Maharashtra Breaking News Live Updates: कुर्ल्यातील अपघातानंतरचा धक्कादायक VIDEO Viral; हेल्मेट घातलेल्या युवकानं सर्वांसमोर मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या

Maharashtra Breaking News 12th December 2024 Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Dec 2024 03:05 PM
छत्रपती संभाजीनगर शहरात NIA ची कारवाई

शहरातील बीड बायपास भागात असलेल्या मदरशातू NIA च्या पथकाने एकाला ताब्यात घेतलं


NIA च्या पथकाने 22 वर्ष तरुणाला ताब्यात घेतलं


महाराष्ट्रात अमरावती ,भीविंडी, छत्रपती संभाजीनगर शहरात NIA एकाचवेळी कारवाई


तीनही ठिकाणी प्रत्येकी एकाला ताब्यात घेतले 


NIA ची संपूर्ण देशभरात कारवाई

अशी वेळ जिल्ह्यात पुन्हा येऊ नये, संतोष देशमुख प्रकरणावर पंकजा मुंडे म्हणाल्या..

सगळ्या जाती धर्माचे लोक माझ्यावर भरभरून प्रेम करतात केस तालुक्यातील माझ्या लहान भावांनो सोबत मी काम केलं होतं मी कधी पक्ष बघितलं नाही मी माणुसकीचं नातं पाहिलं कोणाच्यातरी आईचं लेकरू सकाळी निघाले आणि रात्री घरी आले नाही त्या आईच्या दुःखात मी सहभागी आहे त्या घरातील प्रत्येक स्त्रीच्या त्याच्या भावाच्या आई-वडिलांच्या दुःखात मी सहभागी आहे आज अशी परिस्थिती पुन्हा बीड जिल्ह्यात येऊ नये अशा पंकजा मुंडे यांनी देवाला प्रार्थना केली आहे

सूत्रांच्या माहितीनुसार एक देश एक निवडणुकीला कॅबिनेट मंजुरी. 

'एक देश एक निवडणुक' विधेयक कॅबिनेट मंजूर - सूत्र 
हिवाळी अधिवेशनातच विधेयक आणण्याची शक्यता - सूत्र      

राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांच्या अपघाताची आकडेवारी

2022 -23 या वर्षांमध्ये राज्यात महामंडळाच्या 13316 बस  धावल्या.
159.80 कोटी प्रवाशांनी प्रवास केला .राज्यात एसटीचे 283 अपघात झाले .त्यात तीनशे त्रेचाळीस लोकांचा मृत्यू झाला. यात 22 प्रवाशांचा सहभाग होता, 12 कर्मचारी तर इतर तीनशे नऊ लोकांचा मृत्यू झाला.3584 नागरिक जखमी झाले..
2023 -24 या वर्षांमध्ये नोव्हेंबर पर्यंत 2286 अपघात झाले. 201 लोकांचा मृत्यू झाला 21 प्रवासी आठ कर्मचारी आणि इतर 57 लोकांचा समावेश होता. तर 334 लोक जखमी झाले....

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर, यंदा भाऊबीजेलाही सुट्टी

शासकीय कर्मचाऱ्यांना यंदाच्या वर्षी मिळणार भाऊबीजेची सुट्टी


लाडकी बहीण योजनेच्या प्रचंड यशानंतर राज्य सरकारने जाहीर केली भाऊ बिजेची सुट्टी
-
सरकार कडून लाडकी बहीण आणि लाडक्या भावाला सुट्टीचे गिफ्ट


महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रांमध्ये विशेष उल्लेख करत अतिरिक्त सुट्टी जाहीर


23 ऑक्टोबर 2025 ,  गुरुवारी मिळणार भाऊबीजेची सुट्टी


दरवर्षी मिळणाऱ्या  एकूण 24 सुट्ट्यांमध्ये अधिक एका  सार्वजनिक सुट्टीची भर

पुणे विमानतळाजवळच्या मॉलबाहेर कॅब चालकाला मारहाण, गुन्हा दाखल

पुणे विमानतळाच्या जवळ असलेल्या एरो मॉल येथे कॅब चालकाला मारहाण


नोंदणी नसलेल्या कॅब कंपनीच्या एका चालकाने मारहाण केल्याचा आरोप 


भारतीय गिग कामगार मंचाकडून हा आरोप करण्यात आला आहे


काल रात्री मारहाण झालेला व्हिडीओ आता समोर आला आहे


एका कॅब चकलाच्या वर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय गिग कामगार मंचाच्या कॅब चालकांनी काम बंद आंदोलन केलं


पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर मारहाण केलेल्या संबंधित चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अदानी इलेक्ट्रीसिटीच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक

अडाणी इलेक्ट्रिसिटीचे विरोधात शिवसेना ठाकर आक्रमक.


अंधेरी पूर्वेत एमआयडीसी परिसरात अडाणी कार्यालय बाहेर ठाकरे गटाचा मोर्चा,


अंधेरी परिसरात लोकांना मोठ्या प्रमाणात  अडाणी वीज बिल वाढ करून येत असल्यामुळे ठाकरेचा मोर्चा..


आमदार सुनील प्रभू ,आमदार बाळा नर, आमदार विलास पोतनीस सह मोठा संख्या मध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोर्चा मध्ये उपस्थित आहेत...

अमरावतीनंतर भिवंडीतही NIA ची कारवाई

भिवंडी शहरालगतच्या खोणी खाडीपार ग्रामपंचायत परिसरात राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA ची कारवाई...


पहाटेच्या सुमारास आलेल्या पथकाने एकास घेतले आहे ताब्यात...


कामरान अन्सारी 45 असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे 


पाकिस्तान मध्ये देशविरोधी संघटनेशी संपर्क असल्याचा संशय 


वर्षभरात NIA ची ही तिसरी कारवाई आहे. 


अधिक माहिती स्थानिक पोलिसांकडे नाही...

शरद पवारांच्या फ्लेक्सची एकच चर्चा, अजित पवारांना टोला

बारामतीतील पंचायत समिती चौकात शरद पवारांचा वाढदिवसानिमित्त लागलेला फ्लेक्स सगळ्यांचे लक्ष वेधून घेतोय. मंदिराच्या चाव्या पुजाऱ्याच्या हातात गेल्याने, विठ्ठलाचे महत्त्व कमी होत नाही अशा आशयाचा फलक बारामतीमध्ये लागला आहे. हा फ्लेक्स बोर्ड बारामतीत लागल्याने अजित पवारांना टोला लागवल्याचे बोलले जातंय. हा समस्त साहेब प्रेमी बारामतीकर या नावाने हा फ्लेक्स लावण्यात आलेला आहे.

 परभणी घटनेच्या निषेधार्थ धर्माबाद बंद 

परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ आज नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे बंद पाळण्यात आला .. विवीध आंबेडकरवादी संघटनानी आज धर्माबाद बंदचे आवाहन केले होते .. धर्माबाद बंदला चांगला प्रतिसाद मिळाला .. सकाळ पासुन शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला ... सकाळी फुले नगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासुन मोर्चा देखील काढण्यात आला .. बंद दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसाचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता ...

सोलापुरात प्लास्टिक कारखान्याला भीषण आग

सोलापुरात प्लास्टिक कारखान्याला भीषण आग लागून मोठे नुकसान झाले आहे. मध्यरात्री तीनच्या सुमारास नई जिंदगी परिसरात असलेल्या प्लास्टिकच्या कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत प्लास्टिकचे तीन गोडाऊन जळून खाक झालेत. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. रात्री आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला तात्काळ पाचरण करण्यात आलं. जवळपास दहा बंब पाण्याची फवारणी करून आग नियंत्रणात आणण्यात आली. दरम्यान आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई दिनांक १२ : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


आपल्या शुभेच्छा संदेशात ते म्हणतात की, महाराष्ट्राच्या समाजकारण आणि राजकारणातील ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व खासदार शरद पवार यांना मी वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. आपणास सुदृढ व उदंड आयुष्य लाभो अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

परभणीतल्या घटनेचा धुळ्यात आंबेडकरी अनुयायांनी केला निषेध

परभणी येथे भारतीय संविधानाची विटंबना झाल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण राज्यभर त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे. धुळे शहरात देखील आज या घटनेचा निषेध करण्यात आला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात समस्त आंबेडकरी अनुयायांच्या वतीने निदर्शने करण्यात आली, या घटनेतील दोषी असणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी या आंदोलनावेळी करण्यात आली...

नाशिक जिल्ह्यात गेल्या 9 महिन्यात झाले 120 बस अपघात

नाशिक जिल्ह्यात गेल्या 9 महिन्यात झाले 120 बस अपघात
अपघातात 196 जण जखमी तर 22 जणांचे गेले प्राण
St महामंडळाच्या चालकाच्या चुकीमुळे झालेत 46 अपघात
अन्य वाहनचालकाच्या चुकीमुळे  झालेत 34 अपघात
दुचाकी स्वारांच्या चुकीमुळे 10, तर अन्य कारणांच्या चुकीमुळे झालेत 28 अपघात
चार दिवसांपूर्वी नाशिकच्या महामार्ग बसस्थानकात झाला होता बस अपघात त्यातही एका महिलेला गमवावा लागला होता जीव
अपघात झालेल्या बस चालकाचे केले जाते समुपदेशन आणि दिले जाते प्रशिक्षण
मुबंईतील बस अपघाताच्या घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातील बस अपघाताची धक्कादायक माहिती उघड

NIA ची कारवाई, अमरावतीमधून एका युवकाला घेतले ताब्यात

NIA च्या टीमने अमरावतीमधून एका युवकाला घेतले ताब्यात


अमरावती शहरातील छायानगर मधून घेतले रात्री उशिरा ताब्यात


NIA टीम अमरावती शहरासह 17 ठिकाणी छापे टाकून अनेकांना ताब्यात घेतल्याची माहिती समजते आहे. 


अमरावती शहरातील एक युवकाला सुद्धा रात्री ताब्यात घेतले असून हा युवक 35 वर्षाचा आहे.. राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये त्या युवकाची चौकशी NIA टीम करत आहे...


मिळालेल्या माहिती नुसार हा अमरावतीचा युवक पाकिस्तान मधील संघटनेच्या संपर्कात असल्याचं कळत आहे..

परभणीत पोलीस अधिक्षकांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

परभणीत पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्या बदलीची व्यापारी महासंघाची मागणी 


जोपर्यंत बदली होत नाही नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय 


व्यापाऱ्यातील ५ जण जिल्हाधियाक्र्यांना निवेदन देण्यासाठी जाणार


व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत हाके यांची माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

देवेंद्र फडणवीस ७ लोककल्याण मार्गावर 


नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी पोहचले


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 


मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार घेतल्यानंतर पहिलीच भेट

कुर्ला अपघातामुळे प्रवाशांची बेजारी, रिक्षा चालकांनी दर वाढवले

सोमवारी रात्री उशीरा कुर्ला पश्चिम येथे अपघात झाला, अपघातानंतर कुर्ला पश्चिम येथील बास डेपो बंद करण्यात आला आहे… याचे पडसाद आता प्रवाशांवर उमटू लागले आहेत… बस डेपो बंद असल्यामुळ तीन दिवसांपासून प्रवाशांचे हाल सुरू आहेत… एकीकडे बस बंद म्हणून पर्यायी बसने प्रवास करणारे प्रवासी रिक्षाचा वापर करत आहेत… पण आता रिक्षा पकडायला या प्रवाशांना कसरत करावी लागत आहे… तसेच रिक्षाचे दर रिक्षा चालकांनी वाढविले असल्याची तक्रार प्रवाशांकडून मांडण्यात आली आहे….

महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदेसेना लागली कामाला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजी-माजी खासदार, आमदार आणि नगरसेवक यांची बोलावली तातडीची बैठक


माजी मंत्री दिपक केसरकर यांच्या रामटेक या बंगल्यावर होणार ही महत्वाची बैठक


बैठकिला उपस्थित आजीमाजी खासदार, आमदार आणि नगरसेवकांना स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मार्गदर्शन


 मुंबई महापालिका निवडणुक पुढील दोन महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुक पूर्व तयारी आणि रणनिती संदर्भात ही बैठक होत असल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

परभणी हिंसाचार प्रकरणात 300 ते 350 जणांवर गुन्हे दाखल

परभणीत काल झालेल्या हिंसक आंदोलनप्रकरणी गुन्हे दाखल


शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात २, नानल पेठ पोलिस ठाण्यात १ आणि कोतवाली पोलीस ठाण्यात १ असे ४ विविध गुन्हे दाखल


शहरातील ३ ही पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद 


३०० ते ३५० जणांवर गुन्हा दाखल 


एकुण ४१ पुरुष आणि ९ महिलांना ताब्यात घेण्यात आले होते.


९ महिलांना नोटीस देवून सोडण्यात आले.


सार्वजनिक तथा शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे,जमावबंदी आदेशाचे पालन न करणे,सरकारी कामात अडथळा आणणे सामाजिक भय आणि भीती निर्माण करणे आदि कलम

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी, आजपासून बिनधास्त वाहा हारफुलं..

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी.. साई मंदिरात आजपासून हार, फुल प्रसाद वाहण्यास परवानगी..


कोरोना काळापासून साई मंदिरात हार फुल प्रसाद नेण्यास घालण्यात आली होती बंदी....
संभाजीनगर उच्च न्यायालय,  साई संस्थान  तदर्थ समिती आणि साई संस्थानच्या नियमावलीनुसार साई भक्तांना मंदिरात आजपासून वाहता येणार फुले....
ना नफा ना तोटा तत्त्वावर साई संस्थान कर्मचारी सोसायटीकडून होणार हार फुल प्रसादाची विक्री...


माजी खा.सुजय विखे पाटील, साई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या हस्ते स्टॉलचा झाला शुभारंभ..
गुरुवार आणि 12/12/24 दिवसाचा  मुहूर्त साधत  साईबाबांच्या समाधीवर हार अर्पण करत सुजय विखेंनी घेतलं साईदर्शन...

Maharastra Winter Session: नागपुर विधानभवान आजपासून विधीमंडळ सचिवालयाचे काम सुरू

 हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज पासून नागपूरच्या विधानभवनात विधीमंडळ सचिवालयाचे काम सुरू झाले आहे ..


यावेळेस प्रश्न उत्तराचा तास व तारांकित प्रश्न नसल्याने आमदारांच्या लक्षवेधी, शासकीय विधेयक, पुरवणी मागण्या यावेळेस हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात समावेश असणार आहे.

Sharad Pawar & Ajit Pawar: शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला अजित पवार सहकुटुंब 6 जनपथवर पोहोचले

शरद पवार यांचा आज 84 वा वाढदिवस आहे. ते दिल्लीत आहेत. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार, सुनेत्रा पवार आणि जय पवार हे शरद पवारांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी पोहोचले आहेत. 

Sharad Pawar: अजित पवार काकांच्या भेटीला जाण्याची शक्यता, शरद पवारांना देणार वाढदिवसाच्या शुभेच्छा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची दिल्लीतील निवासस्थानी थोड्याच वेळात भेट घेण्याची शक्यता

Bhandara News: विशेष भरारी पथकाची वाळूच्या ओव्हरलोड नऊ वाहनांवर कारवाई

गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातून नागपूरकडं होणाऱ्या वाळूच्या ओव्हरलोड वाहतुकीवर भंडारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या भरारी पथकानं भंडाऱ्यात कारवाई केली. या कारवाईत नऊ ओव्हरलोड टिप्परला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या कारवाईत पोलिसांनी नऊ टिप्पर, त्यातील वाळूसाठा असा कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई भंडाऱ्याच्या आंधळगाव, वरठी आणि जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री करण्यात आली. भंडाऱ्यातून होणाऱ्या या ओव्हरलोड वाहतुकीच्या अनेक तक्रारी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडं करण्यात आल्या होत्या, त्यावरून ही कारवाई करण्यात आल्याचं बोललं जातं आहे. नागपूरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकानं भंडाऱ्यात येऊन ही कारवाई केल्यानं भंडारा पोलीस आणि महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

Nashik News: एमबीबीएस पेपर फुटी प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल

एमबीबीएस पेपर फुटी प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. एम बी बी एस च्या द्वितीय वर्षाच्या हिवाळी सत्राची सुरू आहे परीक्षा. फार्मकॉलॉजी 1 चा पेपर फुटल्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पॅथॉलॉजी 1 या विषयाचा पेपर फुटल्याची माहिती विद्यापीठाला प्राप्त झाली

Kurla BEST Bus Accident : कुर्ला अपघातानंतरचा धक्कादायक आणि लाजीरवाणा प्रकार उघड, मृत महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्यांच्या चोरीचा VIDEO Viral

Kurla BEST Bus Accident : कुर्ला अपघातानंतरचा धक्कादायक आणि लाजीरवाणा प्रकार उघड


अपघातात मृत महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्यांच्या चोरीचा व्हिडीओ


हेल्मेट घातलेल्या युवकाने सर्वांसमोर मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या


'हाथ मे गोल्ड है' व्हिडीओत स्पष्ट आवाज


धक्कादायक प्रकाराचा तपास होणार, मुंबई पोलिसांची माहिती

Mumbai Crime: विलेपार्ल्यात पार्किंगच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला

 मुंबईच्या विलेपार्ले पूर्व परिसरात पार्किंगच्या वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. या चाकू हल्ल्यात संजय गुरव नावाचा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर विलेपार्ले पश्चिमेकडील महापालिकेच्या कुपर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही घटना 9 डिसेंबरच्या रात्री एक वाजता घडली आहे. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणीला देखील हल्लेखोराने अश्लील शिवीगाळ करून मारण्याचा देखील प्रयत्न केला. याप्रकरणी जखमी झालेल्या तरुणाच्या मेहुणीने आरोपी कुणाल सोलंकी विरोधात विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कलम 118 (2).352,351 (2), 79, 131 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद केला असून हल्लेखोर तरुणाचा पोलीस शोध घेत आहेत.

Sindhudurg crime: सिंधुदुर्गात पार्टीतील वादातून मारहाणीत तरुणाचा खून

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील भालावल फौजदारवाडी येथील संतोष गुळेकर यांचा पार्टीत झालेल्या वादातून खून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी रात्री खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. याप्रकरणी मुख्य संशयित चेतन रवींद्र परब याला पोलिसांनी अटक केली. 

Bhandara News: फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावानं भंडाऱ्यात 11.48 कोटींनी ग्राहकांची फसवणूक

फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये कमी गुंतवणुकीत मोठा आर्थिक धानलाभ होण्याची भुलथापा देत चंद्रपूरच्या दोघांनी भंडारा जिल्ह्यात अनेक ग्राहकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात याचं मोठ्या प्रमाणात जाळं पसरविण्यात आलं होतं. या माध्यमातून ग्राहकांची 11 कोटी 48 लाख 40 हजार 21 रुपयांनी फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आल्यानं लाखांदूर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhandara Crime : फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावानं भंडाऱ्यात 11.48 कोटींनी ग्राहकांची फसवणूक

Bhandara Crime : फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये कमी गुंतवणुकीत मोठा आर्थिक धानलाभ होण्याची भुलथापा देत चंद्रपूरच्या दोघांनी भंडारा जिल्ह्यात अनेक ग्राहकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात याचं मोठ्या प्रमाणात जाळं पसरविण्यात आलं होतं. या माध्यमातून ग्राहकांची 11 कोटी 48 लाख 40 हजार 21 रुपयांनी फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आल्यानं लाखांदूर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास शामराव लांडगे रा. मराठा चौक, जुनोना रोड, बाबुपेठ चंद्रपूर, संजय देवाजी हांडेकर रा. पहाडी चौक वासेरा ता. सिंदेवाही या दोघांविरुद्ध लाखांदूर पोलिसात पुणे दाखल करण्यात आले आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कसोधन करीत असून ज्या ग्राहकांची फसवणूक झालेली आहे, अशांनी त्यांच्याकडं असलेल्या कागदपत्रासह आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Parbhani News Updates : परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, जिल्ह्याभरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात

Parbhani News Updates : परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला काल हिंसक वळण लागल्यानंतर आज परिस्थिती नियंत्रणात आली आहे जिल्ह्याभरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून काल रात्री उशिरापर्यंत दंगलखोर अशा धुडगूस घालणाऱ्या 40 पेक्षा जास्त लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे महत्त्वाचं म्हणजे आज शहरातील व्यापारी अकरा वाजता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांचे नुकसान झालेलं आहे या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर व्यापारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत स्वतः आयजी शहाजी उमप हे परभणीत थांबून आहेत शहरातील परिस्थती आता काहीशी बदलत आहे.

Ladki Bahni Yojana : 'लाडका भाऊ योजना' म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे वेतन थकीत

Ladki Bahni Yojana : लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची लोकप्रिय योजना ठरली. त्यासोबत चर्चा झाली लाडका भाऊ योजनेची म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची. सुशिक्षित तरुणांना स्किलडेव्हलप व्हावं यासाठी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सहा हजार ते दहा हजार रुपये दरमहा वेतन देत सहा महिन्याचा प्रशिक्षण कार्यक्रम सरकारनं हाती घेतला. तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तयार करण्यात आली. योजनेसाठी 5500 कोटींची तरतूद करण्यात आली. या योजनेसाठी बारावी ते पदव्युत्तर अशा लाखो तरुणांना ऑनलाइन अर्ज करता आले. या योजनेत तरुणांचा चार ते पाच महिन्याचा कालावधी पूर्ण झालाय. जेवढं काम केलं तेवढं वेतन त्यांना मिळालेला नाही. सरकार दरबारी तरुणांचे दोन ते तीन महिन्याचं वेतन थकीत आहे. त्यामुळे वेतन कमी असलं तरी ते वेळेवर द्या अशी मागणी विद्यार्थी करताय. शिवाय सहा महिन्यानंतर करायचं काय हा प्रश्न तरुणांना सतावत आहे. त्यामुळे योजनेचा कालावधी वाढवावा अशी मागणी काही तरुणांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

Hingoli Bandh : परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ आज हिंगोली बंद, 400 हून अधिक बस फेऱ्या रद्द

Hingoli Bandh : परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ आज हिंगोली मध्ये बंद पाळला जाणार आहे काल तसे निवेदन आंबेडकर जनतेच्या वतीने देण्यात आले आहे त्यामुळे या बंदच्या  पार्श्वभूमीवर हिंगोली आगारातून दिली जाणारी बस सेवा आज बंद असणार आहे पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार परिवहन विभागाच्या बसचा नुकसान होऊ नये यासाठी या आज सर्व बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत  जवळच्या बसफेऱ्या सह लांब पल्ल्याच्या सर्व बस फेरा सुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत हिंगोली आगारातून आज दिवसभरात साधारण 400 बस फेऱ्या होत असतात या सर्व बस फेऱ्या आज बंद आहेत

National News : पुढच्या 11 वर्षांत भारताचं स्वत:चं अंतराळात स्थानक उभं राहणार; राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांची घोषणा

National News : येत्या 11 वर्षांत भारताचं स्वत:चं अंतराळात स्थानक उभं राहणार आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यासंदर्भात घोषणा केलीय. भारत 2035 पर्यंत अंतराळात स्वत:चं स्थानक उभारणार असून, 2040 पर्यंत भारतीय अंतराळवीर चंद्रावर उतरेल. अशी घोषणा त्यांनी केली. 2030 च्या अखेरीस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सेवामुक्त होणार आहे. त्यामुळं भारतीय अंतराळ स्थानक आपल्या देशाला जागतिक लाभ देऊ शकतो. 2024 सालाच्या अखेरीस किंवा 2026 च्या सुरुवातीला गगनयान मोहिमेअंतर्गत पहिला भारतीय अंतराळवीर अंतराळात जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच, भारताने खोल समुद्र मोहिमेचा भाग म्हणून सहा हजार मीटरपर्यंत खोली शोधून समुद्रतळावर मानव पाठवण्याचीही योजना आखली असल्याचं त्यांनी सांगितलं.

Gold Rate Hike : नववर्षाच्या तोंडावर सोन्याचे दर विक्रमी उंचीवर...

Gold Rate Hike : नवी वर्षाच्या तोंडावरच सोन्याच्या दरात वाढ झालीय. गेल्या दोन दिवसात सोनं बरंच महागलंय. जागतिक पातळीवर सीरिया आणि इस्त्रायलमधलं युद्ध, चीनची सोन्याध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक याचा परिणाम सोन्याच्या दरावर झालाय. सोनं आणखी महागण्याची शक्यता आहे. 

Parliament Session: संसदेचं अधिवेशन सुरू होऊन 12 दिवस उलटले, मात्र दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत झालेलं नाही

Parliament Session: संसदेचं अधिवेशन सुरू होऊन 12 दिवस झालेत. पण कामकाजाचे तास मात्र विचार करायला लावणारे आहेत. गेल्या 12 दिवसांत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत होऊ शकलेलं नाहीय. अदानींच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं दररोजचं आंदोलन सुरूच ठेवलंय. तर जॉर्ज सोरोस आणि गांधी कुटुंबीयांमधल्या कथित संबंधांवरून भाजपनंही आघाडी उघडलीय. त्यामुळे कामकाज ठप्प झाल्यानं जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा दररोज चुराडा होतोय.

Maharashtra Cabinate Expanssion Shiv Sena : शिवसेनेकडून कुणाची मंत्रिमंडळात वर्णी?

Maharashtra Cabinate Expanssion Shiv Sena : शिवसेनेकडून कुणाची मंत्रिमंडळात वर्णी लागणार याची उत्सुकता असतानाच. शिंदेंच्या शिवसेनेला 12 मंत्रिपदं मिळण्याची शक्यताय. नगरविकास खातं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळणार असल्याची सूत्रांची माहितीय. मंत्रिपदांसंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची माहिती आहे. तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशीही फोनवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तसंच मंत्रिमंडळ विस्तार 14 डिसेंबरला होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. 

Maharashtra Politics Shiv Sena : राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा, दुसरीकडे शिवसेनेत माजी मंत्र्यांना आमदारांचा विरोध, मंत्रिमंडळाची माळ कुणाच्या गळ्यात?

Maharashtra Politics Shiv Sena : एकिकडे राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटलेला नसताना, शिवसेनेतेच काही आमदारांकडून माजी मंत्र्यांना विरोध केल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतच धुसफूस असल्याचं समोर आलंय. अडीच वर्षांच्या काळात मंत्रिमंडळात राहिलेले. अब्दुल सत्तार, दिपक केसरकर, तानाजी सावंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड या नेत्यांकडे गेल्यास. कामं होत नाहीत, असा शिवसेना आमदारांचा आक्षेप असल्याचं सांगितलं जातंय.. महत्त्वाची बाब म्हणजे सत्तारांच्या नावाला तर भाजपनेही विरोध केल्याची चर्चाय. त्यामुळे एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ विस्तारात कुणाचा पत्ता कापणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Maharashtra Politics : दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले, पण एकनाथ शिंदे मात्र, मुंबईतच...

Maharashtra Politics : दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचलेत. मात्र दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र मुंबईतच थांबलेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. या दौऱ्यात फडणवीस नितीन गडकरी आणि राजनाथ सिंग यांना भेटले. तसंच त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूचींही भेट घेतली असून.. उपराष्ट्रपती धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डांनाही फडणवीस भेटण्याची शक्यता आहेत.

Maharashtra Mahayuti Cabinate Expanssion : मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला तयार, दिल्लीत शिक्कामोर्तब; भाजपचे 20, शिवसेनेचे 12, अजित पवारांचे 10 मंत्री फायनल

Maharashtra Mahayuti Cabinate Expanssion : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध संपू्र्ण राज्याला लागलेत. अपेक्षेप्रमाणे दिल्लीत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. त्यानुसार भाजपचे 20 मंत्री, शिवसेनेचे 12 मंत्री तर राष्ट्रवादीचे 10 मंत्री असतील असं सांगितलं जातंय. काल दिल्लीत मुख्यमंत्री फडणवीसांची अमित शाह आणि नड्डांशी दीड तास बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय. तसंच भाजपच्या मंत्र्यांची यादी, संघटनात्मक बाबी, प्रदेशाध्यक्ष या विषयावर चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीसांची आज पंतप्रधान मोदींशी भेट होण्याची शक्यता आहे. 

Maharashtra Politics : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची आज बैठक होण्याची शक्यता; कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार?

Maharashtra Politics : मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात महायुतीच्या नेत्यांची आज मुंबईत बैठक होण्याची शक्यता आहे.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दिल्लीतील बैठकीनंतर राज्यात महायुतीच्या तीनही नेत्यांची बैठक होणार आहे..या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची वर्णी लागणार यावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकतं. आजच्या या महायुतीच्या बैठकीत खाते वाटप आणि जिल्हा पालकमंत्री पदासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती आहे..विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत आहेत. त्यांच्या या दिल्लीवारीनंतर होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष आहे..

हिवाळी अधिवेशनाच्या प्रशासकीय कामाला आजपासून सुरुवात

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज पासून नागपूर मध्ये विधीमंडळ सचिवालयाचे काम सुरू..


यावेळेस तारांकित प्रश्न नसल्याचे फक्त आमदारांच्या आमदारांच्या लक्षवेधीच्या मागण्य स्वीकारल्या जाणार.


इतर प्रशासकीय कामाला पण आज पासून सुरवात…

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News 12th December 2024 Live Updates:  मंत्रिपदांच्या वाटपाचा सस्पेन्स येत्या काही तासांत संपुष्टात येऊ शकतो. महाआघाडी सरकारमध्ये कोणत्या पक्षातून किती आणि कोणते मंत्री केले जाणार याचे चित्र लवकरच स्पष्ट होऊ शकते. कारण यावर मोठे विचारमंथन झाले. काल रात्री दिल्ली.आणि त्या विचारमंथनानंतर जी बातमी समोर आली आहे ती म्हणजे भाजपमधून 20 मंत्री केले जाऊ शकतात. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून 12 मंत्री केले जाऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या पक्षातील 10 मंत्र्यांचा फॉर्म्युला निश्चित होऊ शकतो.


बीड अपहरण, हत्येप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणेंनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट


बीड जिल्ह्यात खून, मारामाऱ्या आणि अपहरणाच्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे असताना पोलीस निपक्षपातीपणे कारवाई करायचे सोडून अशासकिय लोकांच्या दबावात काम करत आहेत. यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारीने कळस गाठला असून जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी व्हावी, अपहरणांच्या प्रकरणांची सीबीआय मार्फत चौकशी करावी, या मागणीसाठी खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी अमित शहा यांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिले.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.