Maharashtra Breaking News LIVE:राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा; एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live Updates: राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...

मुकेश चव्हाण Last Updated: 04 Jan 2025 01:39 PM
राम शिंदेंच्या सत्कार सोहळ्याकडे भाजप नेत्यांनी फिरवली पाठ

अहिल्यानगर: विधानपरिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची निवड झाल्याबद्दल आज अहिल्यानगर शहरात शिंदे यांचा सर्वपक्षीय सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलाय. अहिल्यानगर शहरातील माऊली सभागृहात हा सत्कार सोहळा होत असून या सर्वपक्षीय सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे असून या सोहळ्याला पोपटराव पवार, आ. सत्यजित तांबे, आ. हेमंत ओगले यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती आहे.

मात्र या सत्कार सोहळ्याला भाजप आमदारांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. मंत्री राधाकृष्ण विखे, आ. शिवाजी कर्डीले, आ. मोनिका राजळे यांची मात्र या सत्कार सोहळ्याला सध्यातरी उपस्थिती दिसत नाही. शिर्डी येथे होणाऱ्या भाजप प्रदेश मेळाव्याच्या तयारीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक होत असल्याने सर्व आमदार त्या बैठकीसाठी गेले असल्याची माहिती आहे...मात्र भाजपच्याच नेत्यांचीच उपस्थिती नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आंतरराष्ट्रीय निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 84व्या वाढदिवसानिमित्त आज बारामतीत आंतरराष्ट्रीय निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. नामांकित मल्लांच्या चित्तथरारक लढती होणार असून या आखाड्यात इतर तुल्यबळ अशा सुमारे दीडशे कुस्त्या होणार आहेत. बारामती तालुका कुस्ती संघ व युगेंद्र पवार युवा मंच यांच्या वतीने या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद  पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी साडेपाच वाजता शरद पवार बारामतीतील शारदा प्रांगण या ठिकाणी कुस्त्यांना हजेरी लावतील.

ठाण्यानंतर पुण्यात हिंदी-मराठी वाद पेटला; मनसेच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला  

ठाणे : ठाण्यानंतर आता पुण्यात हिंदी-मराठी वाद पेटला असल्याचे पुन्हा एकदा बघायला मिळाले आहे. परिणामी, मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या एअरटेल, वाकडेवाडी येथील शाहबाज अहमद या टिम लीडरला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईल चोप  दिला आहे. एअरटेलच्या कर्मचारी वर्गाला फ्लोअरवर हिंदीच बोलायचं, मराठी बोलले तर कामावरून काढून टाकेल जाईल असा इशारा देण्यात आला. सोबतच हिंदू सणांना सुट्टी न देणे तसेच गेले 3 महिने मराठी पोरांचा पगार केला नसल्याचे पुढे आले आहे. 

त्यावर येथील कामगारांनी मनसेकडे तक्रार केली की आमचा पगार थांबवला आहे. म्हणून त्या शाहबाज अहमद ने आपल्या मराठी पोरांना धमकी दिली की कोनसी भी सेना लेके आओ, नही बोलता मराठी आणि कामावरून काढून टाकतो बघू कोण येतंय. असा धमकी वजा इशारा दिला. या मराठी पोरांच्या अन्यायाला काल मनसे स्टाईलने वाचा फोडली आणि येत्या सोमवारी पोरांचे पगार करायला लावले आहेत. अन्यथा एकाच वेळी एकाच दिवशी स्वारगेट, वाकडेवाडी, खराडी येथील 3  एअरटेल ऑफिस फोडून टाकणार, असा अंतिम इशारा मनसेकडून राज्य सचिव आशिष साबळे पाटील यांनी दिला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला, नेमकं कारण काय?

नवी दिल्ली: भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. येत्या 12 जानेवारीला शिर्डी इथं होणाऱ्या महाअधिवेशनाची शहा यांनी यावेळी माहिती जाणून घेतली. तसेच यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमित शहा यांना महालक्ष्मी जगदंबा मातेचे काष्ठशिल्प भेट देवून कोराडी येथील आईच्या दर्शनासाठी येण्याचे निमंत्रण दिले.

पकडलेले आरोपी केवळ प्यादं, मुख्य आरोपी तर आकाच आहे, सुरेश धस यांचा हल्लाबोल 

Suresh Dhas : पकडलेले आरोपी हे प्यादे आहेत. मुख्य आरोपी आकाच असल्याची प्रतिक्रिया भाजपा आमदार सुरेश धस यांनी दिले आहे. मी म्हणालो होतो बकरे की अम्मा कब तक दुवा मागे गी... आज दोन आरोपींना अटक केली. एलसीबीने त्यांना अटक केल्याची माहिती मिळतेय. त्यासाठी एलसीबीचे अभिनंदन. संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये चालू असलेल्या चौकशीमध्ये आपण समाधानी असल्याचे आमदार सुरेश धस म्हणालेत. 

Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकूण सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

Santosh Deshmukh Case Update : बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एकूण सात आरोपींविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1) जयराम चाटे, 2)महेश केदार 3) प्रतीक घुले आणि 4)विष्णू चाटे या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती तर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या दोन आरोपींना रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता कृष्णा आंधळे हा एक आरोपी फरार आहेत. त्याच्या अटकेसाठी विशेष पथक मागावर आहे.

देशातील केवळ 57 टक्के शाळांमध्ये कार्यरत संगणक

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या UDISE डेटानुसार देशातील केवळ 57 टक्के शाळांमध्ये कार्यरत संगणक आहेत. तर 53 टक्के शाळांमध्ये इंटरनेटचा वापर आहे.

90 टक्क्यांहून अधिक शाळा वीज आणि लिंग-विशिष्ट शौचालये यासारख्या मूलभूत सुविधांनी सुसज्ज आहेत, परंतु कार्यक्षम डेस्कटॉप, इंटरनेट प्रवेश आणि हँडरेल्ससह रॅम्प यासारख्या प्रगत सुविधा मर्यादित आहेत.

केवळ 57.2 टक्के शाळांमध्ये कार्यक्षम संगणक आहेत, 53.9 टक्के शाळांमध्ये इंटरनेट आहे आणि 52.3 टक्के शाळांमध्ये रॅम्प आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे, ज्यामुळे प्रवेशयोग्यता आणि तांत्रिक तयारीमधील महत्त्वपूर्ण अंतर अधोरेखित होते.

2023-24 मध्ये एकूण विद्यार्थ्यांची संख्या 37 लाखांनी घसरून 24.8 कोटींसह नावनोंदणीच्या लँडस्केपमध्येही बदल झाला आहे.

सहलीला आलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिगडली

डिसेंबर महिना उजाडला की महाबळेश्वर सह कोकणात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत असतात. यातच शालेय विद्यार्थ्यांच्या सहली रायगड किल्ला, चवदार तळे, नरवीर तानाजी मालुसरे स्मारक पाहण्यासाठी येत असतात. न्यू हायस्कूल वरुळ, घाटवड, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना या शाळेची सहल महाबळेश्वर येथून रायगडच्या पोलादपूर कडे येत असताना बसमधील 18 विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक खालावली. या सर्व विद्यार्थ्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले. शाळेचे शिक्षक प्रकाश बंसीधर मस्तीके यांस याबद्दल विचारले असता महाबळेश्वर येथे विद्यार्थ्यांनी तेलकट खाद्यपदार्थ खाल्ल्याने तसेच स्टिंग सारखी शीतपेय पिल्याने विद्यार्थ्यांना हा त्रास होत असल्याचे सांगितले.

गिरीश महाजन विठ्ठल मंदिराच्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची पाहणी करणार

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे विठ्ठल मंदिराच्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची पाहणी करण्यासाठी दुपारी सव्वा बारा वाजता पंढरपूर मध्ये पोहोचणार आहे. विठ्ठल मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात अशावेळी मंदिराच्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात अनेक त्रुटी होत्या. आता या त्रुटी दूर करण्यासाठी एक आराखडा बनवण्याचे काम सुरू असून यासाठी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे थोड्या वेळात पंढरपूर मध्ये पोहोचणार आहेत.

चंद्रपूर शहरालगतच्या नांदगाव खुल्या कोळसा खाणीत वाघाचा वावर

चंद्रपूर शहरालगतच्या नांदगाव खुल्या कोळसा खाणीत वाघाचा वावर, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला भला मोठा वाघ, बूम बॅरिअरजवळ तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाला दिसला हा वाघ, नांदगाव खाणीच्या आवारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही हा वाघ झाला कैद, कोळसा खाण क्षेत्रात वाघ असल्याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघिणीला जेरबंद करण्याचा घेतलाय निर्णय, खाण परिसरात वाघ दिसल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाने वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी कामगारांची मागणी, खाणीतून मातीचे अजस्त्र ढीग निघत असून आता हे ढीग बनले आहेत डोंगर, या टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात जंगलासारखी झुडपे असल्याने या भागात वन्यप्राण्यांचा वावर आहे.

एका लॉजमधून ताब्यात घेतलेल्या चौघ बांगलादेशीची चौकशी सुरू

धुळे शहरातील पाच कंदील परिसरातील एका लॉजमधून ताब्यात घेतलेल्या चौघ बांगलादेशीची चौकशी सुरू असून या चौघांवर यापूर्वी मुंबई, दर्यापूर व कारंजा येथे बनावट विदेशी चलनाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. पोलिसांनी भारतात अवैधरीत्या राहणारे बांगलादेशी मोहंमद मेहताब बिलाल शेख, त्याची पत्नी शिल्पी बेगम मोहंमद बेताब, ब्युटी बेगम पोलस शेख, रिपा रफीक शेख यांना अटक केली होती. विदेशातील बनावट चलन देऊन ते नागरिकांना गंडा घालत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी त्यांच्यावर मुंबई, दर्यापूर व कारंजा येथे गुन्हे दाखल आहे. फसवणूक व इतर स्वरूपातील हे गुन्हे असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. ब्युटी व शिपाचे फरार पती पोलिसांच्या हाती आलेले नसून त्यांचा देखील पोलिसांकडून शोध सुरु आहे.

मिरा रोडवरील शांती शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार; सीसीटीव्ही फुटेज आला समोर

मिरा रोड रेल्वे स्थानकाजवळील शांती शॉपिंग सेंटरमध्ये काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास चष्म्यांच्या व्यवसायाशी संबंधित शम्स तबरेज अन्सारी यांच्या डोक्यात गोळी झाडून अज्ञात हल्लेखोराने त्यांची हत्या केली आणि पळ काढला होता. 

घटनास्थळी घडलेल्या या हत्याकांडाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. या फुटेजमध्ये हल्लेखोर शांतपणे घटनास्थळी येताना दिसत आहे. त्याने स्वतःची ओळख लपवण्यासाठी काळ्या कपड्याचा मास्क घातलेला आहे.

हल्लेखोराने गोळीबार केला आणि त्यानंतर काही सेकंदांतच घटनास्थळावरून पळ काढल्याचे या फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे.

पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळे ताब्यात

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील फरार असलेले आरोपी सापडल्याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळे पकडल्याची  सूत्रांकडून माहिती आहे. काही वेळात नेमकं कोणत्या आरोपींना पकडले आहे, हे होणार स्पष्ट होणार आहे. 

पालकमंत्री पदाचा तिढा प्रजासत्ताक दिनाआधी सुटणार?

महायुतीचा पालकमंत्री पदाबाबत तिन्ही पक्षांचं एकमत तर काही जागांवरून तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच

रायगड, कोल्हापूर जिल्ह्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत रस्सीखेच

तर मुंबई शहर, साताऱ्यासाठी भाजप आणि शिवसेना आग्रही

गडचिरोली आणि बीडचे पालकमंत्री पदही कुणाला मिळणार? याकडे लक्ष

अमरावती ते शेगाव पायदळ वारी

लाखो भक्तांचे प्रेरणास्थान असलेले श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनाकरिता गेल्या अकरा वर्षांपासून अमरावती ते शेगाव पायदळ वारी भक्तांच्या वतीने काढण्यात येते.. यावर्षी सुद्धा अमरावती ते शेगाव अशी पायदळ वारी भक्तांच्या वतीने काढण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पायदळ वारीचे विविध गावांमध्ये श्रींचा भक्तांच्या वतीने स्वागत सत्कार आणि पूजन करण्यात येत आहे.

अमरावती ते शेगाव दिशेने ही पायदळ वारी जात असताना दर्यापूर तालुक्यातील थिलोरी फाट्याजवळ या पायदळ वारीचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. संत गजानन महाराज यांच्या पालखीचे पूजा अर्चना करून वारीतील वारकऱ्यांना अल्पोहार देण्यात आला आहे.. या पायदळ वारी मध्ये 160 श्री चे भक्त यांचा समावेश आहे. गण गण गणात बोते जगर करत ही पायल वारी अतिशय शांततेच्या मार्गाने शेगावच्या दिशेने वाटचाल करत आहे.

औंढा नागनाथ जिंतूर महामार्गावर कार व दुचाकीचा अपघात; एक जण ठार 
हिंगोलीच्या औंढा नागनाथ ते जिंतूर महामार्गावर कृषी महाविद्यालय जवळ भरधाव कारने दुचाकीस धडक दिल्याने अपघात झाला आहे या अपघातात एक जण ठार तर दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे, अपघात एवढा भीषण होता की अपघातानंतर कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या खाली जाऊन पडली, या अपघातात एक जण ठार झाल असून अन्य दोघांना उपचारासाठी औंढा नागनाथ येथे पाठवण्यात आल आहे.
हिंगोलीत सतत गुन्हे करणाऱ्या 13 जणांवर हद्दपारीची कारवाई
हिंगोली उपविभाग अंतर्गत हिंगोली व सेनगाव तालुक्यात गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या 13 जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली असून याबाबतचे आदेश उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी काढले आहेत, कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या व सतत गुन्हे करणाऱ्या 13 जणांच्या हद्दपारचे आदेश काढण्यात आले असून यामध्ये काही जण सहा महिन्यासाठी तर काहीजण एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहेत.
तळकोकण गारठलं, पारा 10 अशांवर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गारठा वाढला असून किमान तापमानात मोठी घट झाली आहे. पारा 10 अंशांपर्यंत खाली आला आहे. सलग दुसऱ्या दिवशी तळकोकणात सरासरीच्या तापमानात कमालीची घट पहायला मिळत आहे. जिल्हात कडाक्याची थंडी पडली असल्याने आंबा, काजू पिकासाठी फायदेशीर आहे. तर ग्रामीण भागात धुक्याची चादर पसरली आहे.

v

यवतमाळच्या टिपेश्वरहून ५०० किमीचा प्रवास करत धाराशिवमार्गे बार्शी अभयारण्यात पोहोचलेल्या वाघाला सांगलीच्या चांदोली अभयारण्यात सोडण्यात येणार 

वनविभागाकडून राज्य शासनाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव

राज्य शासनाने स्थलांतरास मंजुरी दिल्यास सह्याद्रीच्या खोऱ्यात वाघ पाहुणचार घेणार 

वाघाला जेरबंद करून रेडिओ कॉलर लावून सह्याद्री वाघ्र प्रकल्पात सोडण्याचा वनविभागाचा विचार

गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील बनगाव पाणी पुरवठा योजनेची पाइपलाइन फुटली

नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव व सालेकसा तालुक्यातील ३६ गावांतील नागरिकांच्या सोयीसाठी बनगाव पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली. परंतु ही योजना वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणाने बंद पडते. आता आमगाव तालुक्यातील शिवणी गावाजवळ मुख्य पाइपलाइनला मोठा लिकेज झाल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे... तर मोठा लिकेज असल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी देखील बरोबर पोहचत नसल्याने नागरिकांनी तात्काळ हलकेच दुरुस्त करावा अशी मागणी संबंधीत विभागाकडे केली आहे..

संमेलनाच्या प्रवेशद्वारास सावरकरांचे नाव; साहित्यप्रेमींच्या मागणीची महामंडळाकडून दखल

फेब्रुवारीमध्ये दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ, प्रवेशद्वार किंवा व्यासपीठाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी अनेक सावरकरप्रेमींनी साहित्य महामंडळ व आयोजकांकडे केली होती. या मागणीची अखेर दखल घेण्यात आली असून संमेलनाच्या एका प्रवेशद्वाराला सावरकरांचे नाव देण्याचा निर्णय शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.

परभणीत थंडीची लाट कायम; तापमान पुन्हा घसरले 

परभणी जिल्ह्यात थंडीची लाट कायम असून आजही तापमान घसरले आहे काल जिल्ह्याचे तापमान हे 7.4 अंश एवढे नोंदवण्यात आले होते मात्र आज पुन्हा एकदा तापमान घसरून 6.6 अंश सेल्सिअस एवढे झाले आहे त्यामुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम असून मागच्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार थंडी पडली आहे ग्रामीण भागामध्ये शेकोट्या पुन्हा एकदा पेटायला लागल्या असून शहरातही उबदार कपड्यांचा वापर वाढलाय सकाळी मॉर्निंग वॉक आणि व्यायामासाठी जाणाऱ्यांची संख्या ही वाढली आहे.दुसरीकडे हरभरा आणि गव्हासाठी मात्र ही थंडी पोषक आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आता कुटुंब प्रबोधनावर लक्ष 

- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आता कुटुंब प्रबोधनावर लक्ष 

- स्वयंसेवक काही वर्षांपासून संघाच्या संपर्कात नसलेल्या कुटुंबांशी संपर्क प्रस्थापित करीत आहेत

- त्याचाच भाग म्हणून ४, ५ जानेवारीला मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथे कुटुंब प्रबोधनासाठी अखिल भारतीय बैठकीचे आयोजन 

- या बैठकीत ४६ प्रांतांतील कुटुंब प्रबोधन उपक्रमाचे प्रांतीय समन्वयक आणि सहसंयोजक पत्नीसह ओंकारेश्वर येथे एकत्र येणार 

- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत या बैठकीला मार्गदर्शन करतील

- संघाचा कुटुंब प्रबोधन उपक्रम २००८ मध्ये सुरू झालाय. यामध्ये अनेक नवी कुटुंबे संघाशी जोडली गेलीय

- कौटुंबिक मित्रांच्या माध्यमातून ४६ प्रांत आणि ९०० जिल्ह्यांमध्ये संघ कार्याचा विस्तार करण्याची योजना आहे

आमदार अभिमन्यू पवार यांची सहपत्नी नवसपूर्ती यात्रा

धाराशिव- आमदार अभिमन्यू पवार यांची सहपत्नी नवसपूर्ती यात्रा, 65 किमीचा पायी प्रवास करत तुळजाभवानी चरणी टेकवला माथा

कार्यकर्त्यांसोबत दर्शन रांगेत उभा राहून घेतलं तुळजाभवानी मातेचे दर्शन

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्याने अर्ध नवसपूर्ती, मराठवाडा वॉटरग्रीड आणि पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्याला येऊन नवसपूर्ती होईल असा पवार यांना विश्वास

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीत आज मुक मोर्चा

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्या क्रूरकर्म्यांना तातडीने अटक करून फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज परभणीत सर्वपक्षीय, सर्वजातीय,सर्वधर्मीय मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता नूतन महाविद्यालय येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत हा मोर्चा निघणार आहे.

परभणीत आज सर्वपक्षीय, सर्वधर्मीय भव्य मुक मोर्चा 

परभणीत आज सर्वपक्षीय,सर्वधर्मीय भव्य मुक मोर्चा 

संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी 

मनोज जरांगे,दिवंगत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी आणि भाऊ यांच्यासह बिड आणि परभणी जिल्ह्यातील नेते होणार मोर्चात सहभागी  

नारायण राणेंच्या नावाचा वापर करुन 45 लाखांची फसवणूक

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या नावाचा वापर करून अंधेरीतील एका 51 वर्षीय महिलेच्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली तिची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मनमाड महामार्गावरील पेट्रोल पंपा समोर कारने घेतला पेट

नगर - मनमाड महामार्गावरील पेट्रोल पंपा समोर कारने घेतला पेट...
रात्री ११ वाजेच्या सुमारास राहुरी येथे घडली घटना...
प्रवासी घेऊन चाललेल्या गाडीने अचानक घेतला पेट....
एम एच १२ एफ यु ९८९९ क्रमांकाच्या कारला लागली आग...
लागलेल्या आगीत गाडी जळून खाक,सुदैवाने जीवितहनी नाही...
पेट्रोल पंपा समोर पेटलेल्या गाडी पहाण्यासाठी नागरिकांची गर्दी...
काही युवकांनी धाडस करून विझवली गाडीला लागलेली आग..

मुंब्रा मराठी तरुण मारहाण प्रकार..

मुंब्र्यातील प्रकरणावरून फळ विक्रेते व त्यांच्यासोबत असलेल्या तीन  सहकाऱ्यांच्या वर गुन्हा दाखल..

मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे एफ आय आर

विशाल गवळी यांच्या सांगण्यावरून दाखल करण्यात आला एफ आय आर

आता पोलीस दोन्ही अनुषंगाने चौकशी करून पुढील तपास करणार आहेत

20 ते 25 जणांवर अदाखल पत्र गुन्हा दाखल होता मात्र आता दखल  

सात ते आठ  लोकांवर गुन्हा दाखल

अनओळखी लोकांनी घेराव घालून मला हिंदीतून माफी मागण्यासाठी भाग पाडले होते

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News Live Updates: राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. तर चीनमध्ये कोविड-19 साथीच्या आजारानंतर पाच वर्षांनी एक नवीन आरोग्य संकट उद्भवले आहे. बीडचे मस्साजोग येथील सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.