Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्र, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्र, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...
NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत 2 महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा
जर शरद पवारांसोबत असणारे लोक आपल्यासोबत येणार असतील तर
आधी जे अजित पवारांसोबत निष्ठावान राहिले त्यांचा विचार करावा, त्यांना विविध संधी द्याव्यात अशी कार्यकर्त्यांची मागणी
Bjp: भाजप दोन महिन्यात भाकरी फिरवणार
भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष मार्चमध्ये निवडले जाणार
बुथ प्रमुख, तालुका प्रमुख व जिल्हा प्रमुख निवडीनंतर होणार प्रदेश अध्यक्ष निवड
जानेवारीत सदस्य नोंदणी, तर फेब्रुवारी महिन्यात बुथ प्रमुख, तालुका प्रमुख व जिल्हाध्यक्ष निवड होणार
भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी मार्च महिन्याचा मुहूर्त
Walmik Karad: वाल्मीक कराड यांची तिसऱ्या दिवशी सीआयडी चौकशी सुरू..
एकीकडे केज शहरात सीआयडी कडून चौकशी सुरू असतानाच
बीड शहरातील शहर पोलीस स्टेशनमध्ये सीआयडी कस्टडीत असलेल्या वाल्मीक कराड ची तिसऱ्या दिवशी सीआयडीने चौकशी चालू ठेवली आहे..
Pune: पुण्यात टू व्हीलर विकणाऱ्या शोरूमना हेल्मेट देण्यासाची सक्ती
नवीन दुचाकी विकताना ग्राहकांना दोन हेल्मेट देणे आता अनिवार्य
पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सर्व शोरूम मालकांना आदेश
रस्त्यावरील होत असणाऱ्या सततच्या अपघातांमुळे होणाऱ्या जीवितहानी रोखण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा निर्णय
दोन हेल्मेट देणे असणार बंधनकारक
Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार दोन जिल्ह्यांच पालकमंत्री पद घेण्याची शक्यता
अजित पवार पुण्यासह आणखी एका जिल्ह्याच पालकमंत्री पद घेऊ शकतात
दुसरा जिल्हा बीड असू शकतो अशी राजकीय वर्तुळात चर्चा
महायुतीत पुणे आणि बीडपालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे
अजित पवार मुंबईत दाखल झाल्यानंतर पालकमंत्री पदाबाबत अंतिम निर्णय होईल आणि त्यानंतर पक्षाची पालकमंत्री पदाची यादी महायुतीच्या समनव्यांकडे दिली जाईल
Mumbai: शिवाजी पार्क मैदानातील लाल मातीमध्ये भगव राजकारण तापलं
शिवाजी पार्क मैदानातील मातीचा मुद्दा तापला
लाल माती प्रकरणावरून शिवसेना मनसे आमने-सामने
शिवाजी पार्क मैदानात असणाऱ्या लाल मातीची धूळ उडत आहे, या मुद्यावरून राजकारण केले जात आहे
मनसेचा जी नॉर्थ पालिका विभागावर मैदानातील मातीमुळ होणाऱ्या धुळीचा मुद्दा घेऊन धडक मोर्चा....
लाल माती घेऊन मनसेचे कार्यकर्ते पालिकेत...
तर स्थानिक ठाकरेंच्या शिवसेनेते आमदार महेश सावंत यांनी शिवाजी पार्क मैदानात फेरफटका मारत घेतला आढावा
Thane: माजी सरपंचावर भर रस्त्यात कार अडवून अज्ञात हल्लेखोरांकडून प्राणघातक हल्ला. हल्ल्यात दोन्ही पाय तोडले.
बीड जिह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्येचे प्रकरण राज्यभर गाजत असतानाच,
ठाणे जिल्ह्यातही अजनुप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचावर भर रस्त्यात कार अडवून
त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांकडून प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
या धक्कादायक बाब म्हणजे या हल्यात माजी सरपंचाचे दोन्ही पाय तोडल्याने त्यांच्यावर कल्याणमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लखोरांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
कदम उघडे असे हल्ल्यात गंभीर झालेल्या माजी सरपंचाचे नाव असून त्यांच्या कारची देखील तोडफोड करण्यात आली आहे.
Mumbai: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातोश्री वर बैठकांचे सत्र सुरू,
आज उपनगरातील विभाग प्रमुख उप विभाग प्रमुखांची बैठक ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर बोलवली
मुंबईतील पूर्वउपनगर आणि पश्चिम उपनगरातील 1 ते 7 विभागातील विभागप्रमुख आणि उपविभाग प्रमुखांची बैठक
मातोश्री येथे दुपारी एक वाजता ही बैठक पार पडेल
Nashik- केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी घेतले त्र्यंबकेश्वरचे दर्शन
-
- बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर च्या आद्य ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान सहकुटुंब उपस्थित
- त्र्यंबकेश्वर मंदिरात शिवराज सिंह चौहान यांनी केली विधिवत पूजा
- दरवर्षी शिवराज सिंह चौहान येत असतात सहकुटुंब त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला
Navi Mumbai Firing: सानपाडा येथे राजाराम ठोके या व्यक्तीवर फायरिंग
राजाराम ठोके हा एपीएमसी मार्केट मधील कचरा कॅानट्रॅक्टर
ठेकेदारी वरून फायरिंग झाली आहे याचा तपास सुरू
सहा ते सात राऊंड फायर
गंभीर जखमी राजाराम ठोके खाजगी रूग्णालयात उपचारांसाठी दाखल
दोन आरोपी फायरिंग करून बाईकवर पसार
Sambhaji Nagar: उद्धव ठाकरे गटाला संभाजीनगर जिल्ह्यात मोठा धक्का
माजी महापौर नंदुकुमार घोडले आणि त्यांची पत्नी करणार शिंदे गटात प्रवेश
आजच करणार प्रवेश
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश
Walmik Karad: दोन कोटी खंडणी प्रकरणात मोठी अपडेट
खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होणार
खंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या विष्णू चाटेची चौकशीत मोठी कबुली
वाल्मिक कराडने पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केले होते
वाल्मिक कराडचे अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्याचं चाटेची कबुली
सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात केला मोठा खुलासा
Navi Mumbai: नवी मुंबई - सानपाडा डिमार्ट जवळ फायरिंग
पाच ते सहा राऊंड फायरिंग करून आरोपी फरार
एक जण जखमी..
सानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल
दोन आरोपींकडून फायरिंग.. फायरिंग करून बाईक वरून आरोपी फरार
यंदाच्या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत राज्यात १ लाख १३ हजार २३६ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक
एप्रिल ते सप्टेंबर ह्या महिन्यात दरम्यान राज्यात मोठा एफडीआय
संपूर्ण वर्षभराच्या ९४.७१ टक्के गुंतवणूक फक्त सहा महिन्यांत आल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
मागील ४ वर्षांतली सरासरी पाहाता १ लाख १९ हजार ५५६ कोटी रुपयांची वार्षिक गुंतवणूक राज्यात दाखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २० जानेवारी रोजी डाव्होसला जाणार आहेत, अशात यंदाच्या आर्थिक वर्षात यात आणखी मोठी भर पडण्याची शक्यता
Mumbai: मुंबई महापालिकेचा 4 कंत्राटदार, गुणवत्ता व्यवस्थापन एजन्सी आणि उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता यांना दणका
सिमेंट काँक्रीट केलेल्या रस्त्यांवर खड्डे झाल्याने महापालिकेने 3.4 कोटी रुपये दंड कंट्राक्टर आणि मॅनेजमेंट एजेंसी ला लावला आहे.
महापालिकेने त्याच्या मेगा काँक्रिटीकरण प्रकल्पात गुंतलेल्या चार कंत्राटदारांवर एकूण 1.7 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
कामावर देखरेख करणाऱ्या गुणवत्ता व्यवस्थापन एजन्सीवरही दंड आकारण्यात आला आहे
याशिवाय, उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्यासह 91 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे.
Buldhana: सिंदखेडराजा येथे सावित्रीबाई फुले यांची 194 वी जयंती उत्सहात साजरी..
सावित्रीबाई फुले यांचा 194 वा जन्मोत्सव मातृतीर्थ सिंदखेडराजा या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला.
या उत्साहामध्ये शहरातील मान्यवर महिला व शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता..
भव्य अशी रॅली शहरातून काढण्यात आली
महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, यांच्या वेशभूषेत विद्यार्थी सहभागी झाले होते..
या जन्मोत्सवाचे नियोजन सिंदखेडराजा नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले होते.
Chiplun :चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या कार्यपद्धतीचा जादूगाराने नागरिकांच्या समोर वाचला पाढा.... जादूगाराच्या नागरिकांसमोरील वक्तव्यांवर नगरपरिषदेचे सीईओ यांना राग अनावर.
तुम्ही पैसे कमावण्यासाठी प्रयोग करता,सांस्कृतिक केंद्र बुकिंग केले म्हणजे विकत घेतले असे समजता का? CEO नी जदुगाराला सुनावले.
प्रशांत दामले सुद्धा पैशांसाठीच प्रयोग करतात....CEO च्या वक्तव्याचा जादूगार गायकवाडांनी देखील घेतला समाचार.
सांस्कृतिक केंद्राचे नाव काशिनाथ घाणेकर आहे हे लक्षात असूद्या. मराठी कलाकारांचा सांस्कृतिक केंद्रावर पहिला हक्क. सांस्कृतिक केंद्र कोणाची वयक्तिक मालकी नाही.
मुख्याधिकारी आणि जादूगार गायकवाड यांच्यातील वादाचा व्हिडिओ रत्नागिरी जिल्ह्यात चर्चेत.
कलाकारांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा जादूगार गायकवाड यांचा आरोप.
BJP: भाजपने 29 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली.
या राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय परिषद सदस्यांच्या निवडणुका होणार आहेत.
केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याकडे बिहारची, शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कर्नाटकची आणि पीयूष गोयल यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
याशिवाय गुजरातसाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, उत्तर प्रदेशसाठी पीयूष गोयल आणि मध्य प्रदेशसाठी धर्मेंद्र प्रधान यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते या राज्यांतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय परिषद सदस्यांची निवड करतील.
Pune Accident: पुणे विमानतळ नजीक झालेल्या अपघातात दीर- भावजयचा मृत्यू
एअरफोर्सच्या ईसीएच हॉस्पिटल मधून उपचार घेऊन घरी जात असताना वळण घेताना झाला अपघात
दुचाकी आणि चार चाकी गाडीची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकी वरील दोन जणांचा मृत्यू झाला.
हा अपघात गुरुवार रोजी येरवडा ते विमानतळ रस्त्यावर झाला.
अपघातामध्ये आशीर्वाद नागेश गोवेकर (वय 52) यांचा जागीच तर
त्यांच्या भावजय रेशमा रमेश गोवेकर (वय 66) यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.
अपघाताची नोंद विमानतळ पोलीस ठाण्यात झाली असून कारचालक अचल कुमार नरेंद्र कुमार प्रसाद असे नाव आहे.
Ratnagiri: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात
वीर रेल्वे स्टेशन जवळ स्कॉर्पिओला टोइंग व्हॅनची जोरदार धडक
अपघातामध्ये चौघांचा मृत्यू तर अन्य दोनजण गंभीर जखमी...
सूर्यकांत सखाराम मोरे राहणार नवेनगर महाड,
साहिल नथुराम शेलार आणि प्रसाद रघुनाथ नातेकर दोघेही राहणार कुंभारआळी महाड
आणि समीर मिंडे (35) राहणार दासगाव महाड या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून उर्वरित दोघे गंभिर जखमी असल्याची माहिती मिळते.
Nandurbar: नंदुरबारमध्ये नविन वर्षापासून जिल्ह्यात संस्थात्मक प्रसूतीवर भर...
नविन वर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारीला जिल्ह्यात 730 बालकांचा विविध शासकीय रुग्णालयांमध्ये जन्म...
जिल्हा रूग्णालयात 425 तर प्राथमिक आरोग्य 305 बाळाचा जन्म
जिल्ह्यात संस्थात्मक डिलिव्हरी चे प्रमाण 91.66 टक्के पर्यंत वाढले
Nashik - गायब झालेल्या थंडीचे निफाड तालुक्यात पुनरागमन...
- निफाडचा किमान तापमानाचा पारा घसरला...
- निफाड येथील कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रात 8.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद...
- या थंडीपासून उब मिळवण्यासाठी पुन्हा शेकोट्या पेटल्या..
- गरम उबदार कपडे परिधान करून नागरिकांचा मॉर्निंग वॉक..
Parbhani: नवीन वर्षात थंडीचे पुनरागमन
परभणीचे तापमान 7.4 अंशावर
एकीकडे तापमान घसरले दुसरीकडे शेतशिवारावर धुक्याची चादर
Parbhani: नवीन वर्षात थंडीचे पुनरागमन
परभणीचे तापमान 7.4 अंशावर
एकीकडे तापमान घसरले दुसरीकडे शेतशिवारावर धुक्याची चादर
Beed: वाल्मिक कराडकडून न्यायालयात याचिका दाखल
वाल्मिक कराडने आपल्याला स्लिप एपनिया नावाचा आजार असल्याचा केला दावा
मशीन चालवण्यासाठी आपल्याला सीआयडी कोठडीत 24 तास मदतनीस देण्याची कराडची मागणी
रुग्णाला अशावेळी ऑटो सीपॅप ही मशीन झोपताना लावली जाते
मशीन लावण्यासाठी मदतनीस हवा असल्याची न्यायालयाकडे विनंती
या अर्जानंतर केज जिल्हा व सत्र न्यायालयाने सीआयडीला शासकीय वैद्यकीय सुविधा पुरविण्याचे सुचवले आहे
Mumbai: शेतीतील उत्पन्न वाढीसाठी मुंबई आयआयटीतील संशोधकांनी केले उपयुक्त जीवाणूचे संशोधन
शेत जमिनीतील विषारी रसायने आणि प्रदूषकांचे भक्षण करणाऱ्या जीवाणूंचा आयआयटी संशोधकांनी लावला शोध
या जीवाणूच्या संशोधनामुळे शेतजमिनी सुपीक होण्यास मदत होणार
या जीवाणूंचे मिश्रण वापरून मातीतील प्रदूषके नष्ट करणे सहज शक्य होणार
Nashik: नाशिक शहरातील नायलॉन मांजा विक्रेत्यांविरुध्द प्रथमच हद्दपारीची कारवाई...
- मांजा खरेदी व विक्रीसह ताे वापरात आणणाऱ्या जवळपास ७५ संशयितांवर तडिपारीची कारवाई...
- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पतंगबाजी सुरू...
- नायलॉन मांजामुळे होणारी जीवितहानी आणि गंभीर दुखापत रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाईची धार केली तीव्र...
- शहरातील विविध पथकांनी केलेल्या धडक कारवाईत ३४ गुन्हे दाखल तर ३९ जणांना अटक...
Kolhapur: कोल्हापूरात जिल्हा परिषदेच्या शाळेत सिंघमच्या डायलॉगवर रील
करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव मधील माजी विद्यार्थ्यांचा प्रताप
फोटो काढण्यासाठी आपणच परवानगी दिल्याचे मुख्याध्यापकांची धक्कादायक कबुली
रिल साठी शाळेतील खुर्चीवर मारली लाथ तर शाळेतील इतर साहित्याचा देखील केला वापर
एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवले जात असताना दुसरीकडे शाळेचा वापर रील साठी झाल्याने संताप
Delhi: नव्या वर्षात नौदलाला नवी युद्धनौका, विनाशिका आणि पाणबुडी
प्रोजेक्ट १७ ए निलगिरी, प्रोजेक्ट १५ बी सुरत विनाशिका आणि पाणबुडी वागशीर यांचे 15 जानेवारीला जलावतरण होणार आहे.
या कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती असणार आहे
Delhi: नव्या वर्षात नौदलाला नवी युद्धनौका, विनाशिका आणि पाणबुडी
प्रोजेक्ट १७ ए निलगिरी, प्रोजेक्ट १५ बी सुरत विनाशिका आणि पाणबुडी वागशीर यांचे 15 जानेवारीला जलावतरण होणार आहे.
या कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती असणार आहे
Maharashtra: गौण खनिजासंदर्भातील अधिकार आता फक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे
अपर जिल्हाधिकाऱ्यांऐवजी थेट जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विभागाचा मोठा निर्णय
राज्यातील वाळू माफियांना आळा घालण्यासाठी महसूल विभागाने उचललेली ठोस पाऊले
Maharashtra: गौण खनिजासंदर्भातील अधिकार आता फक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे
अपर जिल्हाधिकाऱ्यांऐवजी थेट जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विभागाचा मोठा निर्णय
राज्यातील वाळू माफियांना आळा घालण्यासाठी महसूल विभागाने उचललेली ठोस पाऊले
Mumbai: वडाळयात पोटच्या अल्पवयीन मुलीशीच वडिलांकडून गैरवर्तन केल्याचा जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर
१६ वर्षीय मुलगी झोपेत असताना वडिलांकडूनच मुलीला चुकीचा स्पर्श केला जात होता
मुलीने याबाबत कोणाला सांगितल्यास तिला नग्न घराबाहेर काढण्याची धमकी आरोपी वडिलांकडून दिली जात होती
या घटनेमुळे मुलगी मागील अनेकदिवसांपासून मानसिक तणावात होती
दरम्यान चर्चमध्ये याबाबत मुलीने सांगितल्यनंतर हा सर्व प्रकार पुढे आला
Nashik - केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण आज नाशिक दौऱ्यावर
कृषिमंत्र्याच्या दौऱ्याकडं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष
कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क माफ करण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी
कांदा दरातील घसरण रोखण्यासाठी निर्यातीला प्रोत्साहन देण्याची शेतकऱ्यांची मागणी
याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, छगन भुजबळ यांनीही निर्यात शुल्क माफ करण्याची केली आहे मागणी
राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि कें
Solapur: मुंबईहुन सोलापूरकडे येणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांकडून दगडफेक
सोलापूर जिल्ह्यातील जेऊर जवळ रात्री 9.30 च्या सुमारास घडली घटना
दगडफेकीत वंदे भारत एक्सप्रेस सी - 11डब्यातील काच फुटली
सुदैवानं कोणत्याही प्रवाशाला इजा नाही
मात्र दगडफेक कोणत्या कारणाने हे अद्याप अस्पष्ट
Dharashiv: धाराशिव येथे बारदान्या (पोते) अभावी 21 पैकी 13 हमीभाव केंद्रावरील सोयाबीन खरेदी बंद, उर्वरित केंद्रावरही किरकोळ खरेदी
सरकारी हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांच्या चकरा, मात्र सोयाबीन खरेदीसाठी नंबर येईना
खरेदीकेंद्राकडे जिल्हाभरात 32 हजार शेतकऱ्यांची सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी, प्रत्यक्षात आतापर्यंत फक्त 5 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी
ऑनलाइन नोंदणीसाठी सहा डिसेंबर पर्यंतची मुदत, अनेक शेतकऱ्यांची नोंदणीही रखडली
Dharashiv: धाराशिवमध्ये दोन गटात तुफान राडा, चाकू, हंटर अन् कड्याने एकमेकांना मारहाण, VIDEO व्हायरल
धाराशिवच्या उमरग्यातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे.
आरोपींनी चाकू, हंटर आणि हातातील कड्याने एकमेकांना मारहाण केली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
याप्रकरणी मुरुम पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सुरु आहे.
उमरगा तालुक्यातील येगेनूर गावात घडली आहे. इथे काही तरुण वेगानं गाडी चालवत होते. त्यामुळे स्थानिकांनी त्यांना गाडी सावकाश चालवा, असं म्हटलं.
यावरून दोन गटात बाचाबाची झाली. पण पुढच्याच क्षणात हा वाद विकोपाला गेला आणि याचं रुपांतर हाणामारीत झालं.
Mumbai : सख्ख्या मुलानेच केली वयस्कर आईची हत्या
कुर्ला येथील कुरेशी नगर मध्ये घटना घडली.
आई मोठ्या बहिणीवर प्रेम करते आणि माझा तिरस्कार करते
या रागातून सख्ख्या मुलानेच आपल्या वयस्कर आईची हत्या केल्याची घटना घडली आहे.
रेश्मा मुजफ्फर काजी असे हत्या करणाऱ्या 41 वर्षीय आरोपी मुलीचे नाव आहे,
तर साबीरा बानो अजगर शेख असे हत्या झालेल्या 62 वर्षीय आईचे नाव आहे
Mumbai: डिजिलॉकर व एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरण्याबाबतचे आदेश मुंबईतील सर्व वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत.
वाहन चालकांनी वाहनाची डिजिटल कागदपत्रे दाखवूनही चालकांवर ई-चलनद्वारे कारवाई करण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर
आता सहपोलीस आयुक्त(वाहतूक) अनिल कुंभारे यांनी गुरूवारी याबाबतचे लेखी आदेश जारी केले.
त्यामुळे आता मुंबईकर मोटरगाडी व दुचाकीच्या प्रत्यक्ष कागदपत्रांऐवजी डिजिलॉकर अॅपच्या मदतीने वाहतूक पोलिसांना कागदपत्रे दाखवू शकतात.
Nashik - सायंकाळच्या सुमारास नाशिकच्या सिडको येथे दुचाकीचा भीषण अपघात, अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू...
- अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद ...
- दुचाकी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती ...
- अपघाताचा सीसीटीव्हीतून अपघाताची भीषणता अधोरेखित होत आहे...
- सिडको येथील पवन नगर परिसरात राहणाऱ्या गौरव पाटील या तरुणाचा अपघातात मृत्यू...
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढत चालला आहे. विविध ठिकाणी पारा घसरला असल्याचं समजत आहे. तर दुसरीकडे बीडचे मस्साजोग येथील सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. कराड यांच्या अटकेनंतर देशमुख हत्याप्रकरणात अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. तर या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -