Maharashtra Breaking Live Updates: फडणवीस, शिंदे, अजित पवार तिघेही राजभवनात पोहोचले
Maharashtra Election Results News Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
शिवसेना एकनाथ शिंदे, भाजप देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी अजित पवार तिन्ही नेते एकाच गाडीतून राज भवनावर पोहचले आहेत
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ,आमदार प्रवीण दरेकर आमदार प्रसाद लाड आणि पंकजा मुंडे राज भवनावर पोहचले
महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी आता देवेंद्र फडणवीस विराजमान होणार हे निश्चित झाल्या नंतर शिवसेना नेत्यांकडून देखील आता त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे, आमची इच्छा होती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे मात्र भाजप वरिष्ठांनी दिलेला निर्णय देखील आम्हाला मान्य असल्याचे संजय शिरसाट म्हणाले आहेत, आज दुपारी सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर मंत्री पदाचा निर्णय तीनही नेते एकत्र बसून घेतील असे ते म्हणाले, तसेच यावेळी माझा विचार नक्की केला जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली,
- दुपारी 2 वाजता देवेंद्र फडणवीस घेणार एकनाथ शिंदे यांची भेट.
- वर्षा निवासस्थानी होणार भेट.
- या बैठकीला अजित पवारसुद्धा उपस्थित राहणार.
- पुढील सर्व प्रक्रिया, मंत्रिपदं, कोण शपथ घेणार याबाबत करणार चर्चा.
दुपारी ३ वाजता सत्ता स्थापनेचा दावा सर्व घटक पक्ष महायुतीतील करणार
आणि उद्या शपथविधी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री घेतील
संध्याकाळपर्यंत इतर मंत्री शपथ घेणार की नाही याची निश्चिती होईल
भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक संपली
आता भाजपाकडून गटनेता निवडीसाठी बैठक होईल.
गटनेत्याची निवड झाल्यानंतर गटनेनते राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी जाणार
भाजपाची कोअर कमिटीची बैठक संपली
बैठकीला अनेक महत्त्वाचे नेते होते उपस्थित
भाजपच्या विधिमंडळ गटनेता निवड कशी होणार?
————
केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी यांच्या उपस्थितीत विधिमंडळ गटनेते निवडीची बैठक पार पडेल
भाजपचे १३२ विजयी आमदार यासोबतच भाजपला पाठिंबा असणारे अपक्ष आमदार उपस्थित असतील
भाजप - मित्रपक्षाचा विधिमंडळ गटनेता कोण असावा याबद्दलचा प्रस्ताव भाजपतील जेष्ठ नेता ठेवणार
चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा या जेष्ठ आमदारांपैकी एक जण प्रस्ताव मांडू शकतो
केंद्रीय निरीक्षक या प्रस्तावावर उपस्थित आमदारांचं मत जाणून घेतील
उपस्थित आमदारांपैकी प्रमुख जेष्ठ आमदार या प्रस्तावावर आपलं अनुमोदनपर मत जाहीर करतील
गटनेत्याच्या नावावर बहुमतानं शिक्कामोर्तब झाल्यानंतर केंद्रीय निरीक्षक भाजप गटनेत्याच नाव जाहिर करतील
उपस्थित आमदारांपैकी जेष्ठ आमदार नियुक्त गटनेत्याबद्दल आपलं मत व्यक्त करतील
गटनेता निवड झाल्यानंतर महायुतीच्या सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग येईल
भाजप कोअर कमिटीच्या बैठकीला सुरुवात, मोठे नेते बैठकीला उपस्थित
बैठकीला दिल्लीतून निरीक्षक मुंबईत दाखल
दिल्लतील निरीक्षकही भाजपाच्या बैठकीला उपस्थित
देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बानकुळे, चंद्रकांत पाटील आदी बडे नेते बैठकीला उपस्थित
पुणे
पेट्रोल चोरीच्या संशयावरून मारहाणीत तरुणाचा मृत्यू
पेट्रोल चोरी केल्याच्या संशयावरून नऱ्हे परिसरात एका तरुणाला बेदम मारहाण केल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू
समर्थ भगत असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव
भारतीय जनता पार्टी पक्षाची कोअर कमिटी आणि विधी मंडळ पक्षाची बैठक आज विधानभवनात पार पडणार आहे…
या बैठकीला केंद्रातून निरीक्षक विधान भवनात येणार आहेत
काही वेळात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या निवासस्थानावरून (सागर) बैठकी साठी निघतील
रत्नागिरी - कोकणात विधानसभेत झालेल्या दारुण पराभवानंतर ठाकरे गटात मोठ्या उलटापालथीची शक्यता
निवडणूकीत काम न केल्याचा ठपका ठेवत दक्षिण जिल्हाध्यक्ष विलास चाळके यांच्या राजीनाम्याची मागणी
राजापूर विधानसभा मतदारसंघातील लांजा आणि राजापूर तालुका कार्यकारिणीने केले ठराव
विषबाधेमुळे चिमुकल्या भाऊ बहिणींचा दुर्दैवी अंत
कोल्हापूर जिल्ह्यातील चिमगाव येथील धक्कादायक घटना
श्रीयांश आंगज आणि काव्या आंगज अशी मृत्यू झालेल्या चिमकल्यांची नावं
केकमधून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज
नाशिकमध्ये सकाळपासून ढगाळ हवामान, तापमानात मोठी घट
नाशिकचे किमान तपमान 21 अंश सेल्सिअसवर
-
3 दिवसांत तपमानात 7 टक्याची वाढ
-
दक्षिण भारतात आलेल्या चक्रीवादळचा नाशिकच्या हवामानावर परिणाम
-
मागील आठवड्यात नाशिककरांना हुडहुडी भरविणारी थंडी गायब
-
ढगाळ हवामानाचा शेती पिकांवर परिणाम होण्याची शक्यता
मुंबईत DRI ची मोठी कारवाई
खासगी बस सेवेतून ड्रग्जची तस्करी करणार्या ५ जणांना पोलिसांनी केली अटक
डीआरआय मंगळवारी ही कारवाई केली आहे
या कारवाईत डीआरआयने १६ किलो मेफेड्रोन ड्रग्ज बाजारात ज्याची किमत २४ कोटी आहे. तसेच १ कोटी ९३ लाखाची रोकड डीआरआयने जप्त केली आहे
२ तस्कर हैद्राबादहून मुंबईला हे ड्रग्ज आणणार असल्याची माहिती DRI ला मिळाली होती
त्यानुसार सापळा रचून दोघांना अटक केली. या दोघांच्या चौकशीतून इतर तीन मध्यस्थींची नावे समोरआली
या प्रकरणी अधिक तपास DRI चे अधिकारी करत आहेत
मुंबईच्या रेल्वे पोलिस कंट्रोलला मंगळवारी आला धमकीचा फोन
अमृतसर एक्सप्रेस गाडीत लगेज डब्यात दोन गोण्यांमध्य स्फोटकं ठेवल्याच्या फोनने खळबळ
या दोन्ही पांढर्या गोण्यांवर तिरुपती टाॅईज लिहिले असल्याची माहिती फोनवरील माहिती देऊन फोन कट केला
धमकीच्या या फोननंतर एकच खळबळ...
या प्रकरणी रेल्वे पोलिस अधिक तपास करत आहे
मुंबईतील दादर परिसरात झळकले देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर
बॅनरवर ‘मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपत घेतो की - महाराष्ट्राच्या सुख समृद्धी शांति साठी कठीबद्ध राहीन’ असा आशय
दादर येथील प्लाझा सिनेमागृहाच्या चौकात ही बॅनरबाजी भाजपच्या युवा उपाध्यक्षांकडून करण्यात आली आहे
पुणे
पुण्यातील बोपदेव घाट लैंगिक अत्याचार प्रकरण
५०० पानांचे दोषारोपत्र सादर
पोलिसांनी वानवडी येथील लष्कर न्यायालयात केले दोषारोपपत्र दाखल
अत्याचार करणाऱ्या दोघांना पीडितेसह तिच्या मित्राने ओळखले
शोएब बाबू शेख आणि चंद्रकुमार कनोजिया अशी अटक आरोपींचे नावे
येरवडा कारागृहात दोघांची ओळख परेड घेण्यात आली.
आरोपींचा दरोडा आणि सामूहिक बलात्कार करण्याचा होता हेतू
३ ऑक्टोबर रोजी रात्री घडली होती घटना
कोरेगाव भीमा आयोगाला तीन महिन्याची मुदतवाढ
आयोगाची मुदत ३० नोव्हेबरला संपल्याने राज्य सरकारने घेतला निर्णय
१ जानेवारी २०१८ ला कोरेगाव भीमा येथे जी दंगल झाली त्याच्या चौकशीसाठी आयोग नेमण्यात आलाय
अनेक जणांची साक्षी नोंदवण्याचं काम बाकी असल्याने आयोगाने मुदतवाढ देण्याची केली होती मागणी.
भाजप कडून बटेंगे तो कटेंगेचे शपथविधीसाठी टीशर्ट तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते घालणार गुलाबी रंगाचे टीशर्ट आणि फेटे
निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुलाबी रंगाचा मोठ्या प्रमाणात वापर केला होता
पक्षाकडून महिलांना गुलाबी रंगाच्या साड्या आणि गुलाबी रंगाचे फेटे वापरण्याचे आदेश
मेट्रो सिनेमाजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताचे शिंदेंनी लावले बॅनर
शपथविधी आझाद मैदान येथे होणार असून याच मार्गावरून अनेक व्हिआयपी जाणार आहेत
शपथविधीच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताचे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत
शपथविधीसाठी ३६ तासाचा अवधी उरला असताना शिवसेनेत मंत्री पदासाठी लाॅबिंग सुरू
शिवसेनेच्या निवडक ज्येष्ठ मंत्र्यांना उद्या मुंबईत राहण्याच्या सूचना...
महत्वाच्या खात्यांसाठी शिवसेनेतही लाॅबिंग...,नाराजी टाळण्यासाठी मंत्र्यांपासून खात्यांबाबत ठेवली जात आहे गुप्तता
शिवसेनेतून ७ आमदारांची मंत्रीपदी लागणार वर्णी
माजी मंत्र्यांच्या यादीतून ३ मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता असून त्या ठिकाणी नव्या चेहर्यांना मिळणार संधी
अकार्यक्षम, भ्रष्टाचाराचे आरोप आणि वाचाळविर माजी मंत्र्याना शिंदेंकडून दिला जाणार नारळ
मुंबईच्या आझाद मैदानात महायूतीच्या शपतविधीसाठी मुंबई पोलिसांकडून राहणार चोख पोलिस बंदोबस्त
शपथविधी सोहळ्या दरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई पोलिसांकडून अडिच हजारहून अधिक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
शपथविधी दरम्यान १० पोलिस उपायुक्त, २० सहाय्यक पोलिस आयुक्त, १०० पोलिस निरीक्षक, १५० सहाय्यक व पोलिस उपनिरीक्षकांसह १५०० हून अधिक पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित राहणार आहेत
याच बरोबर सशस्र पोलिस दल, टास्क फोर्ससह इतर सुरक्षा यंत्रणाही सज्ज असणार आहेत
या शिवास आझाद मैदान परिसर हा नो फ्लाईंग झोन म्हणून घोषित करण्यात आला असून आजू बाजूच्या उंच इमारतींवरही पोलिस तैनात असणार अाहेत
शिवाय ड्रोन द्वारेही पोलिसांची करडी नजर असणार आहे
महायुतीच्या शपथविधीतही ‘एक है तो सेफ है’चा नारा दिसणार
महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात दहा हजार भाजप कार्यकर्ते 'एक हैं तो सेफ हैं" आशयाचा मजकूर असलेले टी शर्ट परिधान करणार
महायुतीला विजय मिळवून दिलेल्या नाऱ्याची भाजपकडून पुनरावृत्ती
पार्श्वभूमी
मुंबई : राज्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. जागोजागी शेकोट्या पेटताना दिसत आहेत. दुसरीकडे राज्यात नव्या सरकार स्थापनेसाठी लगबग चालू आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) असण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी नव्या सरकारमध्ये जास्तीत जास्त मंत्रिपदं आपल्याच पक्षाला मिळावीत यासाठी महायुतीतील घटकपक्षांचा प्रयत्न चालू आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार (Ajit Pawar) दिल्लीमध्ये जाऊन भाजपाच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत आहेत. तर शिवसेनेचे (Shivsena) प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेदेखील महत्त्वाच्या खात्यांसाठी आग्रही आहेत. त्यामुळे आता नव्या सरकारमध्ये कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार? तसेच नव्या मंत्रिमंडळात नेमका कोणा-कोणाचा समावेश होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या सर्व प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर..
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -