Maharashtra Breaking News LIVE: मोठी बातमी.. महाराष्ट्रात HMPV व्हायरसचा शिरकाव, नागपुरातील दोन लहान मुलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्र, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

ज्योती देवरे Last Updated: 07 Jan 2025 12:52 PM
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे राज्यात संतप्त पडसाद; लातूर-बार्शीत चक्का जाम 

लातूर: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन राज्यभरातील वातावरण प्रचंड तापले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळावीर लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे सकल मराठा समाजाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यामुळे लातूर-परभणी रोडवरील वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे रेणापूर येथे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याठिकाणी मराठा समाज चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळाला. सध्या रेणापूरमध्ये चक्काजाम आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली असून रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेणापूरमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अद्याप मंत्री धनंजय मुंडेंनी स्वत:हून राजीनामा द्यायला हवा होता;सरपंच परिषदेची मागणी 

Santosh Deshmukh Case : मस्साजोग प्रकरणाचे पडसाद राज्याच्या कानाकोपर्यात उमटत असताना या घटनेमुळे सर्व सरपंचांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. हे जर असचं सुरू राहिलं तर दोन जातींमध्ये तेढ निर्माण होण्यासही वेळ लागणार नाही. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. तर मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा आतापर्यंत स्व: इच्छेने द्यायला हवा होता. अजित दादा हे का तो ठेवून घेतलाय माहित नाही. अशी प्रतिक्रिया सरपंच परिषदचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी दिली.

सिंदखेड राजा येथे सापडलेली 12व्या शतकातील शेषशाही भगवान विष्णूंची मूर्ती धुळखात

सिंदखेड राजा : राजमाता जिजाऊ यांचे वडील राजे लखोजी जाधव यांच्या सिंदखेड राजा येथील समाधी परिसरात सात ते आठ महिन्यापूर्वी उत्खनन करत असताना अमूल्य व अप्रतिम अशी रेखीव आणि बाराव्या शतकातील शेषशाही भगवान विष्णूंची मूर्ती सापडली होती. पुरातत्त्व विभागाने ही मूर्ती बाहेर काढली असून याच परिसरात ही मूर्ती धुळखात पडून आहे. मात्र येत्या 12 जानेवारीला राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव असल्याने जगभरातून जिजाऊ भक्त सिंदखेड राजा येथे येतात. त्यामुळे ही मूर्ती जिजाऊ भक्त आणि पर्यटकांना दर्शनासाठी खुली करून द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पुरातत्त्व विभागाने हे मूर्ती बाहेर काढली. मात्र त्याच परिसरात ही मूर्ती पडून असल्याने अशी अप्रतिम मूर्ती पर्यटकांना बघता येत नाही आणि त्यामुळे आता जिजाऊ भक्तांनी ही मूर्ती खुली करण्याची मागणी केली आहे

नागपुरातील HMPV व्हायरसची लागण झालेल्या दोन्ही मुलांची प्रकृती सुधारली 

HMPV Patient in Nagpur : नागपुरात एचएमपीव्हीची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले होते. दोन लहान मुलांचा HMPV अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सात वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला HMPV ची लागण झाल्याचं समोर आलं होते. मात्र आता या दोन्ही लहानग्यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी दिली आहे.

Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोग प्रकरणाचे पडसाद राज्याच्या कानाकोपर्यात उमटत असताना या घटनेमुळे सर्व सरपंचांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. हे जर असचं सुरू राहिलं तर दोन जातींमध्ये तेढ निर्माण होण्यासही वेळ लागणार नाही. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. तर मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा आतापर्यंत स्व: इच्छेने द्यायला हवा होता. अजित दादा हे का तो ठेवून घेतलाय माहित नाही. अशी प्रतिक्रिया सरपंच परिषदचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी दिली.

HMPV व्हायरस रोखण्यासाठी खबरदारी; आरोग्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

HMPV Virus India : जगभरात 2020 मध्ये थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) वेगाने पसरत आहे. दरम्यान एचएमपीव्ही व्हायरस संदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी आरोग्य विभागाची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधवही उपस्थित राहणार असल्याची माहिती पुढे आली आहे. नागपुरात दोन संशयित रूग्ण सापडल्यानंतर ही तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. आज दुपारी 3 वाजता आरोग्य भवनात ही बैठक आयोजित केलीय. 

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; चाकरमान्यांचा संताप 

Mumbai: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय  महामार्गावर आज पहाटे पासूनच प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. वसई  ते घोडबंदर च्या फाउंटन हॉटेलपर्यंत आता दोन्ही लेनवर वाहतूक कोंडी आहे. नायगाव हद्दीत गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर आज पहाटे 4.30 वाजता एका ट्रकचा अपघात झाला होता. त्यामुळे पहाटे पासूनच प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. त्यानंतर वाहन चालकांनी विरुद्ध दिशेने वाहन हाकल्याने दोन्ही लेनवर वाहतूक कोंडी झाली आहे.
 
दोन ते तीन तासापासून वाहन चालक वाहतूक कोंडीत अडकले आहेत. वाहनधारकांबरोबर प्रवाशी ही हैराण झाले आहेत. सकाळी मुंबईला कामावर जाणारे वाहनधारक वाहतूक कोंडीत अडकल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका ही अडकल्या आहेत. महामार्ग आणि वाहतूक  पोलीस, वाहतूक कोंडी काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. 

Mohol Firing : मोहोळ तालुक्यात हवेत गोळीबार करणाऱ्या युवकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

सोलापूर : मोहोळ तालुक्यात हवेत गोळीबार करणाऱ्या युवकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  विनापरवाना शस्त्र बाळगल्या प्रकरणी प्रशांत तुकाराम भोसले सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. मोहोळ तालुक्यातील खानवी गावातील प्रशांत भोसले याच्या घराची झडती घेण्यात आली. झडतीमध्ये काळ्या रंगाची स्पॉटिंग राइफल, 4 जिवंत काडसुते, एक बनावट पद्धतीची पिस्टल, मॅगझिनमध्ये सात जिवंत काडसुते मिळून आले. प्रशांत भोसले याच्यावर सोलापूर जिल्ह्यासह मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.  

Chandrapur News : चंद्रपुरात पार पडणार आंतरराष्ट्रीय पर्यावरण संमेलन

चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय पर्यावरण संमेलन पार पडणार 

१६, १७, १८ जानेवारी रोजी कार्यक्रमाचं नियोजन 

ह्याच पर्यावरण संमेलनाच्या वित्तीय नियोजनासाठी देवगिरीवर उपमुख्यमंत्री आणि सुधीर मुनगंटीवार यांची भेट 

ह्या पर्यावरण विषयक संमेलनाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे तज्ज्ञ, विद्यार्थी यांची देखील उपस्थिती असणार 

अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून ह्या संमेलनासाठी ठेवलेला राखीव निधी अधिकाऱ्यांना वळता करण्याचे निर्देश

Maharashtra Cabinet Meeting: मंत्रिमंडळाच्या बैठकीत ई कॅबिनेटच सादरीकरण

ई कॅबिनेटच सादरीकरण आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत होणार. हे सादरीकरण झाल्यानंतर पुढील कॅबिनेट ही पेपरलेस होणार. संबंधित अधिकारी आणि मंत्री यांना प्रस्तावाच टिपण आणि इतर माहिती टॅबवरती उपलब्ध करुन दिली जाणार. यासाठी संबंधित अधिकारी आणि मंत्री यांना युआयडी क्रमांक ही दिला जाणार. मंत्रीमंडळ बैठक ही पेपरलेस करण्यासाठी ई कॅबिनेट सुरू करत असल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी मागील कॅबिनेटला दिली होती. हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि आसाम प्रमाणे महाराष्ट्रात ही  आता ई कॅबिनेट होणार 

Buldhana News: एचएमपीव्ही व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात आरोग्य प्रशासन सज्ज

HMPV व्हायरस प्रसाराच्या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर. जिल्ह्यात बुलढाणा येथे वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात १०० बेड तर खामगाव येथे ५० बेड चे विलगिकरण कक्ष  तयार. जिल्ह्यात आठ ठिकाणी ऑक्सीजन जनरेशन प्लांट तयार. प्रशासनाने HMPV व्हायरस प्रसार रोखण्यासाठी केली मोठी तयारी. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांची माहिती.

Tiger Death: भंडाऱ्यात वाघिणीचं शीर धडापासून वेगळं करून चार तुकडे करून फेकले

वीज प्रवाहित तारांमध्ये अडकून वाघाचा मृत्यू झाला. त्यामुळं वाघ मोठा असल्यानं कारवाईच्या भीतीपोटी शेतकऱ्यानं त्याच्या अन्य दोन सहकाऱ्यांच्या मदतीनं धारदार शस्त्रानं वाघाचं शीर धडावेगळं करीत अक्षरशः चार वेगवेगळे तुकडे केलेत. आणि प्रहरण अंगलट येवू नये म्हणून, ते गावालगत असलेल्या तीन तलाव परिसरातील झांजरीया जंगलातील बीटात फेकून दिल्याची घटना काल उघडकीस आली होती. ही घटना भंडाऱ्याच्या तुमसर वनपरिक्षेत्रांतर्गत पाचोरा गावालगत असलेल्या झांजरिया बीटात उघडकीस आलं. याप्रकरणी वनविभागानं मध्यरात्री तीन संशयतांना ताब्यात घेतला असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

*ताब्यात घेतलेल्यांमध्ये कोणाचा समावेश?*
१) राजू वरखडे (५०)
२) दुर्गेश लसुंते (५०)
३) राजेंद्र उर्फ बस्तिराम कुंजाम (५५)

Akola Crime: अकोल्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीचा खून

अकोल्यात सकाळी हत्येचा थरार. मॉर्निंग वॉकला आलेल्या महिलेचा खून. अकोल्यातील गीता नगर भागातल्या जुना हिंगणा परिसरातील घटना. जुना हिंगणा भागातील सविता ताथोड या महिलेचा धारदार शस्त्राने निर्घृण खून. धीरज चुंगडे असं आरोपीचं नाव. जुन्या वादातून महिलेचा खून झाल्याची प्राथमिक माहिती. घटनास्थळी जुने शहर पोलीस दाखल. घटनेनंतर आरोपी फरार. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल. सकाळी झालेल्या खुनाच्या घटनेने अकोला हादरला.

Pune News: पुण्यात ठाकरे गटाला मोठं खिंडार

ठाकरे गटातून हकालपट्टी केलेले माजी नगरसेवक विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल, संगीता ठोसर, पल्लवी जावळे आणि प्राची आल्हाट आज करणार भाजपात प्रवेश. 5 नगरसेवक व शिवसैनिक कार्यकर्त्यासह दुपारी 1.00 वाजता करणार प्रवेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश

Santosh Deshmukh Case: सुरेश धस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार

आमदार सुरेश धस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना भेटणार. बीड प्रकरणात विशेष सरकारची वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्त करावी यासंदर्भातच भेट घेणार असल्याची माहिती. अद्यापही उज्ज्वल निकम यांच्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून निर्णय नाही.   

HMPV: मोठी बातमी.. महाराष्ट्रात HMPV व्हायरसचा शिरकाव, नागपुरातील दोन लहान मुलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

HMPV - नागपुरातही आढळले एचएमपीव्ही चे 2 रुग्ण  

- दोन लहान मुलांचा रिपोर्ट एचएमपीव्ही पॉझिटिव्ह आला 

- सात वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलीचा रिपोर्ट 3 जानेवारीला खासगी रुग्णालयात पोजिटिव्ह आला 

- या दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता 

- दोन्ही मुलांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याची गरज पडली नाही आणि दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाल्याची माहिती

-महाराष्ट्रात HMPV व्हायरसचा शिरकाव, नागपुरातील दोन लहान मुलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

Mumbai Police: महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे पोलिसाला भोवले, मुंबई पोलिसांचे असभ्य वर्तन खपवून घेणार नाही, मुंबई उच्च न्यायालयानं बजावलं

Mumbai Police: मुंबई पोलिसांचे असभ्य वर्तन खपवून घेणार नाही, मुंबई उच्च न्यायालयानं बजावलं

तक्रारदार महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे पोलिसाला भोवले

हायकोर्टाने दिले चौकशीचे आदेश

तक्रारदार महिलेला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे कांदिवलीतील पोलीस उपनिरीक्षकाच्या चांगलेच अंगलट आलेलं आहे

या पोलिसाची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी दिले

समता नगर पोलीस ठाण्यात हे पोलीस उपनिरीक्षक कार्यरत आहेत

न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने त्यांची चौकशी करण्याचे आदेश डीसीपींना दिलेत

Nagpur: नागपूरमध्ये थंडीचा जोर वाढला, पुढील काळात थंडीचा जोर आणखी वाढणार, नागपूर वेधशाळेची माहिती

Nagpur: नागपूर मध्ये देखील थंडीचा जोर वाढला आहे.

मागच्या दोन ते दिवसांपासून नागपूरचा पारा 8 अंश सेल्सिआच्या घरात होते.

आज देखील नागपूर मध्ये थंडी कायम आहे.

उत्तरेकडून कडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पुढील काळात थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचे नागपूर वेधशाळेने सांगितले आहे.

असे असले तरी नागपूरकर या थंडीचा आनंद घेतांना पाहायला मिळत होते 

Nagpur: वाघिण आणि तिच्या पाच बछड्यांचा मार्ग रोखल्याची हायकोर्टाकडून गंभीर दखल, उद्या तातडीची सुनावणी

Nagpur: एफ 2 वाघिण आणि तिच्या पाच बछड्यांचा मार्ग रोखल्याची हायकोर्टाकडून गंभीर दखल

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दाखल करून घेतली सुमोटो याचिका, उद्या तातडीची सुनावणी

राज्याच्या मुख्य वन संरक्षकांना जाबाब नोंदवण्याचे आदेश जारी

नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाचे निर्देश

31 डिसेंबर रोजी कुही वनक्षेत्रातील गोठणगाव सफारीत घडली होती घटना

याप्रकरणी चार सफारी चालक आणि गाईडचं तीन महिन्यांकरता निलंबन 

याशिवाय चालकांना 25 हजार रूपयांचा तर गाईडला प्रत्येकी 1 हजार रूपयांचा वनविभागाकडून दंड

Maharashtra Police: नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या 44 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची अखेर नियुक्ती

Maharashtra Police: नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या 44 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची अखेर नियुक्ती

यातील अनेक पोलिस निरीक्षक मागिल अनेक दिवसांपासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते

या नियुक्तीत गुन्हे शाखेत कार्यरत असताना अनेक प्रतिष्ठेचे गुन्ह्यांची उकल करणार्या अधिकार्यांचा समावेश

विशेष म्हणजे यातील अनेक निरीक्षकांच्या मुंबईबाहेर बदली करण्यात आल्या होत्या

मात्र फडणवीस सरकार येताच, या अधिकार्यांच्या बदल्यांना स्थगिती देत, पून्हा त्यांच्या बदल्या मुंबईत करण्यात आल्या आहेत

Mumbai: मुंबईच्या सेंट जाॅर्ज रुग्णालयाजवळ अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार

Mumbai: मुंबईच्या सेंट जाॅर्ज रुग्णालयाजवळ अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार

एमआरए पोलिसांच्या हद्दीत हा गोळीबार झाला असून पोलिस घटनास्थळी दाखल

प्रत्यक्षदर्शी व्यक्तींकडे पोलिस या गोळीबार प्रकरणी करत आहेत चौकशी

गुन्हे शाखेचे पोलिस करत आहेत तपास

घटनास्थळाजवळी सीसीटिव्ही पोलिस तपासून आरोपींची ओळख पटवत आहेत

Mns: आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेची आढावा बैठक

Mns: आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेची आढावा बैठक.

मनसेच्या सर्व विभाग प्रमुखांची राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थ येथे आढावा बैठक.

विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव आणि आगामी पालिका निवडणुकी संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार विभाग प्रमुखांकडून आढावा.

आगामी पालिका निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकी काय रणनीती आखणार याकडे सर्वांचे लक्ष.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News Live Updates: चीनमध्ये कोविड-19 साथीच्या आजारानंतर अवघ्या जगभरात पाच वर्षांनी एक नवीन आरोग्य संकट उद्भवले आहे. भारतातही या व्हायरसचे रुग्ण आढळल्याने महाराष्ट्राचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलं आहे. तर दुसरीकडे राज्यात काही भागत थंडीचे प्रमाण वाढतंय. बीडचे मस्साजोग येथील सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.