Maharashtra Breaking News LIVE Updates : राज्य, देश तसेच जगभरातील ताज्या घडामोडी, एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News 14th December 2024 Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....

प्रज्वल ढगे Last Updated: 14 Dec 2024 12:56 PM
बीड शहरातील गोळीबार प्रकरणात एकाला अटक, विशेष पथक तैनात

बीड शहरातील गोळीबार प्रकरणात एकाला अटक.. विशेष पथक तैनात

बीड शहरात जुन्या भांडणाची कुरापत काढून एकावर गोळीबार झाला. या घटनेत जखमीवर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून एक आरोपीला अटक केलीय तर विशेष पथक नेमण्यात आले आहे.

बीड शहरातील इमामपूर भागात विश्वास डोंगरे या तरुणावर अक्षय आठवले याने जुन्या भांडणाच्या रागातून घरात घुसून गोळीबार केला. या घटनेत विश्वास डोंगरे जखमी असून उपचार सुरू आहेत. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी विशेष पथक नेमून या प्रकरणात एकाला अटक केलीय. तर इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. 

रावसाहेब दानवे सागर बंगल्यावर दाखल

रावसाहेब दानवे सागरवर दाखल

जयदत्त क्षिरसागर सागरवर दाखल

संजय शिरसाट सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

संजय शिरसाट सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू

मनसेचे माजी आमदार राजू पाटील सागरवर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला दाखल

मनसेचे माजी आमदार राजू पाटील सागरवर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला दाखल

मुलाच्या लग्नाची पत्रिक देण्यासाठी आले आहेत

भाजप, शिवसेना त्यांच्या कोट्यातील काही मंत्रिपदं रिक्त ठेवण्याची शक्यता

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या नागपुरातील राजभवनात होणार आहे... मात्र मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष त्यांच्या कोट्यातील काही मंत्रीपद रिक्त ठेवू शकतात अशी शक्यता आहे... दोन्ही पक्षात मंत्री पदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे दोन्ही पक्षांकडून काही मंत्रीपद रिक्त ठेवले जाऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे... दरम्यान राजभवनात मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी तयारीला सुरुवात झाली आहे... उद्या संध्याकाळी चार वाजता हा शपथविधी सोहळा राजभवनातील लॉनवर होण्याची शक्यता आहे... एवढ्या मोठ्या संख्येने मंत्र्यांच्या शपथविधीसाठी राजभवनात तेवढ्या क्षमतेचा सभागृह नाही, त्यामुळे राजभवनाच्या लॉनवर शपथविधी सोहळा होऊ शकेल अशी शक्यता आहे...

भाजप, शिवसेना त्यांच्या कोट्यातील काही मंत्रिपदं रिक्त

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत.. बारामती विमानतळावरती त्यांचं स्वागत करण्यात आलं. आज अजित पवार बारामतीत असणार आहेत. अजित पवारांचे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम नाहीत.

पालघरच्या बोईसर जवळील पास्थळ येथील पेट्रोल पंपावर तुफान हाणामारी

पालघर 

पालघरच्या बोईसर जवळील पास्थळ येथील पेट्रोल पंपावर तुफान हाणामारी . 

सीएनजी भरल्यानंतर बराच काळ गाडी चालू होत नसल्याने झालेल्या वादाचं हाणामारीत रूपांतर . 

हाणामारीचा व्हिडिओ समोर . पास्थळच्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपावरील घटना .

 पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांकडून गाडीतील तिघांना बेदम मारहाण .

 याच पेट्रोल पंपावर अनेक वेळा वाहन चालकांना मुजोर कर्मचाऱ्यांकडून यापूर्वी देखील मारहाण करण्यात आल्याच्या तक्रारी.

बुलढाण्यात शासनाच्या चुकीच्या धोरणाचा शालेय विद्यार्थ्यांना फटका

बुलढाणा : शासनाच्या चुकीच्या धोरणाचा शालेय विद्यार्थ्यांना फटका.

सत्र संपत आले तरी विदर्भातील 6 लाख 64 विद्यार्थ्यांना अद्याप शालेय गणवेश वाटप नाही.

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडानंतर धाराशिव पोलीस अलर्ट मोडवर 

धाराशिव ब्रेकिंग 

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची पवनचक्कीच्या वादातून हत्या, संतोष देशमुख हत्याकांडानंतर धाराशिव पोलीस अलर्ट मोडवर 

धाराशिवचे पोलिस अधीक्षक संजय जाधव यांची जिल्हाभरातील पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत बैठक

पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या तक्रारी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी जाणून घेतल्या

पवनचक्की प्रकल्पाच्या ठिकाणी घडणाऱ्या गोष्टींवर नजर राहावी यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना

शेतकरी, ग्रामपंचायतीच्या प्रश्नांचं योग्य निरसन करा, त्यांनतर अडचणी आल्या तर पोलिसांशी संपर्क साधण्याच्या सूचना

पवनचक्की प्रकल्पावरील खासगी सुरक्षा रक्षकांकडून कोणाला दमदाटी होणार ना

पार्श्वभूमी

Breaking News Live Updates : राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यात सध्या फडणवीस सरकारची स्थपना झालेली आहे. मात्र अद्याप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे राज्यात कोण-कोणत्या नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी राज्यात महायुतीच्या घटकपक्षांत वाटाघाटी चालू आहे. मिळालेल्या माहितीनुसार 15 डिसेंबर रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. दुसरीकडे राज्यात काही ठिकाणी गारठा वाढला आहे. तर काही ठिकाणी हुडहुडी कमी झाले आहे. या सर्व प्रमुख घडामोडींचे तसेच राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.