Maharashtra Breaking News LIVE Updates : शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांना फोन , बीड प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती
Maharashtra Breaking News Live Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा संक्षिप्त आढावा एका क्लिकवर..
पुणे
शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांना फोन
भीमथडी जत्रा आणि साहित्य संमेलन देण्यासाठी केली विनंती
बीड प्रकरणात लक्ष घालण्याची केली विनंती
अजित पवार
शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने महाराष्ट्र पुढे नेला पाहिजे
माझ्यावर जबाबदारी वाढली आहे. बारामतीचे प्रश्न सोडवले पाहिजे
आपण सत्तेत असल्यावर उलाढाल वाढत असते
ज्वेलर्स चा व्यवसाय रोखीत करायचा, नाहीतर अडचण होते
अजित पवार
काल खाते वाटप झालं
मंत्र्यांची संख्या जास्त राज्य मंत्री फक्त 6 आहेत
प्रत्येक मंत्र्याला एक एक खाते देण्याची वेळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली
काही जण खुश आहेत तर काही जण नाराज
ब्रेकिंग
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारवाईला वेग
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेनंतर घडामोडींना वेग
हत्या प्रकरण हाताळण्यासाठी राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलांची नेमणूक
विशेष सरकारी वकिल म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती
सद्यस्थितीत कोल्हे वकिल म्हणून काम पाहणार
नाशिक ब्रेकिंग...
- नाशिक महापालिकेचा पाणीपट्टी थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढता
पाणीपट्टी थकबाकीचा आकडा आता १६४ कोटींवर...
ब्रेकींग
माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल
इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमचे 30 आंदोलकांवर गुन्हा दाखल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याविरोधात
आंदोलन केल्याप्रकरणी जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल
आंदोलनात गाढवाचा वापर केल्याने झाला गुन्हा दाखल
आंदोलकांनी जमावबंदीचे उल्लंघन केल्याने केला गुन्हा दाखल
राज्यात भाजपच्या नवीन सदस्यत्व अभियानाला सुरुवात ..
यावर्षीच्या राज्यात नव्याने १ कोटी ५० लाख सदस्य संख्या करण्याच भाजपचे लक्ष…
१२ जानेवारीच्या शिर्डी येथील महाअधिवेशनातून फुंकणार स्थानिक स्वराज्य स्वंस्थाच्या निवडणुकीच्या तयारीचे रणशिंग…
आगामी काळातील स्थानिक स्वराज्य स्वंस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपाने कसली कंबर..
कालच्या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप पदाधिकाऱ्यांना संबोधित केले..
लोकसभेच्या पराभवानंतर विधानसभेत विजय खेचून आणला त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना जादूगरांची उपमा..
Bhandara News....
भंडाऱ्याच्या नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात 10 लाखांचा सागवान वन विभागाच्या ताब्यात
विनापरवाना वृक्षतोड करून त्याची करण्यात येत होती वाहतूक
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत. अजित पवारांनी सकाळपासूनच बारामती शहरातील आणि परिसरातील विविध विकास कामांच्या पाहणीला सुरुवात केलेली आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत आज अनेक कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमांना अजित पवार हजरी लावणार आहे. तर संध्याकाळी पाच वाजता बारामती विधानसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमताने विजयी झाल्यानंतर अजित पवारांचा नागरिक सत्कार करण्यात येणार आहे. या नागरी सत्कार मध्ये अजित पवार काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.
नाशिक ब्रेकिंग...
- नाशिकच्या तापमानात पुन्हा बदल ,शहरात पसरली धुक्याची चादर...
- आजचे निफाडचे तापमान ११.६°c वर, नाशकात थंडीचा जोर कायम...
- गेल्या आठवड्यापासून सरासरी नाशिक आणि निफाडच्या तापमानात २ते ३°c ने बदल दिसून येत आहे ...
- नाशिकमध्ये सततच्या तापमानात बदल होत असल्याने नाशिककरांच्या आरोग्यावर होतोय परिणाम ...
फ्लॅश:- मुंबईच्या अंधेरी पूर्वेतील एमआयडीसी पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या 19 तळीरामांवर कारवाई.
एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत तक्षशिला सोसायटी व मॉडेल डाऊन सोसायटी बाहेर गाड्या पार्क करून हे तळीराम सार्वजनिक उपद्रव करत होते.
स्थानिकांकडून पोलिसांना तक्रार केल्यानंतर एमआयडीसी पोलिसांची ही मोठी कारवाई केली आहे,
एमआयडीसी पोलिसांनी या कारवाईमध्ये तळीरामचे चार चाकी 54 गाड्या जप्त करत 62,000 रु दंड मारले आहेत.
पुणे
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे पुणे विमानतळावर स्वागत
काल रात्री उशिरा राज्यमंत्री माधुरी मिसाळ पुण्यात दाखल झाल्या
कार्यकर्ते आणि कुटुंबियांकडून माधुरी मिसाळ यांचा स्वागत
पुण्यातील पर्वती मतदारसंघातून सलग चौथ्यांदा आमदार झाल्यानंतर माधुरी मिसाळ यांना पहिल्यांदा मंत्रिपदाची लॉटरी
मंत्री झाल्यानंतर माधुरी मिसाळ पहिल्यांदाच पुण्यात दाखल
पुणे विमानतळावर रात्री एक वाजता माधुरी मिसा दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी पेढे भरून केले स्वागत
पुणे
शरद पवार आज पुण्यात
शरद पवारांच्या हस्ते सकाळी सात वाजता बाणेर मधील फॅमिली मॅरेथॉनला करणार फ्लॅग ऑफ
त्यानंतर मोदी बागेतील निवासस्थानी पवार कार्यकर्त्यांनी भेटीगाठी घेणार
शरद पवार सकाळी 11 वाजता भीमथडी जत्रेला भेट देणार त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता
दुपारी तीन वाजता मुंबईच्या दिशेने रावण होणार
पार्श्वभूमी
मुंबई : राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. संपूर्ण जिल्ह्यांत सध्या गारठा वाढला असून सगळीकडे शेकोट्या पेटताना दिसतायत. दुसरीकडे राजकीय वर्तुळातही घडामोडींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना नुकतेच खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता कमी दर्जाचं खातं वाट्याला आल्यास काही मंत्र्यांमध्ये नाराजी दिसण्याची शक्यता आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -