Maharashtra Breaking News Live Updates : सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांच्या बीडमधील आंदोलनाला सुरुवात
Maharashtra Breaking News Live Updates: राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...
बीड ब्रेकिंग
---
सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केली आंदोलनाला सुरुवात
बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अंजली दमानिया यांचे तथ्य शोधक आंदोलन सुरू
जोपर्यंत धनंजय मुंडे यांना राजीनामा होत नाही तसेच वाल्मीक कराड यांना अटक होत नाही तोपर्यंत सुरू राहणार आंदोलन
बीड ब्रेकिंग
---
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना बीड पोलिसांची नोटीस
अंजली दमानिया यांनी फरार आरोपीच्या संदर्भात जो मृत्यूचा दावा केलंय त्याचे स्पष्टीकरण करण्याचे नोटीस द्वारे सूचना
बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांची नोटीस
ज्या मोबाईल नंबर वरून व्हॉइस मेसेज आलेत तो मोबाईप नंबर, व्हॉइस मेसेज, इतर माहिती आणि पुरावे देण्याच्या सूचना
यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना जाहीर
दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते होणार प्रदान
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ट्विट केल्याने रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल
बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद
रुपाली ठोंबरे यांच्यासह विक्रांत फड, रेखा फड, कृष्णा धानोरकर, बिभीषण अघाव, आकाश चौरे, सौरभ आघाव यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद
जितेंद्र आव्हाड यांचा फोटो असलेलं चॅट एक्स वर पोस्ट करत आव्हाड कशाप्रकारे समाजा समाजात तेढ निर्माण करतात हे दाखवण्याचा ठोंबरे यांचा प्रयत्न
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मातृशोक
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले आहे.
आज दुपारी २ वा. सुकळी, ता. साकोली जि. भंडारा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
चुलीजवळ बसून अभ्यास करत असलेल्या विद्यार्थिनीचा होरपळून मृत्यू....
गोंदियाच्या देवरी तालुक्यातील मरामजोब येथील घटना...
थंडीपासून बचावासाठी बसली होती चुलीजवळ.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोरीप गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी आमदार उपेंद्र शेंडे यांचे काल नागपुरात निधन झाले... ते 73 वर्षाचे होते... गेले अनेक दिवसांपासून ते आजारी होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपेंद्र शेंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात मोठ्या उत्साहाने भाग घेतला होता. त्यामुळेच त्यांना जनतेकडून "नामांतरवीर" अशी उपाधी देण्यात आली होती...
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे कोल्हापुरात जंगी स्वागत
मंत्रीपद मिळाल्यानंतर चंद्रकांत दादा पाटील पहिल्यांदाच कोल्हापुरात दाखल
रायगड रोहा ब्रेकींग
रोहा मध्ये दोन सख्या भावांना जबरी मारहाण
रस्त्याच्या वादात ठेकेदाराने शेतकऱ्यालाच केली मारहाण,
रोहा पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरोधात गुन्हा दाखल
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच चंद्रकांतदादा पाटील कोल्हापूर मध्ये दाखल होत आहेत... कोल्हापुरातील भाजपचे कार्यकर्ते रेल्वे स्थानकावर दादांचे मोठ्या उत्साहात स्वागत करणार आहेत...
पार्श्वभूमी
मुंबई : राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला लवकरात अटक करा, अशी मागणी केली जात आहे. तसेच या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचेही नाव घेतले जात आहे. मुंडे यांना मंत्रिपदापासून हटवावे अशी जोरदार मागणी केली जात आहे. दुसरीकडे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. जागोजागी शेकोट्या पेटत आहेत, या प्रमुख घडामोडींसह राज्यात इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -