Maharashtra Breaking News Live Updates : सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी अनेक नेते 28 तारखेच्या मोर्चाला हजेरी लावणार
Maharashtra Breaking News Live Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा संक्षिप्त आढावा एका क्लिकवर..
सलगच्या सुट्ट्यांमुळे कुंभनगरीत पर्यटकांची मांदियाळी
नाशिक शहरातील रामकुंड, तपोवन,पंचवटी परिसरात धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी परराज्यातून पर्यटक दाखल...
सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी अनेक नेते 28 तारखेच्या मोर्चाला हजेरी लावणार
खा.बजरंग सोनवणे,
आ.संदीप क्षीरसागर,
आ प्रकाश सोळंके,
आ.सुरेश धस,
आ जितेंद्र आव्हाड,
अंजली दमानिया
मनोज जरांगे पाटील
छत्रपती संभाजी राजे भोसले
पंकजा मुंडेंनी खात्याचा घेतला पदभार
मंत्रालयात मुंडेंनी पूजा करत स्वीकारला पदभार
नवीन वर्षात जे जे रुग्णालयात यंत्रमानव शस्त्रक्रिया होणार
डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ यांना दिले जात आहे प्रशिक्षण
-नवीन वर्षात जे जे रुग्णालयात यंत्र मानव शस्रक्रिया केली जाणार आहे. खाजगी हॉस्पिटल ही शस्रक्रिया उपलब्ध असली तरी लाखो रुपये मोजावे लागतात.
मात्र आता गोर गरीब जनतेला रुग्णांना वेगवेगळ्या योजनानमधून जेजे रुग्णालयात यंत्रमानव शस्रक्रियेचा उपयोग घेता येणार आहे.
सर्वसामान्य नागरिकांना याचा लाभ व्हावा यासाठी जेजे रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. सध्या हॉस्पिटल मधील परिचारिका डॉ यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरु आहे.
यंत्र मानवाच्या हाताला असलेला प्रोब 360 अंशामध्ये फिरत असल्याने डॉक्टरांना यंत्र मानवाच्या मदतीने शस्रक्रिया करणे सोपे जाणार असून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे.
पुणे
पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलनं
एस.टी. को ॲापरेटिव्ह बँकेत सूरू आसलेल्या गैव्यवहारप्रकरणी एसटी कर्मचारी आक्रमक
बँकेत अनागोंदी कारभार सूरू असल्याचा आरोप करत पुण्यात कर्मचाऱ्यांच आंदोलनं
सहकार आयुक्त कर्यालावर कर्मचारी काढणार मोर्चा
शासनाने नेमलेल्या शहाजी पाटील कमिटीने बॅंकेची सखोल चौकशी करून एकून २८ मुद्यांमध्ये सदावर्तेंच्या पॅनलला दोषी ठरवून संचालक मंडळावर कारवाई करावी आंदोलनं करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी
पुणे
नावात देवी पण काम दैत्याचे! दागिने लंपास करणाऱ्या लक्ष्मी आणि दुर्गा पोलिसांच्या जाळ्यात
प्रवासानिमित्ताने पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात आल्यानंतर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांकडील सोन्या, चांदीचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी सापळा रचून अटक केलीय. दुर्गा उपाध्याय आणि लक्ष्मी सकट अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. एखादी माहीला प्रवासीच्या अंगावर दागिने दिसले की या २ महिला चोर तसेच त्यांचे इतर साथीदार प्रवाशाच्या आजूबाजूला फिरायचे तसेच बस मध्ये चढताना प्रवाशाच्या ४ ही बाजूने घेरून हातसफाई ने दागिने लंपास करत असे. आत्तापर्यंत त्यांच्याकडून ५ ते ६ गुन्हे केल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. या दोन्ही महिलांकडून ४ लाख ८८ हजारांचे ६ तोळे दागिने जप्त करण्यात आले आहे. यांची आणखी कुठली टोळी एस टी स्टँड वर सक्रिय आहे याचा तपास सुद्धा पोलिसांकडून सुरू आहे...
राजगुरूनगरमध्ये पुणे-नाशिक महामार्ग रोखण्याचा प्रयत्न, पोलीस स्टेशनसमोर आंदोलन मात्र सुरुचं.
चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करून त्यांची हत्या करणाऱ्या आरोपीला तातडीनं फाशी द्यावी. या मागणीला घेऊन नातेवाईक आणि समाज अजून ही आक्रमक आहे. आज आंदोलनकर्त्यांनी पुन्हा एकदा काहीवेळ पुणे नाशिक महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी तातडीनं या आंदोलकांना बाजूला घेतलं अन वाहतूक सुरळीत केली. परंतु पोलीस स्टेशनसमोर आज सकाळपासून सुरु असलेलं आंदोलन अजून ही सुरुचं आहे. आरोपीला तातडीनं फाशी द्यावी, यावर नातेवाईक आणि समाज आग्रही आहेत.
बीड ब्रेकिंग
---
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी उद्या बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा मूक मोर्चा
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाचे संपूर्ण बीड शहरात लागले बॅनर
‘संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे माणुसकीची हत्या‘ असा उल्लेख या बॅनर्सवर करण्यात आलाय
उद्या सकाळी 10 वाजता बीडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात
आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे
बीडमध्ये या मोर्चाची कशा पद्धतीने तयारी सुरु आहे याचा आढावा घेतलाय आफताब शेख यांनी
वर्धा
- भाजपचे १ जानेवारीपासून सदस्य नोंदणी अभियान
- वर्धा जिल्ह्यात तीन लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट
- एका बुथवर दोनशे सदस्य नोंदणीच उद्दीष्ट
- जिल्ह्यात १३४२ बुथवर सदस्य नोंदणी अभियान
- पाच जानेवारीला मेगा ड्राईव्ह
- जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांची माहिती
मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार
मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी म्हणजेच उद्या अंत्यसंस्कार केले जातील. त्याविषयीची अधिकृत घोषणा शुक्रवारी केली जाणे अपेक्षित आहे , अशी माहिती काँग्रेस नेता के सी वेणुगोपाल यांनी दिली आहे.
३ मोतीलाल मार्ग या मनमोहन सिंगांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल.
पार्श्वभूमी
मुंबई : राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. कल्याण, पणे, बीड या जिल्ह्यांतील हत्यासत्र आणि महिला अत्याचारांच्या घटनेमुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. हाच मुद्दा घेऊन विरोधक सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. दुसरीकडे पालकमंत्रिपदावरूनही मंत्र्यांमध्ये चढाओढ लागली आहे. आपापल्या जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद मिळावे, यासाठी मंत्री पूर्ण ताकद लावत आहेत. देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी देशभरातून लोक दिल्लीला पोहोचत आहेत. संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रमुख तसेच देसभरातील इतरही महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -