (Mahayuti) सरकार स्थापन झाले आहे. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात नेमकं कोण कोण असेल? याची उत्सुकता अवघ्या राज्यातील जनतेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहेत. देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.