Maharashtra Breaking News LIVE Updates : बॉलिवूड गायक शान याच्या मुंबईतील निवासी इमारतीला मंगळवारी पहाटे भीषण आग लागली

Maharashtra Breaking News Live Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा संक्षिप्त आढावा एका क्लिकवर..

प्रज्वल ढगे Last Updated: 24 Dec 2024 11:43 AM
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामच्या हत्या प्रकरणाचं कनेक्शन धाराशिवपर्यंत 

धाराशिव ब्रेकिंग : 


भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामच्या हत्या प्रकरणाचं कनेक्शन धाराशिवपर्यंत 


हत्या प्रकरणात धाराशिवमधील कळंब येथून एका आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात 


पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि धाराशिव पोलिसांची कारवाई 


आतिष जाधव  असं आरोपीचे नाव धाराशिवमधील उंबरे कोटा येथील रहिवाशी 


योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा ९ डिसेंबरला अपहरण करून खून करण्यात आला होता


भाडेकरुनी पाच लाखांची सुपारी घेऊन खून केल्याचं तपासात समोर आलेलं आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मंत्रालयात दाखल, थोड्याच वेळात स्वीकारणार पदभार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मंत्रालयात दाखल


थोड्याच वेळात दालनाचा स्विकारणार पदभार


महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर आता थोड्याच वेळात पदभार स्वीकारणार

27-28 डिसेंबर दरम्यान राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता 

२७-२८ डिसेंबर दरम्यान राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता 


शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवून नियोजन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मंत्रालयात दाखल, थोड्याच वेळात दालनाचा स्वीकारणार पदभार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मंत्रालयात दाखल


थोड्याच वेळात दालनाचा स्वीकारणार पदभार


महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर आता थोड्याच वेळात पदभार स्वीकारणार

इंदापूरच्या निमगावात रस्ता रुंदीकरणात जाणारं घर 75 फुट बाजुला सरकावलं

इंदापूरच्या निमगावात रस्ता रुंदीकरणात जाणारं घर 75 फुट बाजुला सरकावलं


इंदापूर तालुक्यात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे रुंदीकरणाचा काम सुरू आहे. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीत या मार्गाला बाह्य वळण देण्यात आलेय. मात्र याच बाह्यवळनाला अडसर ठरणारी तीन मजली 3600 स्क्वेअर फुटाची इमारत जशीच्या तशी मूळ जागेवरून उचलून 75 फूट बाजूला सरकवण्याचा प्रयोग निमगाव केतकी येथील येथील सुरेश म्हेत्रे व संजय म्हेत्रे करत आहेत आणि हाच करा चर्चेचा विषय ठरलाय. वडिलांची आठवण म्हणून ते घर जमीन दोस्त न करता मागे घेण्यात येत आहे. याआधी बारामती तालुक्यातील काटेवाडी या ठिकाणी देखील असा प्रयोग करण्यात आला होता.

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची नवी मुंबई पोलीस स्थानकास रात्री उशिरा अचानक भेट

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची नवी मुंबई पोलीस स्थानकास रात्री उशिरा अचानक भेट.


ड्रग्स विरोधी कारवाया अधिक कडक करण्याच्या पोलिसांना सूचना


शाळा कॉलेज यामध्ये वाढणारे ड्रग्स सेवनाचे गंभीर प्रकार, महिला अत्याचार, सायबर गुन्हेगारी तसेच गंभीर गुन्हे व पोलीस स्टेशन मध्ये चालू असलेल्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला..


तसेच पोलिस बांधवांशी संवाद साधून सोयी सुविधांची विचारपूस केली..


लवकरात लवकर गुन्हेगारी संधर्भातला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले..

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी खाद्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, परमीट रुम व ऑकेस्ट्रा बार पहाटे 5 वाजेपर्यंत खुले राहणार

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी खाद्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, परमीट रुम व ऑकेस्ट्रा बार पहाटे ५ वाजेपर्यंत खुले राहणार



नाताळ व नववषानिमित्त खाद्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, परमीट रुम व ऑकेस्ट्रा बार यांना दिनांक २४, २५ व ३१ डिसेंबर, २०२४ रोजीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे ०५.०० वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे


जनरल सेक्रेटरी, इंडियन हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशन यांनी दिनांक १०.१२.२०२४ रोजीच्या पत्रान्वये शासनास ही विनंती केली होती.

कामावर जाणाऱ्या तरुणाचा नायलॉन मांज्याने गळा कापला, शहरातील 4 दिवसात चौथी घटना 

छत्रपती संभाजीनगर: 


कामावर जाणाऱ्या तरुणाचा नायलॉन मांज्याने कापला होता गळा 


नायलॉन मांजाने कापले; डोळा थोडक्यात वाचला, पण डोळ्याखाली द्यावे लागले तब्बल 17 टाके


शहरातील 4 दिवसात चौथी घटना 

नंदुरबार जिल्ह्यात अंड्याच्या दरात मोठी वाढ, अंड्यांची मागणी वाढल्याने अंड्यांचे दर तेजीत....

नंदुरबार ब्रेकिंग 


नंदुरबार जिल्ह्यात अंड्याच्या दरात मोठी वाढ.....


अंड्यांची मागणी वाढल्याने अंड्यांचे दर तेजीत....


होलसेल दरात मिळणाऱ्या अंड्याच्या पाटीला 200 रुपयांचा भाव....


180 रुपये दराने मिळणारी अंड्याची पाटी आता 200 रुपये.....


किरकोळ दरात 5 रुपये ने मिळणारे अंडे आता 7 रुपयांना.....


गावरान कोंबडीच्या अंड्यांच्या दरात ही मोठी वाढ....


8 रुपये दराने मिळणाऱ्या गावरान कोंबडीची अंडी आता 10 ते 12 रुपयांनी.....

३५ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या आरीफचा मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून सन्मान

३५ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या आरीफचा मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून सन्मान करण्यात आला आहे


मुंबईतील गेट वे - एलिफंटा नीलकमल बोट दुर्घटनेत स्वतःचा जीव धोक्यात घालून ३५ प्रवाशांचे प्राण वाचवणारे आरीफ बामणे याचा काल मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते विशेष सन्मान करण्यात आला


उद्धव ठाकरे यांनी आरीफने दाखवलेले प्रसंगावधान, धाडस आणि शौर्याचे कौतुक केले.

मुंबईतील हवेचा दर्जा ढासळला, पालिकेच्या घनकचरा विभागाकडून प्रदूषण नियंत्रणासाठी नवी नियमावली

मुंबईतील हवेचा दर्जा दिवसेंदिवस ढासळताना पाह्याला मिळत आहे


मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागाने प्रदूषण नियंत्रणासाठी यावर्षी नव्याने नियमावली तयार केली आहे विकासकामांमुळे उडणाऱ्या धुळीचे प्रमाण रोखण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.


नियमावलीमध्ये धूळ नियंत्रणासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सर्व सहाय्यक अभियंत्ये आणि कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली असून नियमावलीचे पालन न केल्यास शिस्तभंगाच्या कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे

बॉलिवूड गायक शान याच्या मुंबईतील निवासी इमारतीला मंगळवारी पहाटे भीषण आग लागली

बॉलिवूड गायक शान याच्या मुंबईतील निवासी इमारतीला मंगळवारी पहाटे भीषण आग लागली.


मिळालेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग विझवण्यास सुरुवात केली.


या आगीत अद्याप कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही


आग आटोक्यात आणण्यात आली असून, विद्युत शॉर्टसर्किट असल्याचे प्राथमिक कारण सांगितले जात आहे.


वांद्रे पश्चिम येथील फॉर्च्यून एन्क्लेव्ह या निवासी इमारतीच्या ७ व्या मजल्यावर आग लागली होती

पार्श्वभूमी

मुंबई : सध्या देशात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. राज्यातही राजकीय वर्तुळात हालचाली वाढल्या आहेत. मंत्रिपद न मिळाल्याने सत्ताधारी महायुतीतील तिन्ही पक्षातील काही नेते नाराज आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी तर आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची  भेटही घेतली आहे. दरम्यान, आता मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला असला तरी राज्यातील जिल्ह्यांना अद्याप पालकमंत्री मिळालेले नाहीत. त्यामुळे त्या-त्या जिल्ह्यातील कार्यकर्ते आमचाच नेता पालकमंत्री होणार? असा दावा करत आहेत. काही मंत्र्यांनीही त्यांच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावर आपला दावा केला आहे. त्यामुळे आज पालकमंत्र्यांची यादी जाहीर होणार का? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. या प्रमख तसेच इतरही महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.