Maharashtra Live Updates : एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेनंतर भाजपकडून आभार

Maharashtra Election Results News Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....

ज्योती देवरे Last Updated: 27 Nov 2024 04:54 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News Live Updates: राज्यात नव्या सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपा मुख्यमंत्रिपदावर ठाम आहे. अशात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे, मुख्यमंत्रिपदासोबतच राज्यात कोणाकोणाच्या...More

एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे स्वागत, ते रडणारे नाहीत तर लढणारे नेते : चंद्रशेखर बावनकुळे

एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबद्दल विरोधक वावड्या उठवत होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयाला समर्थन दिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मी त्यांचे आभार मानतो. एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये मंत्री म्हणून पण उत्तम काम केले. त्यांनतर उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात साथ दिली. एकनाथ शिंदे रडणारे नाही तर लढणारे आहे.  उद्धव ठाकरे यांच्याशी लढून बाहेर पडले होते. महायुती म्हणून एकनाथ शिंदे यांनी राज्यात योग्य भूमिका मांडली, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.