Maharashtra Breaking News Live Updates : सोलापुरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना, अज्ञातांनी नाल्यात फेकलं अर्भक
Maharashtra Breaking News 09 December 2024 Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
सोलापुरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना, अज्ञातांनी नाल्यात फेकून दिलं अर्भक
नाल्यात मृतावस्थेत आढळलेल्या अर्भकाचे कुत्र्यांनी अक्षरशः लचके तोडल्याचा प्रत्यक्षदर्शींचा दावा
सोलापुरातील रूपा भवानी चौकाजवळील नाल्यात अर्धवट अवस्थेत आढळून आले अर्भक
रूपा भवानी चौकातील दुर्गंधीयुक्ती नाल्यात अर्भक आढळल्यामुळे उडाली खळबळ
नाल्यात आढळलेले अर्भक दोन ते तीन आठवड्याचे असण्याची शक्यता
सोलापूर पोलीस घटनास्थळी दाखल, घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी, पोलिसांकडून पंचनामा सुरू
बांगलादेशमध्ये हिंदूंविरोधात होत असलेल्या हिंसाचाराचा विरोध करण्यासाठी नागपुरात सकल हिंदू समाजाकडून भव्य मोर्चे काढण्यात आले आहे. नागपूर शहरातील सर्व सहा वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रातून एक अशा पद्धतीने सहा मोर्चे काढण्यात आले आहे. सर्व मोर्चाचे एकत्रीकरण व्हैरायटी चौकावर होणार असून तिथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व सहा मोर्चामध्ये मोठ्या संख्येने हिंदू बांधव खासकरून तरुण तरुणी सहभागी झाले आहे.
नाशिक : मखमलाबाद सर्व्हे नंबर 453 मध्ये गव्हाच्या पिकात गोल्डन ओवल (सोनेरी घुबड) पंखामध्ये मांजा अडकल्याने जखमी झाले. उडता येत नसल्याने शेतामध्येच ते विव्हळत होते. याच वेळी शेतात असलेल्या सुरेश कातकाडे यांनी घुबडाला वैद्यकीय उपचारासाठी दाखल केल्याने या घुबडाला जीवदान मिळाले. संक्रांत जवळ येत असल्याने नायलॉन मांजाचा सर्रास वापर होत आहे. याच मांजाला पंख अडकल्याने सोनेरी घुबड जखमी झाले. नियमित शेती मधून चक्कर मारणाऱ्या सुरेश कातकाडे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ आपल्या वाहनातून अशोक स्तंभावरील जनावरांच्या दवाखान्यामध्ये दाखल केले. मात्र, वन्यजीव असल्याने त्यांनी स्वतः दाखल करून न घेता वन विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करत त्यांच्या ताब्यात हे घुबड दिले. म्हसरूळ येथे नव्याने तयार झालेल्या पशू रीहबिलिटेशन केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहे.
भिवंडी महानगरपालिकेच्या मुख्यालयात वेळेवर हजर न राहणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर प्रशासक आयुक्त अजय वैद्य यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याने मुख्यालयाच्या गेटवरच उशिरा येणाऱ्यांची नोंद घेऊन कारवाई सुरू करण्यात आली आहे. सकाळी 10 वाजता कामावर हजर राहण्याचे आदेश असतानाही 50 हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी उशिरा येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार असून, महानगरपालिकेच्या कामकाजात शिस्त आणण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला गेला आहे.
नांदेड : बांगलादेश येथे हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे हिंदू न्याय व आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 11 वाजता मोर्चा जुना मोंढापासून सुरुवात झाली.या मोर्चात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. तसेच भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. तसेच शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर देखील या मोर्चात सहभागी झाले.
बीड : जिल्ह्यातील केज शहरातील शिवाजी महाराज चौकात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. मागील एक तासापासून रस्ता रोको आंदोलन सुरू आहे.. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जमलेल्या आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.
परभणी : बांग्लादेश येथे होत असलेल्या हिंदूवरील अत्याचाराच्या विरोधात आज परभणीत सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच परभणी बंदचे ही आवाहन करण्यात आल्याने आज परभणीतील सर्व बाजारपेठ बंद आहे. बाजारपेठेमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय. काही वेळामध्ये परभणीतील शनिवार बाजार येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून मोठ्या प्रमाणावर सकल हिंदू बांधव या मोर्चात सहभागी होणार आहेत.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज दिल्लीत शरद पवारांची भेट घेऊन ईव्हीएम मशीन विरोधात घ्यायच्या भूमिकेबद्दल प्राथमिक चर्चा केली. या बैठकीला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, आमदार उत्तम जानकर, पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार संजय जगताप, प्रशांत जगताप, सचिन दोडके, दत्ता बहिरट, अश्विनी कदम हे उपस्थित होते. याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील अनेक पराभूत उमेदवार देखील या बैठकीला उपस्थित होते. संध्याकाळी या नेत्यांची शरद पवारांच्या उपस्थितीत अरविंद केजरीवाल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांसोबत पुन्हा बैठक होणार असून ईव्हीएम विरोधात न्यायालयात दाखल करायच्या याचिकेबद्दल चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीवेळी महाविकास आघाडीचे उमेदवार नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या कथित गैरप्रकारांचे पुरावे वकिलांकडे सादर करणार आहेत.
कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असेही त्यांनी म्हटले आहे. या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्ह्यात संतापाची लाट....
बांगलादेशात हिंदू आणि अल्पसंख्याक समाजावर होत असलेल्या अत्याचार निषेधार्थ नंदुरबार मध्ये मूक मोर्चा....
संत महंतांच्या उपस्थितीत मूक मोर्चाचे आयोजन.....
मूक मोर्चा मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग.....
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा ,नवापूर आणि धडगाव अक्कलकुवा तालुक्यात निषेध मोर्चा.....
संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार परिषदेने दखल घेण्याची मागणी.....
बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात बीडच्या परळीत आज बंदची हाक देण्यात आलीय. सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपली आस्थापने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिलाय. बांगलादेशात हिंदूधर्मीयांवर अत्याचार होत असून याचे पडसाद सर्व ठिकाणी पाहायला मिळत आहे. दरम्यान आज या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याकरिता परळी शहर कडकडीत बंद पुकारण्यात आले आहे. राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात निषेध नोंदविण्यासाठी परळीकर उपस्थित राहणार आहेत. तर व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आजचा बंद पाळला आहे.
नागपूर : विरोधीपक्षातील आमदारांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विरोधीपक्ष नेता नेमण्याची मागणी केलीय. त्यातच नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी विरोधीपक्ष नेत्यांचा बंगला सज्ज केला जातोय. मात्र राज्याला अधिकृत विरोधी पक्ष नेता मिळेल की नाही? याबद्दल संभ्रम आहे. त्यासोबतच हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्ष नेत्याच्या पत्रकार परिषदेची तयारीही पूर्ण झाली आहे. विरोधी पक्ष नेत्याच्या पत्रकार परिषदेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने डोम उभारला आहे. नागपूरातील रवि नगर परिसरातील 23 क्रमांकाचा बंगला विरोधी पक्ष नेत्यासाठी सज्ज करण्यात आला आहे.
पुणे
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी
पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार
नवीन आणि जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, भामा आसखेड, वारजे ठिकाणी स्थापत्य आणि विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहे.
त्यामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
शुक्रवारी शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, पाणीपुरवठा विभागाची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येच्या कटाबाबत माहिती देणार्यास मुंबई पोलिसांनी अजमेरमधून केली अटक
मिर्झा मोहम्मद बेग असे या आरोपीचे नाव आहे
मिर्झा हा मूळचा झारखंडचा रहिवाशी आहे.
दोन दिवसांपूर्वी मिर्झाने वरळीच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येच्या कटाबाबत माहिती दिली होती
दोन आएसआय एजंट या हत्येचा कट रचत असून त्यासाठी लागणारी शस्त्रास्त्रेही असल्याचे म्हटले होते
दरम्यान घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी नियंत्रण कक्षाला खोटी माहिती देणार्या मिर्झाला अजमेर मधून अटक केली आहे
त्याने हे कृत्य का केले याचा आता पोलिस शोध घेत आहेत.
कुर्लातील कालच्या भीषण अपघातानंतर कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेरील बेस्ट बस स्थानक आज बंद
कालच्या घटनेनंतर कुठलाही अनुश्चित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी
या अपघातात आता पर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे
पार्श्वभूमी
मुंबई : सध्या राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुंबईतील कुर्ला या भागात भरधाव बेस्ट बसने अनेकांना चिरडलं आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, या घटनेनंतर वेगवेगळ्या स्तरावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकीय पातळीवरही अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आजही या घटनेचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्यात थंडी वाढली आहे. पारा घसरल्यामुळे जागोजागी शेकोटी पेटताना दिसतेय. राज्याच्या राजकारणातही अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहे. या सर्व घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -