Maharashtra Breaking News LIVE Updates : अजित पवारांच्या भेटीसाठी धनंजय मुंडे दाखल

Maharashtra Breaking News Live Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा संक्षिप्त आढावा एका क्लिकवर..

प्रज्वल ढगे Last Updated: 21 Dec 2024 12:37 PM
कुलाबा निलकमल बोट अपघात प्रकरणात ७ वर्षाच्या बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडला

कुलाबा निलकमल बोट अपघात प्रकरणात ७ वर्षाच्या बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडला



मृतांच्या संख्येत वाढ झाली असून मृतांची संख्या १५ वर पोहचली आहे


जोहान निसार अहमद असे या मृत मुलाचे नाव आहे

माजी पंतप्रधान एच डी देवगौडा आणि केंद्रीय मंत्री कुमारस्वामी नाशिकमधे पोहोचले

माजी पंतप्रधान एच डी देवगौडा आणि केंद्रीय मंत्री कुमारस्वामी नाशिकमधे पोहचले आहेत,
12 वाजेपर्यंत नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शनासाठी येणार आहेत


दर्शनानंतर माध्यमांशी बोलतील


दुपारी त्रंबकेश्वरच्या दर्शनासाठी जाणार आहेत

मुंबईतील निरीक्षकांची आज मातोश्रीवर बैठक, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणार बैठक

मुंबईतील निरीक्षकांची आज मातोश्रीवर बैठक


उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत निरीक्षकांची बैठक...


विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईतील विधानसभा निहाय आढावा घेण्यासाठी 36 विधानसभा मतदारसंघत निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती 


यानुसार 227 वार्डचा आढावा निरीक्षकांनी घेतला असून आज अहवाल उद्धव ठाकरे यांच्याकडे निरीक्षकांकडून सोपवला जाणार आहे... 


विनायक राऊत, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, सुनील राऊत, अमोल कीर्तिकर यासह अनेकांचा समावेश यामध्ये केला होता 


 विधानसभेतील पराभवानंतर महानगरपालिकेच्या तयारीसाठी आणि आढाव्यासाठी या निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती 


 त्यानुसार निरीक्षकांनी 36 विधानसभा निहाय वॉर्डची आणि शाखांची भेट देऊन पदाधिकाऱ्यांची बातचीत केली आहे 


त्यानंतर त्याचा अहवाल आज उद्धव ठाकरेंकडे सोपवला जाणार आहे 


विधानसभेतील पराभवानंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढावी असं अनेक पदाधिकाऱ्यांचे म्हणणं आहे 


 त्यानुसार त्यांनी निरीक्षकांकडे आपलं म्हणणं सांगितलं असल्याची सूत्रांची माहिती

मिरा भाईंदर परिसरात बांगलादेशी, रोहिगे यांची अनधिकृत वसाहत: पोलिसांकडे मनसेची कारवाईची मागणी

मिरा भाईंदर परिसरात बांगलादेशी, रोहिगे यांची अनधिकृत वसाहत: पोलिसांकडे मनसेची कारवाईची मागणी


मिरा भाईंदर: मिरा भाईंदर परिसरातील कनकिया परिसर, नेमिनाथ टॉवर, एव्हरशाईन बिल्डिंग आदी ठिकाणी बांगलादेशी आणि रोहिगे नागरिकांनी अनधिकृतपणे वास्तव्य केल्याची तक्रार मिरा भाईंदर मनसेने केली  आहे. 
या व्यक्तींचे ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी कागदपत्रे खोटी असल्याचा संशय असून, त्यांच्या परदेशी नागरिकत्वाचा पुरावा पोलिस ठाण्यात जमा झालेला नसल्याचा , आरोप मनसेने  केला आहे.


मनसेचे विधानसभा अध्यक्ष सचिन पोपळे यांनी याबाबत पोलीस कमिशनर, पालिका आयुक्त यांना पत्र लिहून,  सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. 


या व्यक्तींना स्थानिक प्रशासनाकडून पाठींबा मिळत असल्याचाही आरोप मनसेने केला असून, त्यांच्या अनधिकृत वसाहतींमुळे भविष्यात सुरक्षेचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा मनसेने  दिला आहे.

दोन्ही सभागृहाचे आज कामकाज संपल्यानंतर सर्वपक्षीय आमदारांसाठी चहापानाचे आयोजन 


दोन्ही सभागृहाचे आज कामकाज संपल्यानंतर सर्वपक्षीय आमदारांसाठी चहापानाचे आयोजन 


विधानभवनातील परिसरात आयोजन करण्यात येणार

अजित पवारांच्या भेटीसाठी धनंजय मुंडे दाखल

अजित पवारांच्या भेटीसाठी धनंजय मुंडे दाखल


सरपंच हत्याप्रकरणी वाल्मिक कराडवर आरोप झाल्यावर अजितदादांची भेट


सभागृहातील वाल्मिक कराडच्या उल्लेखानंतर मुंडे अडचणीत?

शरद पवार आज परभणीत, सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेणार 

परभणीतील घटना मुख्यमंत्र्यांचे उत्तर विरोधकांचे न झालेले समाधान 


याच पार्श्वभूमीवर शरद पवार आज परभणीत 


सोमनाथ सूर्यवंशी,विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेणार 


पुतळा परिसरात आंदोलन स्थळालाही देणार भेट 

सर्व आमदार चहापानासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी बंगल्यावर येणार

विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व आमदार चहापान साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी बंगल्यावर येणार

आज विधानसभेत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्ताव…


आज विधानसभेत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्ताव…


आदिवासी भागातील अयोग्य व्यवस्था, राज्यात वाढता ड्रग्सचा विळखा, महिला अत्याचाराच्या घटना व कायदासुव्यस्था, संत्रा व फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर होणार चर्चा

आज खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साडे आठ वाजता पोहचतील. अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. आज या तिघांच्या भेटीनंतर मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे

भाजप कार्यकर्ता प्रवीण नेत्तारू खून प्रकरणी फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या, NIA ची दिल्ली विमानतळावर  

 


नवी दिल्ली 


भाजप कार्यकर्ता प्रवीण नेत्तारू खून प्रकरणी फरार आरोपीच्या मुसक्या NIA ने दिल्ली विमानतळावर आवळल्या 


शुक्रवारी रात्री बहरीन इथून नवी दिल्ली विमानतळावर उतरताच अटक 


२०२२ साली कर्नाटक मधील दक्षिण कन्नड जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्याची झाली होती हत्या 


मोहम्मद शरीफ नावाचा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी संबंधित आरोपी होता फरार 


राष्ट्रीय तपास तंत्रणेने नवी दिल्ली विमानतळावर केली अटक 


पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या बैठकीत कोडाजे मोहम्मद शेरीफ ने केली होती हत्याची योजना


 

महाबळेश्वर येथील पाचगणी, भोसेखिंड परिसरातील अतिक्रमनावर भल्या पहाटे हातोडा

 


महाबळेश्वर येथील पाचगणी, भोसेखिंड परिसरातील अतिक्रमनावर भल्या पहाटे हातोडा


अनाधिकृत बांधकाम पाडण्यास सकाळी सहा वाजताच सुरवात


वाई प्रांताधिकारी यांच्या नेतृत्वाखाली चार टिम 


चार ठिकाणी एकाच वेळी कारवाई 


अनेक अनाधिकृत बांधकामे आज दिवसभर पाडणार

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. नागपुरात हिवाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसत आहे. महायुती सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांवर विरोधक बोट ठेवत आहेत. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करून केलेल्या विधानामुळे महाराष्ट्र तसेच देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अमित शाह यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. शाहांच्या या विधानाचे पडसाद विधिमंडळातही उमटताना दिसतायत. राज्यात संपूर्ण जिल्ह्यांत पुन्हा एकदा हुडहुडी भरली आहे. या प्रमुख घडामोडींसह इतरही महत्त्वाच्या अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.