Maharashtra Breaking News LIVE : राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News Live Updates : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...
गोल्डन फायबर कंपनीतील विषबाधा प्रकरण पेटले...
काल महिला कामगारांना पाण्यातून विषबाधा झाल्याची घटना घडली होती..
अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसीतील गोल्डन फायबर कंपनीत झालेल्या विषबाधा प्रकरणी कामगारांनी कंपनी बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलय...
मनसेचे सरचिटणीस केतन नाईक यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन....
कंपनीचे शेकडो कामगार उतरले रस्त्यावर..
आज भाजपचे प्रदेशअध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा वाढदिवस आहे. यानिमीत्य भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा द्यायला नागपूरच्या त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणूका असतात. उद्या जरी निवडणूका लागल्या तर भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्याच्या निवडणुकीसाठी तयार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
राज्यात दिड कोटी लक्ष ठेवलेली महाराष्ट्र भाजपची सदस्य संख्या वेळेत पूर्ण कराच्या सूचना गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले
चालकांसाठी दिलेल्या जागी पाय ठेऊन चढण्यास शक्य नाही, तर बसच्या चाकावर पाय ठेऊन मग सीट वर बसावे लागते
एका चालकानेच डेमो दाखवत परिवहनच्या बसवर केला प्रश्न उपस्थित
यावर आता परिवहन मंडळाकडून काय दाखल घेतली जाते याकडे लक्ष
- नागपूर ग्रामीण कॅाग्रेसच्या सहा प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आज भाजपात प्रवेश
- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कॅाग्रेसमध्ये फगदाड
- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
- उमरेड पंचायत समितीतील सभापती गीतांजली नागभीडकर आणि उपसभापती उपसभापती सुरेश लेंडे, पंचायत समिती सदस्य दादाराव मांडसकर, पंचायत समिती सदस्य प्रियंका लोखंडे यांचा भाजप प्रवेश
किल्ले रायगडावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा दौरा
संपुर्ण किल्ले रायगड परिसराची केली पाहणी
प्राधिकरण विभाग मार्फत सूरु असलेल्या कामाची सुध्दा केली पाहणी
रायगडावरील बाजार पेठेची सुध्दा जाणून घेतली माहिती
सोबत ठाकरेंचे असंख्य शिवसैनिक गडावर सोबत
मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीच्या भाजीला महत्त्व असत मात्र यंदा या भाज्यांच्या किमती वाढल्या आहेत. हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर या भाज्यांच्या किमती १० ते २० टाक्यांनी वाढल्या आहेत. मात्र ग्राहक आवर्जून या भाज्या घेताना दिसतायत… डायटसाठी हजारो रुपये खर्च करतो मात्र आपल्या गावठी भाज्या महागल्या तर काय झाल? शरीरासाठी आणि संक्रांतीची प्रथा असल्यामुळे ही भाजी खाल्लीच पाहिजे, अश्या प्रतिक्रिया ग्राहकांनी दिल्या आहेत…
आजपासून दिल्लीत खो- खो विश्वचषकाला सुरुवात होतेय. जगभरातून खो खो चे संघ दिल्लीत दाखल झाले आहेत. अभिमानाची गोष्ट म्हणजे जगभरातील खो खो संघात भारतीय वंशाचे , महाराष्ट्राचे खेळाडू आहेत.
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे मकरसंक्रांतीचा उत्सव साजरा केला जातो. आज भोगीच्या उत्सवानिमित्त पहाटे तीन ते साडेचार श्री रूक्मिणी मातेची काकडा आरती व नित्यपूजा करण्यात आली .
यावेळी रुक्मिणी मातेला दही दूध आणि पंचामृताचे सोडशोपचारे स्नान घालण्यात आले. यानंतर पहाटे चार ते साडेपाच या कालावधीत महिला भक्तांकडून रूक्मिणी मातेस भोगी करण्यात आली .
भल्या पहाटे शेकडोच्या संख्येने महिला भाविक हि पूजा करण्यासाठी मंदिरात आल्या होत्या . या महिलांच्या हस्ते मातेला अभिषेक घालण्यात आला . आज पहाटे महिला भक्तांच्या भोगी नंतर रुक्मिणी मातेस ठेवणीतील पोशाख आणि दागिने परिधान करण्यात आले . भोगीनंतर पहाटे साडे सहा पासून रुक्मिणी मातेचे दर्शन सुरु करण्यात आले .
अकोला शहरातल्या जुने शहर परिसरामधील गुरुदेव नगर येथील कलावती मराठे ही महिला चायना मांजा पायात अडकल्याने गंभीर जखमी झाली असुन या महिलेचा या मांज्याने इतका चिरला गेला आहे की 45 टाके पडले आहेत..... बरोबर एलसीबी व पोलीस विभाग चायना मांज्यावर कारवाई करत असतांना सुद्धा सर्वीकडे चायना मांज्या दिसून येत आहे....!
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यक्रम
(सोमवार, दि. 13 जानेवारी 2025)
दुपारी 1 वाजता : 100 दिवस नियोजन आराखडा सादरीकरण (विभाग: शालेय शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, पणन, इतर मागास बहुजन कल्याण, पर्यटन, माहिती व जनसंपर्क), सह्याद्री अतिथीगृह, मुंबई
संतोष देशमुख प्रकरणात राजकीय वातावरण तापलं
मनोज जरांगे आज अकरा वाजता मस्साजोगमध्ये पोहोचणार
मस्साजोगला येऊन संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेण्याची सुत्रांची माहिती
- हॉटेल कर्मचाऱ्यास बंदुकीचा धाक दाखवणारा पोलीस अंमलदार विशाल झगडे यांचे निलंबन... विशाल झगडेला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला आहे ...
- नाशिक रोड येथे एका हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर बंदुकीचा धाक दाखवणारा नाशिक ग्रामीण पोलीस दलातील विशाल झगडे याचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी तातडीने निलंबन केले आहे...
- विशाल झगडे याच्यावर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी झगडे याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले आणि न्यायालयाने विशाल झगडे याची सुटका केली आहे...
राज्यात अडीच वर्ष सत्ता होती, एक तरी कामगार कामाला लागेल असं काम केलं नाही. मालवण मध्ये आणत असलेल्या सी वर्ल्ड ला विरोध, रत्नागिरीतील रिफायनरीला विरोध, मोठ्या मोठ्या प्रकल्पांना विरोध करायचं काम तोडपाणी करायला केलं, नाव न घेता उद्धव ठाकरेंवर नारायण राणेंचा प्रहार.
संतोष देशमुख प्रकरणात राजकीय वातावरण तापलं
मनोज जरांगे आज मस्साजोगमध्ये येण्याची शक्यता
मस्साजोगला येऊन संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेण्याची सुत्रांची माहिती
टोरेस कंपनीच्या कोट्यवधी घोटाळा प्रकरणातील अटकेतील आरोपीना आज मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाणार
अटक आरोपींची पोलिस कोठडी संपत असल्याने आरोपींना कोर्टात पुढील रिमांडसाठी हजर केलं जाणार
आज या घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तानिया, व्हॅलेंटीना आणि सर्वेश सुर्वे यांना आज आर्थिक गुन्हे शाखा करणार कोर्टात हजर
तिघांची पोलीस कोठडी आज संपत आल्याने आरोपींना केलं जाणार कोर्टात हजर
सरपंच देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याला आज केज न्यायालयात पुन्हा हजर केले जाणार आहे. खंडणी प्रकरणात चाटेला शनिवारी केज न्यायालयात हजर केले होते. यादरम्यान न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र देशमुख हत्या प्रकरणात देखील चाटे आरोपी असल्याने सीआयडीने केज न्यायालयाकडे चाटेच्या कस्टडीची मागणी केली होती. दोन दिवसांची कोठडी संपल्यानंतर आज विष्णू चाटेला पुन्हा एकदा केज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
भिवंडी शहरातील गायत्रीनगरमध्ये रवि शिंदे नावाच्या व्यक्तीने मध्यरात्रीच्या सुमारास विहिरीत उडी घेतली. तब्बल चार तासांच्या शोधानंतर त्यांचा मृतदेह सापडला. रवी शिंदे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह याच परिसरात राहत होते. घटनेची माहिती मिळताच शांतिनगर पोलिस आणि अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी मृतदेह इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवला आहे. मात्र शिंदे आणि विहिरीत कोणी काय घेतली याचे कारण अजूनही समजू शकलेले आहे यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत .
टिपेश्वरच्या अभयारण्यातून धाराशिव व बार्शी तालुका परिसरात आलेल्या वाघाला पकडण्यासाठी आजपासून शोध मोहीम सुरू होत आहे. त्यासाठी चंद्रपुरातून दहा जणांची रेस्क्यू टीम आज दाखल होणार आहे. तीन आठवड्याच्या मुक्कामात वाघाने अनेक पाळीव जनावरांची शिकार केली. वाघ आणि मनुष्य संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाकडून वाघाला पकडण्याचे आदेश देण्यात आलेत. चंद्रपूरची टीम दाखल होण्यापूर्वी रामलिंग अभयारण्यातील वनाधिकाऱ्यांनी वनक्षेत्राची पाहणी केली. आज वाघाचा ठाव ठिकाणा घेऊन पिंजरे लावले जाणार आहेत. वाघ पकडून त्याला रेडिओ कॉलर लावत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येणार असल्याचं वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाच्या अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता. गोंदिया जिल्ह्यामध्ये कडाक्याची थंडी पडत असतानाच अचानकपणे वातावरणात बदल झाला असून आज सकाळी हलक्या स्वरूपाच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी, आमगाव तालुक्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसल्या. या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः तूर, हरभरा व गहू या पिकांना या अवकाळी पावसामुळे फटका बसणार आहे.
तीन दिवसांपूर्वी प्रतीक्षा नगर डेपो मध्ये एक बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. याविरोधात सोमवारी पहाटे पासून प्रतीक्षा नगर आणि धारावी डेपो मध्ये कंत्राटी बेस्ट कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू. मारहाण होऊन ही प्रशासनाने मारहाण करणाऱ्यांवर काहीच कारवाई केली नाही म्हणून कामगार संतप्त. यामुळे या दोन डेपो मधून सुटणाऱ्या बेस्ट बसच्या प्रवाशांचे सकाळी सकाळी हाल. काही वेळाने स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता
सोलापुरात सध्या अनोख्या स्पर्धेची चर्चा रंगताना पाहायला मिळतेय. सोलापुरातील ड्रीम फाउंडेशनवतीने चक्क चुलीवर भाकरी बनवण्याच्या स्पर्धा घेतली. विशेष म्हणजे महिलावर्गाकडून भाकरी बनवण्याच्या या स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे 450 हुन अधिक महिलांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला. कडक भाकरी आणि शेंगा चटणी ही सोलापूरची ओळख आहे. थंडीच्या दिवसात या भाकरीची मागणी आणखी वाढते. त्यामुळे राजमाता जिजाऊ यांची जयंती आणि श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्राचे औचित्य साधून सोलापुरातील ड्रीम फाउंडेशनने ही अनोखी स्पर्धा भरवली. दोन तासात जी महिला सर्वाधिक भाकरी बनवेल. तीला या स्पर्धेचे विजेतेपद मिळेल अशी थीम या स्पर्धेची होती. ‘बेकारी आणि बेकरी मुक्त समाजासाठी भाकरी‘ या उद्देशाने ह्या स्पर्धेचे आयोजन केले असून देशात पहिल्यांदाच अशा पद्धतीची स्पर्धा होतं आहे अशी भावना ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी यांनी व्यक्त केली.
Nashik News : नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. अपघातातील मृतांचा आकडा एकूण सहावर पोहोचला आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पाच जण जखमींपैती त्यात दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतदेहांची ओळख पटवून शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
Bhiwandi Fire News : भिवंडी शहरातील खोनी गावातील पुलाजवळ रिलायन्स कंपनीच्या वायरिंगला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत संपूर्ण वायरिंग जळून खाक झाली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. प्राथमिक तपासात अज्ञात व्यक्तीकडून आग लावल्याचे समोर आले असून, तांब्याच्या तारा मिळवण्यासाठी आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सुरू केला आहे .
Mumbai News : मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेत मजास वाडी परिसरात साई नाथ चाळ मध्ये G+1 स्ट्रक्चर असलेला घराचा पोटमाळा कोसळून 5 जण जखमी झाल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. जोगेश्वरी मजास वाडी आज संध्याकाळी 5 च्या सुमारास घर कोसळून 5 जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा तीन गाड्या घटनास्थळी दाखल होऊन घराच्या ढिगाऱ्याखालून पाच जणांना बाहेर काढले. आज संध्याकाळी घरातील पोटमाळावर ओटी भरण्याच्या काम सुरू होता पोटमाळावर ओव्हरलोड झाल्यामुळे घराचा पोट माळा कोसळला आणि पाच जण जखमी झाले आहेत.
Mahakumbh Railway Preoparation : भारतीय रेल्वेची तयारी वाढवण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी प्रयागराज विभागात महाकुंभ २०२५ साठी अनेक प्रमुख उपक्रमांचे उद्घाटन केले आहे. लाखो यात्रेकरूंना सुरक्षित, अखंड आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने हे उपाय करण्यात येत आहेत.
प्रमुख घोषणा आणि उद्घाटन :
रेल्वे बोर्ड स्तरावर एका समर्पित वॉर रूमचे उद्घाटन करण्यात आले आहे.
वॉर रूम 24x7 कार्यरत राहील, ज्यामध्ये परिचालन, वाणिज्यिक, आरपीएफ, मेकॅनिकल, इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल विभागांचे अधिकारी उपक्रमांचे निरीक्षण आणि समन्वय साधतील.
प्रयागराज परिसरातील 9 स्थानकांवर बसवलेले 1176 सीसीटीव्ही कॅमेरे रिअल-टाइम देखरेखीसाठी लाईव्ह फीड प्रदान करतील.
Mumbai News : अंधेरी पूर्वेत जे.बी नगर मेट्रो स्टेशन खाली इमारतीचं बांधकाम सुरू असताना 20 वर्षीय तरुण इमारतीच्या 12 वा मजल्यावरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तरुणाची हत्या की आत्महत्या या दोन्ही अँगलने एमआयडीसी पोलिसांकडून एडीआर दाखल करत तपास सुरू आहे. अंधेरी पूर्वेत जे.बी नगर मेट्रो स्टेशन खाली सहार प्लाझाच्या शेजारी नवीन इमारतीचा बांधकाम सुरू असताना इमारतीच्या 12वा मजल्यावरून 20 वर्षीय मजूर खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्कादायक घटना घडली आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News Live Updates : महाराष्ट्रात विविध घडामोडी पाहायला मिळत आहेत. भाजपच्या महाअधिवेशनात महाविकास आघाडीवर घणाघात आरोप करण्यात आल्यावर आता त्यांच्याकडूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे. शिर्डी येथे आयोजित भाजपच्या महाअधिवेशनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय राज्यातील वातावरणातही बदल झाल्याचं दिसत आहे. थंडीच्या कडाका वाढणार असून पुढील काही दिवसात तापमानाचा पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -