Maharashtra Breaking News Live Updates : भाजप आमदार सुरेश धस घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Maharashtra Breaking News Live Updates: राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 31 Dec 2024 10:29 AM
भाजप आमदार सुरेश धस घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

भाजप आमदार सुरेश धस घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट


सीआयडी तपासात दिरंगाई होत असल्याचा धस यांचा आरोप


3 आठवडे उलटूनही वाल्मिक कराड अद्याप फरार


तसेच या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नेमणूक करण्याचीही धस मागणी करणार


धस आज दुपारी मुख्यमंत्र्यांना भेटणार

कोकणात पर्यटकाची गर्दी, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कोकणाला पसंती 

कोकणात पर्यटकाची गर्दी 


नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कोकणाला पसंती 


मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणात


हॉटेल, रिसॉर्ट फुल्ल 

सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांचा 1 हजार 325 शस्त्र परवाने रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे प्रस्ताव

सोलापूर ब्रेकिंग 
---


सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी 1 हजार 325 शस्त्र परवाने रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे प्रस्ताव


विधानसभा निवडणुकीच्या आधीच पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी प्रस्ताव पाठवल्याची माहिती 


सोलापूर ग्रामीण पोलीस हद्दीत एकूण 4078 लोकांकडे शस्त्र परवाने आहेत


विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात ग्रामीण पोलीस दलाने शस्त्र जमा करण्यासाठी सांगितले होते 


शस्त्र जमा झाल्यानंतर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी या सर्व परवान्यांची चौकशी केली 


तेव्हा ज्यांनी परवाने घेतलेत त्यांच्यातील काही जणांचे वय 70 पेक्षा जास्त, काही जणांवर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत तर काही जणांनी केवळ परवाना घेतला मात्र शस्त्र घेतलं नाही अशा लोकांची यादी केली 


अशा एकूण 4 हजार 78 पैकी 1 हजार 325 परवाने रद्द करण्यासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे पाठवलाय 


जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद या प्रस्तावनंतर परवानाची फेर तपासणी करून रद्द करण्यासंदर्भात निर्णय घेतील

नाशिक शहराच्या काही भागात सकाळपासून धुक्याची चादर

नाशिक शहराच्या काही भागात सकाळपासून धुक्याची चादर बघायला मिळत आहे . धुक्यामुळे नाशिककरांना आज पहाटे सूर्यदर्शन झालेली नाही. गेल्या दोन चार दिवसापासून नाशिक शहरासह जिल्हाभरात ढगाळ वातावरण होतं त्यातच आज सकाळी धुक्याची चादर आणि हवेतील गारव्यामुळे नाशिकचे वातावरण अल्हाददायक वाटत आहे .

चारकोपमध्ये न्यू म्हाडा काॅलनी परिसरात ७ महिन्याचे अर्भक मृत अवस्थेत आढळले

चारकोपमध्ये न्यू म्हाडा काॅलनी परिसरात ७ महिन्याचे अर्भक मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ


पालिका कर्मचार्यांना एका कचर्याच्या  डब्यात हे ७ महिन्याचे मृत अर्भक मिळाले


त्याची माहिती पालिका कर्मचार्यांनी पोलिसांना दिल्यानंतर चारकोप पोलिस घटनास्थळी दाखल झाले


या घटनेची गंभीर दखल घेत चारकोप पोलिसांनी तपासाला सुरूवात केली असून ते तिथे कोणी सोडले याचा तपास पोलिस करत आहे


दरम्यान या प्रकरणी चारकोप पोलिसांनी अपमृत्यूची नोंद पोलिस ठाण्यात केली आहे.

दोन हजार रुपयांच्या नोटा RBIकडून बदलणाऱ्या रॅकेटचा नागपुरात भांडाफोड

नागपूर : सरकारकडून चलनातून बाद करण्यात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा रिझर्व बँक ऑफ इंडियातून बदलणाऱ्या रॅकेटचा नागपुरात भांडाफोड, चार आरोपींना अटक

दोन हजार रुपयांच्या नोटा RBIकडून बदलणाऱ्या रॅकेटचा नागपुरात भांडाफोड

नागपूर : सरकारकडून चलनातून बाद करण्यात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा रिझर्व बँक ऑफ इंडियातून बदलणाऱ्या रॅकेटचा नागपुरात भांडाफोड, चार आरोपींना अटक

पार्श्वभूमी

मुंबई : सध्या राज्यात नवनव्या घडामोडी घडत आहेत. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murer Case) यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर राज्यात सरकारविरोधात मोर्चे निघत आहेत. भाजपाचे नेते सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरले आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्यांना अटक करा अशी मागणी ते करत आहेत. असे असताना या खून प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. राज्यात सर्वदूर कडाक्याची थंडी आहे. जागोजागी शेकोट्या पेटत आहेत. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही प्रमुख वृत्ताचे अपटेड्स वाचा एका क्लिकवर...   

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.