Maharashtra Breaking News Live Updates : नागपूरच्या गांधीबाग परिसरात एकाची हत्या, एक जण गंभीर जखमी

Maharashtra Breaking News Live Updates: राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 30 Dec 2024 01:35 PM

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलेच गाजले आहे. या प्रकरणात आता रोज नवनवीन माहिती समोर येत आहेत. सीआयडीने...More

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार वेगवेगळी आंदोलनं, उपोषणं सुरु  

बीड जिल्हाधिकारी कार्यालय समोर चार वेगवेगळे आंदोलनं, उपोषणं सुरु आहेत. 


आज वाल्मीक कराड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या यासाठी देखील एका महिलेने आंदोलन सुरू केलय. 


3 दिवसांपासून सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी उपोषण केले जातेय.


तिसरे आंदोलन शहरातील शस्त्र परवाने तपासून रद्द करण्यासाठी अंजली दमानिया आंदोलन करत आहेत.