Maharashtra Breaking News LIVE Updates :नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीत एका कंपनीला भीषण आग
Maharashtra Breaking News Live Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा संक्षिप्त आढावा एका क्लिकवर...ाज्या
- नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीत एका कंपनीला भीषण आग
- अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल
मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांनी दिले परभणीतील दगडफेकीवरील उत्तर
- परभणीत बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रतिमा संदर्भात परिस्थिती निर्माण झाली
- बीडमधील निघृण झालेली हत्या यावर सदस्य बोलले
- परभणीत दत्तराव सोपानराव पवार या माणसाने संविधानाची प्रत आहे त्याची काच फोडली आणि खाली फेकली
- त्यानंतर घटना घडली
- जमाव यायला सुरुवात झाली
- जिल्हाधिकारी याना फोन केला त्यांना बोलावलं
- जिल्हाधिकारी यांनी हार घातला
- लोक गेली मात्र काही ६० ते७० लोकांनी रेल्वे रोखली
अजित पवार
- बाबासाहेब यांच्यावर आमचा ही अधिकार आहे
- तुम्ही काही ठिकाणीच बाबासाहेब याचे फोटो लावण्याचे परवानगी दिली आहे
- आमच्याकडे ही परवानगी द्या
पुणे
पुण्यात ठाकरे गटाकडून दांडेकर पूल येथे केंद्रिय मंत्री अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अमित शहा यांनी जे वक्तव्य केले त्यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे
मुंबईत मराठी माणसावर होणारा अन्याय कदापी सहन केला जाणार नाही. कल्याणमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी मूळात ही घटना माजी मुख्यमंत्री यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघातली आहे. या घटनेनंतर त्यांनी एक चक्कार शब्दही काढलेला नाही. ऐरवी मराठी माणसासाठी गळे काढतात. प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन तात्काळ त्या शुक्लाला अटक करावी. त्यांच्या मारहाणीत एक व्यक्ती गंभीर जखमी आहे. अन्यथा मनसेस्टाईलने रस्त्यावर उतरून उत्तर दिलं जाईल. मनसेने मराठी माणसासाठी काय केलंय रस्त्यावर उतरून हे भूतकाळात पाहिलं आहे. वर्तमान काळातही मनसेची भूमिका तिच राहिल.... मंत्रालयात बसून हा हे धंदे करत असेल तर चालणार नाही. मुंबई काय खायचं कुठे रहायचं हे मराठी माणसाला शिकवू नये. मुंबईत पहिलं मराठी माणसाचचं ऐकलं जाईल नंतर इतरांचं.... आणि हो मराठी माणसासाठी शिवतीर्थची दार ही सदैव उघडी आहेत. मराठी माणसावर अन्याय झाला तर मनसे स्टाईल उत्तर दिलं जाईल असा गार्भित इशारा मनसे नेेते अविनाश अभ्यंकर यांनी दिला आहे
अंबादास दानवे यांची सरकारवर टीका
बीडवरुन सरकार काय जाहीर करते याची वाट बघत आहे
वाल्मिक कराडवर कारवाई झाली पाहिजे
आरोपी सापडत नाही, खंडणीचा गुन्हा दाखल झाला मात्र कारवाई नाही
आत्ता वाल्मिक कराड कोणाच्या जवळचे याचा तपास सरकारने करायचा आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज नेते छगन भुजबळ आज मुबंई ला रवाना होणार
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळ आहेत नाराज
-
दोन दिवसांपूर्वी समर्थकांचा मेळावा घेऊन भुजबळांनी पक्ष नेतृत्वावर हल्ला दिला आहे इशारा
मुबंईत जाऊन भुजबळ प्रमुख पदाधिकारी समर्थकांच्या घेणार आहेत भेटी
10.30 वाजता नाशिकहून निघतील
एक देश, एक निवडणूक यासंबंधीच्या घटना दुरुस्ती विधेयकासंदर्भात स्थापन करण्यात येणाऱ्या JPC मधील एकूण सदस्यांची संख्या वाढवण्यात आली आहे.
शिवसेना उबाठा तर्फे अनिल देसाई यांचे नाव संयुक्त संसदीय समितीत मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे
आता समितीत लोकसभेचे 27 आणि राज्यसभेचे 12 सदस्य असतील.
तर यापूर्वी लोकसभेतील 21 आणि राज्यसभेतील 10 सदस्यांची तरतूद करण्यात आली होती.
शिवसेना उद्धव ठाकरे आणि इतर काही पक्षांनी त्यांच्या सदस्यांची नावे नसल्याबद्दल आक्षेप व्यक्त केल्यामुळे हे करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग:
लाकूड गोदामाला लागली भीषण आग
मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास लागली आग
आगीमध्ये लाकूड गोदाम जळून भस्मसात,जीवित हानी नाही
शहरातील नारेगाव येथील दानिश पार्क, कौसर पार्क, ममता कॉलनी येथे लागली आग
अग्निशामक विभागाच्या चार बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अखेर यश
भीषण आगीत लाखोंच साहित्य जळून खाक
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेचे मुख्य प्रतोद शशिकांत शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रतोद रोहित पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीच्या निमित्ताने विधानसभा मतदारसंघातील कामांच्या अनुषंगाने आपण भेटायला आलो आहोत अशी माहिती रोहित पाटील यांनी एबीपी माझा शी बोलताना दिली आहे. मागच्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एक होण्यासंदर्भामध्ये चर्चा सुरू असताना आजच्या भेटी मागं काही राजकीय कारण नाही ना अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.
नागपुरात पेट्रोल पंपावर झालेल्या किरकोळ वादा नंतर टवाळखोर तरुणांच्या जमावाने पेट्रोल पंप चालवणाऱ्या 44 वर्षीय महिलेला तरुणांच्या पायावर लोटांगण घालून सार्वजनिकरित्या माफी मागण्यास भाग पाडले.. आणि तिच्या माफिचे ते व्हिडिओ परिसरात तिची बदनामी करत आपली दादागिरी प्रस्थापित करण्याच्या उद्दिष्टाने viral केले.. या घटनेचे व्हिडिओ viral झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तीन जणांना अटक केली आहे...
पार्श्वभूमी
मुंबई : राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवरून कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. तर सत्ताधारीदेखील विरोधकांना तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर देताना दिसतायत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. मुंबईतील बोट दुर्घटनेमुळेही संपूर्ण राज्याला धक्का बसला आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर....
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -