Maharashtra Breaking News: हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस; उद्धव ठाकरे नागपुरात दाखल

Maharashtra Breaking News 17th December 2024 Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....

मुकेश चव्हाण Last Updated: 17 Dec 2024 12:26 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News 17th December 2024 Live Updates: महाराष्ट्र विधिमंडळाचे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे.  आज विरोधक आक्रमक होणार आहेत. परभणी बीडच्या मुद्द्यावरती विरोधक सरकारला...More

आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या पार्थिवाच्या दर्शनाला रोहित पवारांची उपस्थिती

परभणी: परभणीतील आंबेडकर चळवळीचे जेष्ठ नेते विजय वाकोडे हे काल सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना अस्वस्थ जाणवत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनाची बातमी रोहित पवार यांना समजल्यानंतर त्यांनी आज परभणी शहरातील राहुल नगर येथे आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन आदरांजली अर्पण केली आहे.  यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.