Maharashtra Breaking News LIVE: मकोका दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, परळी बंदची हाक

Maharashtra Breaking News Live Updates: राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...

मुकेश चव्हाण Last Updated: 14 Jan 2025 03:12 PM
Walmik Karad MCOCA : मकोका दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, परळी बंदची हाक

वाल्मिक कराडला आज न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तसेच वाल्मिक कराडवर मकोका देखील लावण्यात आला आहे. यानंतर परळीत वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक आल्याचे दिसून येत आहे. कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आली आहे. 

Nashik News : नाशिकमध्ये नायलॉन मांजाने एकाचा बळी

नाशिकमध्ये नायलॉन मांजाने एकाचा बळी


- नाशिकच्या  पाथर्डी परिसरातील घटना


- जिल्हा रुग्णाला उपचारासाठी केले होते दाखल 


- मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची डॉक्टरांकडून घोषणा


- सोनू किसन धोत्रे अस नायलॉन मांजामुळे मृत्यू झालेल्या 23 वर्षीय युवकाचे नाव.


 

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, शिवसेना नेत्यांची आज महत्वाची बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्याच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे मंत्री आमदार व खासदारांची आज महत्वाची बैठक


नरीमन पाॅईटच्या ट्रायडेन्ट हाॅटेलमध्ये ही बैठक आज सायंकाळी ८ वा होणार आहे.


पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला शिवसेनेचे मंत्री आमदार व खासदार एकत्रित जाणार


आजच्या बैठकित राज्यातील प्रलंबित प्रकल्पांबाबत माहिती घेऊन ती मुख्यमंत्र्यांकडे पाठवली जाणार


मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आजच्या बैठकीला विशेष महत्व

Pune Crime : पुण्यात खंडणीची मागणी करत दुकानदाराला जबर मारहाण 

पुणे : पुण्यात खंडणीची मागणी करत दुकानदाराला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना वारजे माळवाडी परिसरात घडली. लॉन्ड्रीचा व्यवसाय करणाऱ्या दुकानदाराकडे खंडणीची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी ओंकार उर्फ खंड्या वाघमारे (21) या सराईताविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचे शिवणे परिसरात दांगट पाटीलनगर येथे लाँन्ड्रीचे दुकान आहे. तीन दिवसांपूर्वी आरोपी वाघमारे तिथे आला होता. त्याने या दुकानदाराला धमकी दिली. 'या भागाचा मी दादा आहे. या भागात व्यवसाय करायचा असेल, तर दरमहा पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल', असे म्हणत पैसे न दिल्यास दुकान जाळून टाकण्याची धमकी त्याने दिला. आरोपी वाघमारे याच्याकडे एक गज होता. आरोपीने दुकानदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण देखील केली. तसेच त्याने एका गाडीची काच फोडत खंडणी मागितली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Makar Sankrant 2025 : येवल्याच्या नभांगणी पतंगाची उंचच उंच भरारी, हजारो पतंगांनी आकाश व्यापले

येवला : गुजरातनंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा पतंगोत्सव नाशिकच्या येवल्यात साजरा होत आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने येवलेकरांनी हजारो पतंग आकाशात उडवत आहे. विविध राजकीय नेते पक्ष यांच्या प्रतिमा असलेल्या व विविध रंग-बिरंगी पतंगांनी आकाश व्यापले आहे. येवल्याच्या नभांगणात विविध रंगी पतंगाने उंचच उंच भरारी घेतली. सकाळपासूनच येवलेकरांच्या उत्साहाला पारावार उरला नव्हता. अगदी लहानग्यापासून तर वयोवृद्ध असलेल्यांनी देखील संपूर्ण येवलेकर कुटुंबीयांनी धाब्यावर, गच्चीवर जावून पतंग उडविण्याचा आनंद घेतला. 

Walmik Karad : परळीत वाल्मीक कराडचे समर्थक आक्रमक, राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढून जोरदार घोषणाबाजी

परळीत वाल्मीक कराडचे समर्थक आक्रमक 


राणी लक्ष्मीबाई टॉवरवर समर्थक चढले 


समर्थकांची जोरदार घोषणाबाजी


परळीत दोन ठिकाणी कराड समर्थकांचे आंदोलन


पोलीस ठाण्यासमोर कराडच्या आईचे तर टॉवरवर चढुन समर्थकांचे आंदोलन

Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे हृदयविकराच्या तीव्र झटक्याने निधन 

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे हृदयविकराच्या तीव्र झटक्याने निधन.


कुंभमेळाच्या निमित्ताने प्रयागराज येथे गेल्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती.


महेश कोठे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सोलापुरातील दिग्गज नेते.


वयाच्या 55 वर्षी महेश कोठे यांचे अचानक निधन झाल्याने सोलापूरमध्ये हळहळ व्यक्त केली जातेय.


महेश कोठे यांनी यंदाच्या विधानसभेत सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून लढवली होती निवडणूक. 


महेश कोठे यांचे सोलापूर शहराच्या राजकारणात मोठे प्रबल्य.


सोलापूर महापालिकेचे महापौर, विरोधी पक्ष नेते, सभागृह नेते अशा विविध जबाबदारी त्यांनी पार पडल्या आहेत. 


तर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट अशा विविध पक्षात महेश कोठे यांचा प्रवास राहिलाय.

Pune News : खंडणीखोरांची संकेतस्थळावर तक्रार करण्याची सुविधा लवकरच होणार उपलब्ध

खंडणीखोरांची संकेतस्थळावर तक्रार करण्याची सुविधा लवकरच होणार उपलब्ध


पुणे जिल्हा प्रशासनाचा निर्णय, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर त्याची अंमलबाजवणी केली जाणार 


बीड जिल्ह्यातील उद्योगांना खंडणी मागण्याच्या कहाण्या पुढे येत असताना पुणे जिल्हा प्रशासनाचा निर्णय


उद्योगांकडे मागण्यात येणाऱ्या खंडण्यांच्या अनेक कहाणी पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर असे प्रकार जिल्ह्यात होऊ नयेत, यासाठी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा पुढाकार


उद्योगांना विविध परवाने देण्यासाठी लवकरच एक खिडकी योजना सुरू केली जाणार


उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्याला प्राधान्य दिले जाणार

Beed News : बीड जिल्ह्यात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमाबंदीचे आदेश

बीड जिल्ह्यात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमाबंदीचे आदेश


विविध आंदोलनाची दाहकता लक्षात घेता बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत.


आज मध्यरात्रीपासून 28 तारखेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत 


पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना मोर्चे, निदर्शने, आंदोलने करण्यासाठी जमावास परवानगीशिवाय एकत्र येता येणार नाही.  


बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी हे आदेश पारित केले आहेत.


मनोज जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात 14 तारखेपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी राहणार.

Nashik News : नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांवर येणार संक्रात, नाशिक पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

- नायलॉन मांजा विरोधात नाशिक पोलिसांची धडक कारवाई


- नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्या विरोधात कारवाईसाठी नाशिक पालिसांनी आज तयार केले विशेष पथक


- आज शहरातील विविध इमारतीच्या गच्चीवर छोट्या छोट्या गल्ली आणि मैदानावर पोलीस पथक मारणार धडक


- नायलॉन मांजा वापरत असल्यास आढळून आले तर थेट सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न या कलमाखाली होणार गुन्हा दाखल


- आतापर्यंत नाशिक पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यात 50 गुन्हे केले आहेत दाखल, 28 जणांना अटक


- पहिल्यांदाच नायलॉन मांजा वापरणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकांना देखील पोलिसांनी केली आहे अटक


- नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांवर येणार संक्रात

Nagpur News : नागपुरातील सात उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद, 'हे' आहे कारण

नागपूर : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाचा धोका लक्षात घेऊन नागपूर पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या उड्डाणपूलांवर वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी नागपुरात मोठ्या प्रमाणावर पतंग उडवल्या जातात. पतंगासाठी वापरल्या जाणाऱ्या मांजामुळे आणि खास करून प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे उड्डाण पुलावरील दुचाकी स्वार यांचा जीव धोक्यात येतो.. अपघातांची शक्यता टाळण्यासाठीच पोलिसांनी नागपूर शहरातील महत्वाचे उड्डाणपूल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय पोलीसांनी बाईकला सेफ्टी आर्च लावून बाहेर पडण्याचे आवाहनही दुचाकी चालकांना केले आहे. दुचाकीस्वारांनी सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेटसह स्कार्फ लावण्याच्याही सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. 


आज या उड्डाणपुलांवर वाहतूक नाही... (पतंगबाजी दरम्यान राहणार बंद)


 1) शहीद आदिवासी गोवारी स्मारक उड्डाणपूल 


2) सक्करदरा उड्डाणपूल 


3) कडवी चौक ते सदर 


4) मानकापूर उड्डाणपूल 


5) वाडी उड्डाणपूल 


6) पारडी उड्डाणपूल 


7) पाचपावली उड्डाणपूल

NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराचं स्थळ बदललं, छत्रपती संभाजीनगरऐवजी 'या' ठिकाणी होणार शिबीर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराच स्थळ बदललं 


छत्रपती संभाजीनगरऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच शिबिर आता शिर्डी येथे पार पडणार 


18 आणि 19 जानेवारीला शिबिर शिर्डी येथे पार पडणार 


राज्यभरातील निवडक 500 पदाधिकाऱ्यांना शिबिरासाठी निमंत्रण 


राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत शिबिर पार पडणार

Mumbai News: राणीच्या बागेत जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयातील पार्किंग शुल्कात थेट चारपट वाढ करण्याचा पालिका प्रशासनाचा निर्णय. पालिकेच्या या निर्णयामुळे चारचाकी वाहनांना २० रुपयाऐवजी ८० रुपये, तर दुचाकीस्वारांना १० रुपयांऐवजी ३० रुपये मोजावे लागणार आहेत.


वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरले असून राणी बागेत दररोज ८ ते १० हजार पर्यटक येतात. राणी बागेत अनेक पर्यटक आपली वाहने घेऊन येतात. पर्यटकांना वाहन पार्किंगसाठी राणी बागेत जागा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र, वाहन पार्किंगसाठी आता जादा शुल्क आकारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे राणी बागेत पशुपक्ष्यांची धमाल अनुभवण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आता वाहन पार्किंगसाठी जादा शुल्क मोजावे लागेल.

Mumbai BEST bus: बेस्ट अपघातात पाच वर्षांत 88 लोकांनी गमावला जीव

बेस्ट अपघातात पाच वर्षांत 88 लोकांनी गमावला जीव असल्याची माहिती, माहितीअधिकारातून समोर आली आहे तर प्रशासनाकडून 42 कोटींची भरपाई. मागील पाच वर्षांत बेस्ट बसचे 834 अपघात झाले असून, यात 88 लोकांना जीव गमवावा लागल्याची माहिती समोर आली आहे. 


या अपघातांमध्ये प्राण गमावलेल्यांच्या नातेवाइकांना तसेच जखमींना आतापर्यंत 42.40 कोटींची भरपाई उपक्रमाकडून देण्यात आली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये विविध कारणांनी शेकडो प्रवाशांना प्राण गमवावे लागतात, तर काही जखमींना कायमचे अपंगत्व येते. अशीच काहीशी परिस्थिती बेस्ट उपक्रमातही आहे. बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या दैनंदिन प्रवासी संख्या 35 लाखांपुढे गेली आहे. मात्र, आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाकडे त्यासाठी आवश्यक बसचा ताफा नाही

मनमाड बाजार समितीत आजपासून बेमुदत बंद

बाजार समिती फी एक रुपयावरून ७५ पैसे करावी या मागणीसाठी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला असून त्यामुळे मनमाड बाजार समिती बंद राहणार असल्याने कांदा उत्पादक  शेतकऱ्यांना फटका बसणार आहे..दरम्यान व्यापाऱ्यांनी बाजार फी ७५ पैसे देण्याबाबत पत्र दिल्यानंतर तत्काळ बाजार फी ९० पैसे करण्यात आली..पुढील काळात निर्णय घेण्याचे आश्वासन देवूनही व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्याचे बाजार प्रशासाकडून सांगण्यात आले..सध्या लाल कांदा व मक्याची मोठी आवक आहे..बदलते ढगाळ वातावरण यामुळे शेतमाल खराब होत चालला आहे. शेतकऱ्यांची कांदा आणि मका काढून विक्रीसाठी लगबग असतानाच अचानक व्यापाऱ्यांनी बंदची भूमिका घेतली असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे..सणासुदीचे दिवस आल्यामुळे जवळ असलेला शेतमाल विक्रीसाठी तयार ठेवला आहे..मात्र बाजार समिती बंद असल्यामुळे माल विक्री करायचा कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र मुंबई - नवी मुंबई दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या महाराष्ट्र मुंबई - नवी मुंबई दौऱ्यावर असणार आहेत


पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी ‘आयएनएस सुरत’, ‘आयएनएस निलगिरी’ या युद्धनौका आणि ‘आयएनएस वगशीर’ ही पाणबुडी देशाला अर्पण करतील. 


नौदलाच्या युद्धसज्जतेत त्यामुळे वाढ होणार आहे. मुंबईमध्ये नौदलाच्या गोदीमध्ये हा कार्यक्रम होईल.


तर  नवी मुंबईतील खारघर येथे इस्कॉन मंदिराचे उद्घाटन करतील…

धाराशिवमध्ये दोन शिक्षकांकडून सायबर भामट्यांनी तब्बल 41 लाख लुबाडले 

धाराशिव मध्ये दोन शिक्षकांकडून सायबर भामट्यांनी तब्बल 41 लाख लुबाडले 


तुमच्या आधार कार्डचा वापर करत ड्रॅगज मागवल्याचं धमकावत तेरखेडा येथील शिक्षकाला 22 लाखाचा गंडा


सायबर क्राईम ब्रँच मधून बोलतोय सांगत  शिक्षक दाम्पत्याला गंडवले 


१२ ते २१ डिसेंबर दरम्यान सहा वेळा शिक्षकाला धमकावत घेतले भामट्यांनी पैसे


नोकरीचा प्रश्न असल्याने शिक्षक दांपत्य भयभीत, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसात धाव 


तर चार महिन्यापूर्वी धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी येथील शिक्षकाला 19 लाखाचा घातला होता गंडा 


फेसबुकवर मैत्री करत शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करायची आहे सांगत फसवणुक


 डॉलर मधील पैसे रुपयात कन्व्हर्ट करायच असल्याचं सांगत 19 लाख रुपयाचा घातला गंडा 


धाराशिव सायबर पोलिसांकडून दोन्ही प्रकरणाची तांत्रिक चौकशी सुरू

‘मुंबई फेस्टिव्हल’ यंदा होणार नाही?

राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने गेल्या वर्षी जानेवारीत आयोजित केलेला आठ दिवसांचा ‘मुंबई फेस्टिव्हल’ यंदा होणार नाही?


मुंबईच्या ‘सांस्कृतिक भव्यतेची झलक’ दाखवण्यासाठी तत्कालीन पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने २० ते २८ जानेवारी २०२४ या काळात शहरातील ५० ठिकाणी ‘मुंबई फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले होते.


सोमवारी पर्यटन विभागाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित पार पडली या बैठकीत, मुंबई फेस्टिवल चा उल्लेख नसल्याची बाब समोर आली आहे.


गतवर्षी या सोहळ्यासाठी राज्य शासनाने २९ कोटींपर्यंत खर्च मंजूर केला होता.


तिजोरीवर पडणाऱ्या अतिरिक्त खर्चाला कात्री लावण्याच्या सध्या सरकारचे  धोरण आहे  त्यामुळे च मुंबई फेस्टिवल यंदा टाळला असल्याचे सांगण्यात येते.


मात्र, यंदा काळा घोडा फेस्टिवल २५ जानेवारी ते २ फेब्रुवारी पर्यंत साजरा केला जाणार आहे, २५ वर्षांपासून सुरू असणारा काळा घोडा फेस्टिवल मागील वर्षी मुंबई फेस्टिवल मध्ये सामील करण्यात आला होता

शहागंजमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगाराची तलवारबाजी

शहागंजमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगाराची तलवारबाजी...भररस्त्यावर नंगी तलवार घेऊन करीत होता पाठलाग...हातात तलवार घेऊन एका रेकॉर्डवरील आरोपीने दहशत निर्माण केली. शहागंजमध्ये भररस्त्यावर एकाचा पाठलाग करीत वार केला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला. काल दुपारी सव्वाचार वाजता ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपीला अटक केली.

वाल्मिक कराडच्या आवाजाचा नमुना सीआयडीने घेतला

 2 कोटींच्या खंडणी प्रकरणात अटकेतील वाल्मिक कराडच्या आवाजाचा नमुना सीआयडीने घेतला


कराडच्या आवाजाचे नमुने बीड शहर ठाण्यात घेण्यात आले


खंडणी प्रकरणाच्या तपासासाठी कराडच्या अवजाचा नमुना महत्त्वाचा ठरणार


कराडसह विष्णू चाटेच्या आवाजाचाही नमुना घेतला 


वाल्मिक कराड,विष्णू चाटेचे आवाजाचे नमुने ठरणार महत्वाचा पुरावा

टोरेस गैरव्यवहार प्रकरणी अखेर ईडीने गुन्हा दाखल करत तपासाला केली सुरुवात

टोरेस गैरव्यवहार प्रकरणी अखेर ईडीने गुन्हा दाखल करत तपासाला सुरूवात केली असल्याची सूत्रांची माहिती


टोरेस गैरव्यवहार प्रकरणची व्याप्ती लक्षात घेऊन ईडीने मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारे ईडीने स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे


या गैरवयवहार प्रकरणात फसवणूक झालेले २ हजारहून अधिक लोकांनी मुंबई पोलिसांशी संपर्क केला आहे


तर नागरिकांच्या चौकशीतून ३७ कोटींपर्यंतची फसवणूक आतापर्यंत समोर आलेली आहे


दरम्यान या प्रकरणतील व्हिसलब्लोअर्स ज्याने हे प्रकरण उघडकीस आणलं त्यांचा असा दावा की फसवणूक करणार्या युक्रेनच्या आरोपींनी २०० कोटीहून अधिकची रक्कम परदेशात वळवली आहे


त्यामुळे या सर्व प्रकरणाचा तपास आता ईडीकडून स्वंतत्र रित्या केला जाणार असून प्रत्येक आरोप ईडीकडूनही पडताळले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News Live Updates: राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. टोरेस गैरव्यवहार प्रकरणी (Torres Scam) अखेर ईडीने गुन्हा दाखल करत तपासल सुरूवात केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच राज्यात थंडीच्या कडाका वाढणार असून पुढील काही दिवसात तापमानाचा पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.