Maharashtra Breaking News Live Updates : मंत्रिमंडळात शिवसेनेकडून यंदा मोठे बदल दिसण्याची शक्यता, यावेळी कठोर निकष लावले जाणार

Maharashtra Election Results News Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....

प्रज्वल ढगे Last Updated: 06 Dec 2024 01:01 PM
मंत्रिमंडळात शिवसेनेकडून यंदा मोठे बदल दिसण्याची शक्यता, यावेळी कठोर निकष लावले जाणार

मंत्रिमंडळात शिवसेनेकडून यंदा मोठे बदल दिसण्याची शक्यता

कठोर निकष लावून एकनाथ शिंदे मंत्रिपदाची माळ गळ्यात घालणार -सूत्र

पक्ष संघटना वाढवणारे आणि जे पात्र असतील त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान -सूत्र

पक्ष संघटना वाढीसाठी योगदान काय  याचा विचार केला जाणार-सूत्र

निवडणुकीच्या प्रचारात किती साथ दिली याचा विचार केला जाणार-सूत्र

ज्येष्ठतेच्या  मुद्द्यावर मंत्रिपद दिलं जाणार नाही-सूत्र

नाशिक शहरात चेन स्नॅचिंग घटनांचा आलेख वाढता, पाच दिवसात 11 चेन स्नॅचिंग

नाशिक ब्रेकिंग...

- नाशिक शहरात चेन स्नॅचिंग घटनांचा आलेख वाढता...
- शहरात गेल्या पाच दिवसात 11 चैन स्नॅचिंगच्या घटना यात साडेपाच लाखाहून अधिकचा ऐवज चोरी...
- पोलीस गस्तीवर असताना चेन स्नॅचिंग, पोलिसांना हुलकावणी देत चोरटे फरार...
- नाशिक शहरात इराणी टोळी असल्याचा संशय,पोलिसांकडून इराणी टोळीचा शोध सुरू...
- शहर पोलिसांची स्टॉप अँड सर्चची मोहीम गतिमान...
- शहरात वाहतूक पोलिसांसह शहर पोलीस आणि होमगार्ड ठिकठिकाणी तैनात...

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्या राज्यातील महायुतीच्या नेत्यांची बैठक 

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्या राज्यातील महायुतीच्या नेत्यांची बैठक 

महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांची आज बैठक पार पडली 

प्रफुल पटेल यांच्या सीजे हाऊस येथील निवासस्थानी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यात १ तास बैठक 

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बैठकीत चर्चा 

बैठकीत ७ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री पदाचे चेहरे निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती

काँग्रेसच्या खासदारांच्या बाकाखाली नोटांची बंडलं सापडल्याचा आरोप, राज्यसभा सभापतींनी दिली माहिती 

राज्यसभेच्या सभागृहात  गदारोळ 

काँग्रेसच्या खासदारांच्या बाकाखाली नोटांची बंडलं सापडल्याचा आरोप 

काल रात्री झालेल्या तपासणीत नोटांची बंडलं सापडल्याचा आरोप

राज्यसभा सभापतींनी दिली माहिती 

आरबीआयकडून थोड्याच वेळात पतधोरण जाहीर करण्यात येणार

आरबीआयकडून थोड्याच वेळात पतधोरण जाहीर करण्यात येणार

गव्हर्नर शक्तिकांत दास सकाळी १० वाजता पतधोरण जाहीर करतील 

रेपो दर ६.५ टक्क्यांवर स्थिर राहण्याची अपेक्षा आहे

मात्र, वाढता महागाई दर आणि धीम्यागतीनं आर्थिक विकास दराला गती देण्यासाठी रोख राखीव प्रमाण (CRR) मध्ये समायोजनाची शक्यता आहे

शक्तिकांत दास यांच्या कार्यकाळातील ही अंतिम पतधोरणाची बैठक आहे 

दास यांचा कार्यकाळ १० डिसेंबर रोजी संपतोय

सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून कालिदास कोळंबकर भूषवणार हंगामी विधानसभा अध्यक्षपद

सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून कालिदास कोळंबकर भूषवणार हंगामी विधानसभा अध्यक्षपद

पुढील तीन दिवसीय अधिवेशनात कोळंबकरांकडे हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी

पहिल्या दोन दिवसांत नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार 

९ डिसेंबरला नव्या अध्यक्षाची निवड होणार 

आमदारांच्या बहुमताने विधानसभा अध्यक्ष निवड होणार

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती होणार

विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी आज राजभवनामध्ये राज्याचे राज्यपाल हंगामी विधानसभा अध्यक्ष ( pro time speaker) यांना शपथ देणार.

राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती होणार

आज ते हंगामी अध्यक्ष म्हणून राजभावनात जाऊन घेणार शपथ

विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड केली जाते 

आज या हंगामी अध्यक्षांना शपथ दिली जाईल 

7,8 आणि 9 डिसेंबर या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशन दरम्यान हे हंगामी अध्यक्ष विधानसभेतील नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील

भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव या पुस्तकाचे राज्यपालांचे हस्ते प्रकाशन

भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते होतं आहे.

माजी खासदार अर्थतज्ञ नरेंद्र जाधव यांनी हे पुस्तक लिहिले आहे

खोपोलीत अंगावर भिंत कोसळून सहा कामगार जखमी 

खोपोली - ब्रेकींग 

अंगावर भिंत कोसळून सहा कामगार जखमी 

खोपोली मधील उंबरे गावातील घटना 

छत्रपती संभाजी नगर शहरात आज पहाटेपासून पावसाच्या सरी बरसल्या

छत्रपती संभाजी नगर शहरात आज पहाटेपासून व पावसाच्या सरीवर बरसल्या. सकाळी कामासाठी निघालेल्या लोकांची अचानक आलेल्या पावसामुळे धावपळ झाली. तर अनेकांना छत्री घेऊन बाहेर पडावे लागेल..

देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याकडून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याकडून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याकडून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चैत्यभूमीवर दाखल

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चैत्यभूमीवर दाखल

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चैत्यभूमीवर दाखल

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार चैत्यभूमीवर दाखल

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार चैत्यभूमीवर दाखल

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात महायुतीच्या नव्या सरकारची स्थापना झालेली आहे. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहेत. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता सरकारची स्थापना झाल्यानंतर सर्वांनाच फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात नेमकं कोण कोण असेल? याची उत्सुकता लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहेत. दुसरीकडे राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. जागोजागी लोक शेकोट्या पेटवताना दिसत आहेत. आज 6 डिसेंबर आहे. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरीनिर्वाण झाले होते. त्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायी लाखोंच्या संख्याने जमा झाले आहेत. या प्रमुख घडामोडी तसेच राज्यातील इतरही घडामोडींच्या अपडेट्स वाचा एका क्लिवकर...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.