Maharashtra Breaking News LIVE: राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा; एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live Updates: राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...

मुकेश चव्हाण Last Updated: 06 Jan 2025 12:44 PM
परभणीतील घटनेचा निषेधार्थ बीडमध्ये संविधान बचाव जनआक्रोश मोर्चा 

Parbhani Violence : परभणी येथील घटनेचा निषेध व्यक्त करत, बीडमध्ये आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने संविधान बचाव जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला बीड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात झाली असून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.


या मोर्चाच्या माध्यमातून, सोमनाथ सुर्यवंशीच्या हत्येस जबाबदार पोलीसांवर गुन्हे दाखल करा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणारे गृहमंत्री अमित शहा यांची मंत्री मंडळातुन हकालपट्टी करा, परभणी येथील महिलांवर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलीसांवर गुन्हे दाखल करा, देशातील सर्व निवडणूका मतपत्रिकेवर घ्या, शासकिय नोकरीतील गुत्तेदारी पध्दती रद्द करुन कायमस्वरुपी नौकरी द्या आणि रिक्त असलेल्या राखीव जागा त्वरीत भरा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणारी भारत सरकार शिष्यवृत्ती दरमहा वेळेवर द्या, शासकिय सेवेतील आरक्षणामधील वगर्गीकरण कायदा रद्द करा, शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करा. या प्रमुख मागण्या करण्यात येत आहेत.


 


 

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चार आरोपी आज केज जिल्हा व सत्र न्यायालयासमोर 

Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील चार आरोपींना आज केज पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. प्रतीक घुले, महेश केदार, जयराम चाटे आणि विष्णू चाटे यांना अटक केल्यानंतर 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. आज ही कोठडी पूर्ण झाल्यानंतर केज पोलीस ठाण्यात चौकशी झाल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल 14 दिवसांची कोठडी पूर्ण झाली असली तरी अद्याप या प्रकरणाचा तपास बाकी आहे. त्यामुळे या आरोपींना आणखी कोठडी वाढण्याची शक्यता आहे

मुख्यमंत्र्यांनी पाठवली अजमेर दर्ग्यासाठी चादर

Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्य मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना अजमेर शरीफ दर्ग्यावर चढविण्यासाठी चादर दिली आहे. यावेळी अल्पसंख्यक मोर्चा पदाधिकाऱ्यांनी चादर घेऊन ख्वाजा गरीब नवाज यांच्या उर्ससाठी रवाना होत असल्याचे भाजप अल्पसंख्यक मोर्चाचे पदाधिकारी फिरोझ शेख यांनी  सांगितले आहे.

मुख्यमंत्र्यांनी पाठवली अजमेर दर्ग्यासाठी चादर

Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्य मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना अजमेर शरीफ दर्ग्यावर चढविण्यासाठी चादर दिली आहे. यावेळी अल्पसंख्यक मोर्चा पदाधिकाऱ्यांनी चादर घेऊन ख्वाजा गरीब नवाज यांच्या उर्ससाठी रवाना होत असल्याचे भाजप अल्पसंख्यक मोर्चाचे पदाधिकारी फिरोझ शेख यांनी  सांगितले आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी सरपंच परिषद आक्रमक

Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी सरपंच परिषद आक्रमक झाली असून राज्यातील सरपंच मुंबईत येत एकदिवसीय आंदोलन करणार आहेत. सरपंच परिषदेकडून उद्या आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या हत्येप्रकरणी मोक्काअंतर्गत कारवाई करावी, मारेकऱ्यांना आश्रय देणाऱ्यांवर कारवाई व्हावी, देशमुख यांच्या पत्नीला शासकीय नोकरी आणि 50 लाखांची मदत करण्यात यावी, ग्रामपंचायत कामात अडथळा आणल्यास सरपंच, उपसरपंच यांना 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची परवानगी द्यावी आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशा मागण्या सरपंच परिषदेकडून करण्यात आल्या आहेत.

भारतात HMPV चा पहिला रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर 

भारतात HMPV चा पहिला रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर 


आरोग्य विभागाने गाईड लाईन जारी केल्यानंतर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर घेणार महत्त्वाची बैठक ..


राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर गुरुवारी आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक घेणार...


बैठकीत HMPV विषाणूबाबत आणि त्याच्या तीव्रतेबाबत चर्चा होणार...


सर्वसामान्यांमध्ये कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी नेमक्या कोणत्या बाबी अधोरेखित करणे महत्त्वाचे आहे याबाबत चर्चा करणार...

बेंगळुरूमधील एका रुग्णालयात आठ महिन्यांच्या मुलीला एचपीव्हीची लागण

चीनचा एचएमपीव्ही व्हायरस अखेर भारतात पोहोचला आहे, पहिली केस बेंगळुरूमध्ये नोंदवण्यात आली आहे. एका आठ महिन्यांच्या मुलीला याची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हायरसची पहिली केस समोर येणे ही मोठी बाब आहे कारण चीनमध्ये तो वेगाने पसरत आहे आणि तेथील परिस्थिती स्फोटक असल्याचे दिसते. 

मुंबईतील प्रदूषणाबाबतची आजची बैठक पुढे ढकलली

मुंबईतील प्रदूषणाबाबतची आजची बैठक पुढे ढकलली


राज्य सरकार प्रदूषणाबाबत धोरणात्मक निर्णय राबवण्यात सपशेल अपयशी


पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज प्रदूषणाबाबत बोलावली होती तातडीची बैठक


आज ऐवजी उद्या दुपारी मंत्रालयात होणार बैठक


प्रदूषणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही?

वाल्मिक कराड सोबत फोटो काढणे आले अंगलट

वाल्मिक कराड सोबत फोटो काढणे आले अंगलट


जितेंद्र आव्हाड यांच्या अक्षेपानंतर उचलबांगडी


Api महेश विघ्ने यांच्यासह दोघांना sit तून बाजूला सारले


Api महेश विघ्ने यांचा वाल्मीक कराड सोबत होता फोटो


हवलादार मनोज वाघ यांनाही बाजूला सारले..


हे तिन्ही कर्मचारी बीड स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी आहेत..


एस आय टी मध्ये यांचा समावेश झाल्यानंतर सुद्धा बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना रिलीव्ह केलेले नव्हते..


याचाच अर्थ हे तिघेजण आता एस आय टी चा भाग असणार नाहीत

वाल्मिक कराड सोबत फोटो काढणे आले अंगलट

वाल्मिक कराड सोबत फोटो काढणे आले अंगलट


जितेंद्र आव्हाड यांच्या अक्षेपानंतर उचलबांगडी


Api महेश विघ्ने यांच्यासह दोघांना sit तून बाजूला सारले


Api महेश विघ्ने यांचा वाल्मीक कराड सोबत होता फोटो


हवलादार मनोज वाघ यांनाही बाजूला सारले..


हे तिन्ही कर्मचारी बीड स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी आहेत..


एस आय टी मध्ये यांचा समावेश झाल्यानंतर सुद्धा बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना रिलीव्ह केलेले नव्हते..


याचाच अर्थ हे तिघेजण आता एस आय टी चा भाग असणार नाहीत

बजरंग सोनवणे पुढील २ दिवसांत पुन्हा अमित शाह यांची भेट घेणार 

खासदार बजरंग सोनवणे पुढील २ दिवसांत पुन्हा अमित शाह यांची भेट घेणार 


अमित शाह यांच्या भेटीनंतर ज्या घडामोडी घडल्या त्यामुळे समाधानी असल्याची बजरंग सोनवणे यांची माहिती 


पुन्हा भेट घेऊन सध्याची परिस्थिती अमित शाह यांच्या समोर मांडणार- सोनवणे

मोहोळ बस स्थानकात उभ्या असणाऱ्या एसटी बसने घेतला पेट 

बस स्थानकावर थांबल्या जागी एस टी बसने अचानक घेतला पेट 


मोहोळ बस स्थानकात उभ्या असणाऱ्या एसटी बसने घेतला पेट 


सांगोल्याहुन हैद्राबादकडे जाणारी बस मोहोळ बसस्थानकात थांबलेली असताना घडली घटना 


चालक आणि वाहकांच्या सतर्कतेमुळे पूर्णपणे भरलेल्या बस मधील प्रवाशांचा वाचला जीव..


एस टी बस मधील इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे घडला प्रकार 


या आगीत सर्व बस जळून खाक झाली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये

प्रयागराज येथे विश्वहिंदू परिषद विदर्भ प्रांत कडून 45 दिवस अन्नछत्र
प्रयागराजमध्ये यावर्षी महाकुंभाचे आयोजन होता आहे. देशभरातून येणाऱ्या साधुसंतांसाठी लंगर आयोजित केली जाणार असून यात यवतमाळातील विश्वहिंदू परिषद सहभाग घेणार आहे. यवतमाळकरांच्या सहभागातून हे लंगर 45 दिवस चालणार असून प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर महाकुंभ होणार आहेत. 13 जानेवारी ते 27 फेब्रुवारी या दरम्यान लंगर पार पडणार असल्याची माहिती पत्रकार परिषद मध्ये देण्यात आली.
इगतपुरी लोहमार्ग पोलिसांची मोठी कामगिरी

इगतपुरी लोहमार्ग पोलिसांची मोठी कामगिरी


कसारा घाटात चालत्या रेल्वेगाडीत लुटपाट करणाऱ्या दोन चोरांच्या आवळल्या मुसक्या


मागील महिन्यात ४,४७,६३४  रुपयांच्या किमतीची सोने व चांदीचा ऐवज असणारी बॅग लांबवली होती


पोलिसांनी तपास करून दोन आरोपींना शहापूर तालुक्यातून केली अटक


त्यांच्या जवळून २,८७,२५३ रुपये किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत


न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे


अजूनही बरेच गुन्हे उघड होण्याची शक्यता

स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून 18 लाख 77 हजारची रोकड चोरट्यांनी पळवली

कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून 18 लाख 77 हजारची रोकड चोरट्यांनी पळवली आहे. घटनेची माहिती मिळताच चंदगड पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली.. पळून जाणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र पोलिसांनी लावलेले बॅरिकेट उडवून चोरटे पाळले आहेत... चोरट्यांच्या गाडीचा टायर फुटल्याने थोड्या अंतरावर गाडी सोडून चोरटे गायब झाले... चोरी करणारे राजस्थानातील असल्याचा अंदाज पोलिसांनी लावला आहे...कोवाड ही चंदगड तालुक्यातील मोठी बाजारपेठ आहे... गेल्या अनेक वर्षांपासून येथे सीसीटीव्हीचा प्रश्न भिजत आहे... त्यातच एकाही एटीएम केंद्रावर सुरक्षारक्षक नाही... त्यामुळे चोरट्याने 18 लाख 77 हजार रुपयांच्या रोकड वर डल्ला मारल्याचे बोलले जाते.

उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळं किमान तापमान पुन्हा घटलं

वातावरण निरभ्र झाल्यानं तसेच उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळं किमान तापमान पुन्हा घटलेय. परिणामी, थंडीमुळं गारठा वाढला असून, हुडहुडी भरू लागलीय. मागील काही दिवस आकाशात ढगांच्या गर्दीनं किमान तापमानात मोठी वाढ झाली होती. सरासरीपेक्षा 10 अंशांनी तापमान वर आलं होतं. थंडीचा जोर ओसरणार असं जाणवत असतानाचं पुन्हा मागील तीन दिवसांपासून ग्रामीण भागात पुन्हा शेकोट्या पेटू लागल्या आहेत. चार दिवसांपासून थंडीचा कडाका वाढल्यानं स्वेटर, मफलरला पसंती वाढली आहे. जिल्हावासीयांना पुन्हा गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. ग्रामीण भागात रात्री 9 वाजेनंतर घराबाहेर पडणाऱ्यांची संख्याही रोडावली आहे. हिवाळ्याचे दिवस असल्यानं हे वातावरण आणखी काही दिवस कायम राहू शकते.

37वी राष्ट्रीय अट्यापाट्या स्पर्धा शेगावात संपन्न

37 वी राष्ट्रीय अट्यापाट्या स्पर्धा बुलढाण्यातील शेगाव येथे काल पार पडली. तीन ते पाच जानेवारी रोजी शेगाव येथील शिवबा मैदानावर ही स्पर्धा पार पडली. देशातील हरियाणा, केरळ, मध्य प्रदेश, बिहार, तेलंगाना,.पांडिचेरी , महाराष्ट्र सह देशातील 22 राज्यातील खेळाडूंनी यात सहभाग घेतला होता . या स्पर्धेत महाराष्ट्रातील मुलांचा संघ तर पॉंडिचेरीतील मुलींचा संघ देशात अव्वल ठरला या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक जमले होते.

वातावरण बदलाचा संत्रा उत्पादकांना फटका

अहिल्यानगर जिल्ह्यात सततच्या बदलत्या वातावरणाचा फळबागांना फटका बसला आहे... हवामानात होणाऱ्या बदलामुळे नगर तालुक्यातील संत्रा पिकावर काजळी रोगाच्या प्रादुर्भाव झाल्याने 60 ते 70 टक्के उत्पादनावावर परीणाम होणार असल्याचे शेतकरी सांगतात...रोगांच्या प्रादुर्भावामुळे संत्रा झाडाच्या पानाची आणि फुलांची पुर्ण वाढ होत नसल्यामुळे उत्पादनातं घट येणार आहे... त्यातच फळांचा आकार कमी राहत असून गुणवत्ता देखील घसरणार असल्याने व्यापारी फळ घेण्यासाठी इच्छुक नसल्याचे पाहायला मिळत आहे...  यंदा संत्रा बागांची लागवडीत वाढ झाली असली तरी उत्पादन कमी होणार असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलंमडणार असल्याने शेतकरी चिंता व्यक्त करत आहे... अहिल्यानगर जिल्ह्यात उशिरा आणि असमाधानकारक झालेल्या पाऊसाचा फटका संत्रा बागांना बसला आहे... यंदा नगर तालुक्यात  2 हजार हेक्टरच्यावर तब्ब्ल 95 टक्के शेतकऱ्यांनी संत्रा फळाची लागवड केली... मात्र वातावरणामुळे फळांचा बहार कमी आला आहे.

संतोष देशमुख व परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या न्यायासाठी धाराशिवमध्ये जन आक्रोश मोर्चाचे आयोजन

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व परभणी येथील घटनेतील सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व समाज, सर्वपक्षीय,सर्व सामाजीक संघटना वतीने 11 जानेवारी रोजी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.धारशिव शहरातील राष्ट्रमाता जिजाऊ चौकातुन सकाळी 10 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.दरम्यान याबाबत सकल मराठा समाजाच्या वतीने बैठक घेत मोर्चाचे नियोजन करण्यात आले असुन या मोर्चात लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

आळंदीत दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार प्रकरणी तरुणास अटक

-आळंदीत दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार प्रकरणी तरुणास अटक


-आळंदीत दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 


-संस्थेत पाहुणा म्हणून आलेल्या अठ्ठावीस वर्षीय तरुणाने संस्थेत शिकत असलेल्या बारा वर्षीय दोन मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले.

गुजरातमधील वलसाड जिल्ह्याच्या काही भागात आणि पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के

गुजरातमधील वलसाड जिल्ह्याच्या काही भागात आणि पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के बसले. पहाटेच्या सुमारास दोन सलग लागलेल्या भूकंपाच्या धक्क्याने पालघर हादरलं . पालघरच्या बोर्डी , दापचरी , तलासरी भागात जाणवले भूकंपाचे धक्के . सतत बसणाऱ्या धक्क्यामुळे परिसरात भीतीच वातावरण . 4.35 च्या सुमारास लागलेल्या धक्क्याची तीव्रता 3.7 रिष्टर स्केल  असल्याची माहिती

आज मीनाताई ठाकरे यांचा स्मृतिदिन...

मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय अकरा वाजता शिवाजी पार्क मैदान येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला करणार अभिवादन 


मीनाताईंच्या स्मृतिदिनानिमित्त छत्रपती शिवाजी पार्क मैदान येथे असलेल्या मीनाताई यांच्या पुतळ्या ठिकाणी फुलांनी सजवण्यात आलं आहे. 


ठाकरे कुटुंबीय तसेच पक्षाचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने अभिवादन करण्यासाठी येतात

चीनमधील कोविडसदृश्य असलेल्या HPMV वायरसमुळे महाराष्ट्रातील आरोग्य विभागही सज्ज

चीनमधील कोविडसदृश्य असलेल्या HPMV वायरसमुळे महाराष्ट्रातील आरोग्य विभाग ही सज्ज 


घाबरू नका, पण सावध राहा आरोग्य विभागाचा नागरिकांना सल्ला 


सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांचा नियमित सर्वेक्षण करण्याचे अधिकाऱ्यांना दिले आदेश 


स्वच्छतेच्या नियमावली पाळण्याचे देखील दिले आदेश

शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या संपादकीयमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिकेची झोड

शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या संपादकीयमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिकेची झोड


देशात ८० कोटी गरीबांना फुकट धान्य द्यायचे व परदेशात जाऊन तेथील प्रमुखांना आकर्षक भेट वस्तू द्यायच्या हा पंतप्रधान मोदींचा शौक आहे


भारतात २०२३-२४ मध्ये ३७ लाख मुलांना शाळा शिक्षण सोडले. ज्यात १६ लाख मुलींचा समावेश आहे.


गरीबीमुळे त्यांच्यावर शाळा सोडण्याची वेळ आली आणि पंतप्रधान मोदी शिश महालातून भाषण झोडित आहेत


भारत देश गरीब आहे पण भारत देशाचा राजा हा विलासी आहे. पण बोलायचे कोणी ? बोलेंगे तो कटेंगे....


दिल्ली विधानसभा निवडणुकीवरून सामानाच्या संपादकिय लेखात मोदींना चिमटे

सिंधुदुर्गातील १५६ ठिकाणी वक्त बोर्डचा जमिनीवर दावा
 नितेश राणेंनी सिंधुदुर्गातील आंबोली मध्ये हिंदू धर्म परिषदेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० टक्के जागा आणि महत्त्वाची देवस्थानावर वक्त बोर्डचा दावा केल्याचा दावा केला होता. तसेच त्यात जिल्देह्यातील देवस्थान असल्याचा दावा देखील त्यांनी केला होता. त्या आधारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५६ ठिकाणी वक्फ बोर्डाने दावा केल्याची यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे.  यात देवगड, कणकवली, कुडाळ, मालवण, सावंतवाडी आणि वेंगुर्ले याठिकाणी जिल्ह्यातील १५६ ठिकाणी वक्फ बोर्डाच्या जमिनीवर दावा केल्याचं दिसून येत आहे. यात शेतजमिनीवर दावा केल्याचं देखील दिसत आहे. 

 

 
परळीनंतर बीडमध्येही जरांगे पाटील यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

धनंजय मुंडेंच्या विरोधात परभणी येथे केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर बीड शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सलग दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या आधी मुंडे समर्थकांनी परळी पोलीस ठाण्यात ठिय्या केल्यानंतर त्या ठिकाणी देखील अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.

छत्रपती संभाजीनगरमधील मॉलला भीषण आग

छत्रपती संभाजीनगर शहरातील चेलीपुरा भागातील महावीर घरसंसार या तीनमजली छोट्या मॉलला रात्री १२ च्या सुमारास भीषण आग लागली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी मॉलमधील लाखो रुपयांच्या वस्तूंची राखरांगोळी झाली. आगीचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. आधी मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. काही क्षणात तिने संपूर्ण मॉलला वेढले. शेजारची दोन दुकाने व एका घरालाही आगीच्या झळा पोहोचल्या. परिसरातील नागरिकांनी तातडीने घरातून लोकांना बाहेर काढल्यामुळे सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. रात्री दोन वाजेपर्यंत अग्निशमन विभागाचे ६ बंब, एका टँकरच्या साह्याने आग विझविण्याचे काम सुरू होते.

सिने अभिनेत्रीसह अनेकांची कोट्यावधी रुपयांना फसवणूक

दहा महिन्यात गुंतवणूक केलेली रक्कम दुप्पट करून देतो असे सांगून सिने अभिनेत्रीसह अनेकांची कोट्यावधी रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार मालाडमध्ये उघडकीस आला आहे


या प्रकरणी ११ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला  असून फरार आरोपींच्या शोधासाठी मालाड पोलिसांनी विशेष पथक नेमले आहे

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News Live Updates: राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. तर चीनमध्ये कोविड-19 साथीच्या आजारानंतर पाच वर्षांनी एक नवीन आरोग्य संकट उद्भवले आहे. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलं आहे. बीडचे मस्साजोग येथील सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.