Maharashtra Breaking LIVE: नवं सरकार, नवं मंत्रिमंडळ, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काय घडणार?

Maharashtra Breaking News 16th December 2024 Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....

ज्योती देवरे Last Updated: 16 Dec 2024 07:49 AM
Buldhana: भाजपा नेते संजय कुटे याना मंत्री मंडळात स्थान न मिळाल्याने भाजपा कार्यकर्ते आक्रमक

Buldhana: भाजपा नेते संजय कुटे याना मंत्री मंडळात स्थान न मिळाल्याने भाजपा कार्यकर्ते आक्रमक.


भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते समाज माध्यमात करतायत देवेंद्र फडणवीस यांचा निषेध.


आज कार्यकर्ते जाब विचारण्यासाठी करणार फडणवीस यांच्या निवासस्थानी कूच.

Parbhani: परभणीतील तरुण वकील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यूप्रकरणी आज परभणी बंद

Parbhani: परभणीतील तरुण वकील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यूप्रकरणी आज परभणी बंद


आंबेडकरी जनता करणार धरणे आंदोलन


सर्वांनी केले शांततेचे आवाहन 


परभणीतील तरुण युवक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणात


आज आनंदराज आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या अनुषंगाने परभणी बंद असणार आहे


आंबेडकरी जनतेने काल रात्री घेतलेल्या बैठकीमध्ये या घटनेच्या निषेधार्थ


तसेच दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोरील मैदानामध्ये शांततेमध्ये धरणे आंदोलन करण्यात येणार आहे

Hingoli: हिंगोली जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट, जागोजागी शेकोट्या पेटल्या, तापमान 11 अंश सेल्सिअस वर पोहोचलं

Hingoli: हिंगोली जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट 


जागोजागी शेकोट्या पेटल्या 


हिंगोली जिल्ह्यांमध्ये जोरदार थंडीची लाट जाणवू लागलेली आहे


हिंगोलीचे तापमान 11 अंश सेल्सिअस वर पोहोचलेलं असून


हिंगोली जिल्ह्यांमध्ये सर्वदूर जोरदार थंडी पाहायला मिळत आहे


त्यामुळे जागोजागी शेकोट्या पेटले आहेत तर


मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांनी सुद्धा घर देखील याचा फायदा मिळते आहे 

Nandgaon - नाशिकच्या नांदगावात थंडी पुन्हा वाढली ; उबदार कपड्यांचा वापर सुरू, शाळकरी मुलांवर थंडीचा परिणाम

Nandgaon - नाशिकच्या नांदगावात थंडी पुन्हा वाढली ; उबदार कपड्यांचा वापर सुरू..
- शाळकरी मुलांवर थंडीचा परिणाम..
- गहू हरभरा पिकांना थंडीचा फायदा होणार..

Crime: कंबाला हिल येथे महिलेला पाहून अश्लील चाळे करणाऱ्या 27 वर्षीय आरोपीला गावदेवी पोलिसांकडून अटक

Crime: कंबाला हिल येथे महिलेला पाहून अश्लील चाळे करणाऱ्या २७ वर्षीय आरोपीला गावदेवी पोलिसांनी रविवारी अटक केली. 


आरोपी आग्रा येथील रहिवासी आहे. त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


पीडित महिला ३० नोव्हेंबरला टॅक्सीतून जात असताना कंबाला हिल बस थांब्याजवळ उभा असलेला एक तरुण पीडित महिलेला पाहून अश्लील चाळे करत होता. 



पीडित महिलेने याबाबत गावदेवी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.


पोलिसांना आरोपी आग्रा येथील रहिवासी असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन आरोपीला अटक केली.

Nagpur: नागपूर विधानभवनाच्या दारावर कार्यकर्त्यांची पोस्टरबाजी, नेत्यांना शुभेच्या देणारे लावले मोठ मोठे होर्डिंग

Nagpur: नागपूर विधानभवनाच्या दारावर कार्यकर्त्यांची पोस्टरबाजी…


नेत्यांना शुभेच्या देणारे लावले मोठ मोठे होर्डिंग…


कांग्रेस ने तर भाजपच्या आमदारांना राहुल गांधींनी घडवले अशा आशयाचे होर्डिंग लागले…

Mumbai: पतीच्या अनैतिक संबंधांची माहिती पत्नीला देण्याची धमकी देऊन उकळले 37 लाख रुपये, कांदिवलीतील प्रकार

Mumbai: कांदिवली (पश्चिम) येथील 60 वर्षीय व्यक्तीच्या अनैतिक संबंधांची माहिती पत्नीला देण्याची धमकी देऊन


त्याच्याकडून सुमारे 37 लाख रुपये रोख तसेच मौल्यवान वस्तू घेणाऱ्या तीन महिलांविरोधात कांदिवली पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.


आरोपींमध्ये तक्रारदाराचे प्रेमसंबंध असलेली महिला, तिची मुलगी व मुलीची मैत्रीण अशा तिघींचा समावेश आहे. 


याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी मुलीच्या मैत्रिणीला अटक केली असून महिला व तिच्या मुलीचा शोध घेत आहेत.

Nagpur: नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार कृष्णा खोपडे यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्यानं भाजपच्या अनेक नाराज कार्यकर्त्यांचे राजीनामे

Nagpur: नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांना मंत्री पदाची संधी न मिळाल्यामुळे पूर्व नागपूरमधील भाजपच्या अनेक नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्या पदाचे राजीनामे दिले आहेत...


काल रात्री शपथविधी संपल्यानंतर मोठ्या संख्येने कार्यकर्ते कृष्णा खोपडे यांच्या घराजवळ गोळा झाले


त्यांनी भाजपमधील संघटनात्मक पदांचा राजीनामा देण्याचा सामूहिक निर्णय घेतला...


कृष्णा खोपडे यंदा 1 लाख 15 हजार मतांनी विजयी झाले असून ते चवथ्यांदा आमदार झाले आहे


त्यांना मंत्रीपदाची संधी मिळायला हवी, अशी कार्यकर्त्यांची भावना होती...


मात्र कृष्णा खोपडे यांना मंत्रीपद न मिळाल्याचे माहीत होताच कार्यकर्त्यांनी राजीनामे देणे सुरू केले आहे...

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News 16th December 2024 Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.