Maharashtra Breaking LIVE: राज्यात थंडीचा जोर कायम, महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा तिढा कधी सुटणार? महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर..

Maharashtra Breaking News 13th December 2024 Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....

ज्योती देवरे Last Updated: 13 Dec 2024 02:45 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News 13th December 2024 Live Updates: सध्या राज्याचे चित्र पाहता काही भागात थंडीचा जोर वाढतोय. ज्यामुळे ठिकाठिकाणी शेकोट्या पेटवण्यात येत आहेत. तर महाराष्ट्रातील राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर महाआघाडी...More

दु:खद बातमी! सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार ख्यातनाम काष्ठशिल्पकार प्रा. मनोहर सप्रे यांचे निधन

चंद्रपूर : सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि ख्यातनाम काष्ठशिल्पकार प्रा. मनोहर सप्रे यांचे निधन झाले आहे.  चंद्रपुरात त्यांच्या शास्त्रीनगर येथील राहत्या घरी वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने झाले निधन झाले आहे.  या दु:खद घटनेने मराठी-इंग्रजी माध्यमातील रेखाचित्रांचा अनुभवी साधक हरपला आहे. 


प्रा. मनोहर सप्रे यांनी दीर्घकाळ वर्तमानपत्रे आणि मासिकातुन व्यंगचित्र रेखाटने आणि पर्यावरण संवर्धन विषयक जाणीव जागृती केली आहे.  त्यांच्या पश्चात  मोठा आप्तपरिवार आहे.  उद्या चंद्रपुरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाण्याची प्राथमिक माहिती आहे.